Back
तुळजापूर कृषि मेले में 80 किलो का बबल्या बकरा बना सितारा
DPdnyaneshwar patange
Feb 25, 2026 10:01:49
Dharashiv, Maharashtra
तुळजाभवनी कृषी महोत्सवात ‘बबल्या’ बोकड ठरला स्टार आकर्षण तब्बल ८० किलो वजनाचा उस्मानाबादी बोकड पाहण्यासाठी गर्दी. चार किलोचा गिरीराज कोंबडा देखील भाव खातोय. अँकर : धाराशिव जिल्ह्यात सध्या एका बोकडाची आणि एका कोंबड्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तुळजापूरच्या तुळजाभवनी कृषी महोत्सवात ८० किलो वजनाचा ‘बबल्या’ बोकड आणि चार किलोचा गिरीराज कोंबडा चांगलाच भाव खात आहेत. पाहूया या अनोख्या आकर्षणांवरचा हा खास रिपोर्ट. यावर्षीचा महोत्सव एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. उस्मानाबादी जातीच्या बोकडांनी येथे विशेष लक्ष वेधले आहे. ‘बबल्या’ नावाचा तब्बल ८० किलो वजनाचा बोकड प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. शेतकरी आणि नागरिकांची बबल्या पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असून, तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील शेतकऱ्याचा हा बोकड आहे. याचबरोबर ७५ आणि ६० किलो वजनाचे बोकडही प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. फक्त बबल्या बोकडाचीच नाही, तर चार किलो वजनाच्या गिरीराज कोंबड्याची देखील प्रदर्शनात चांगलीच हवा आहे. विजनवाडी येथील शेतकरी पांडुरंग माने यांचा हा कोंबडा महोत्सवातील आकर्षण ठरत आहे. कोंबड्याची किंमत बाराशे ते पंधराशे रुपयांच्या घरात असली, तरी प्रदर्शनात मात्र त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी उत्सुकता दिसून येत आहे. उस्मानाबादी शे Pili आणि अस्सल गावरान कोंबडा त्यांच्या मटणाच्या चवीसाठी राज्यभर प्रसिद्ध आहेत. उस्मानाबादी शेळीला देश-विदेशातून मागणी वाढत आहे. अशा कृषी महोत्सवांच्या माध्यमातून उस्मानाबादी शेळीचे ब्रॅण्डिंग करून तिला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न कौतुकास्पद आहे. ज्ञानेश्वर पतंगे, झी २४ तास, धाराशिव
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 11:40:39Malegaon, Maharashtra:मालेगाव महानगरपालिकेत नमाज पठणानंतर वादाची ठिणगी, हिंदुत्ववादी संघटनांकडून हनुमान चालिसाचे पठण
0
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 25, 2026 11:37:590
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 11:34:440
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 11:32:210
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 11:03:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 25, 2026 10:21:310
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 10:20:170
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 25, 2026 10:00:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 25, 2026 09:52:280
Report
PNPratap Naik1
FollowFeb 25, 2026 09:43:080
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 09:36:410
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 09:32:450
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 25, 2026 09:19:030
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 08:51:120
Report