Back
रोहित शेट्टी के जूहू टॉवर पर गोलीबारी, शुभम लोणकर ने आरोप स्वीकार किया
JJJAYESH JAGAD
Feb 02, 2026 08:19:33
Akola, Maharashtra
Anchor : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील ‘शेट्टी टॉवर’ या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे मुंबईसह संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित कुख्यात गँगस्टर शुभम लोणकर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे.‘शुभम लोणकर आरा बिश्नोई’ या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये शुभम लोणकर,आरा बिश्नोई, हरी बॉक्सर आणि हरमन शांडू यांच्या नावाने रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे.पोस्टमध्ये “कामात हस्तक्षेप करू नका, असे अनेकदा सांगितले होते, पण ऐकले गेले नाही. हा केवळ ट्रेलर आहे. पुढच्या वेळी गोळ्या छातीत घातल्या जातील,”असा इशारा देत थेट बॉलिवूड उद्योगालाही धमकी देण्यात आली आहे.
दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्हरी गावचा रहिवासी असल्याच्या़ा. याआधीही शुभम लोणकरवर अकोला पोलिसांनी कारवाई केली असून त्याच्याकडून तब्बल तीन पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले होते. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असलेल्या शुभम लोणकरला बंदूक तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी अटक केली होती.शुभम काही काळ पुण्यातील वारजे परिसरात राहत होता आणि नंतर तो फरार झाला होता.त्यानंतर त्याला पुण्यातून अटक करण्यात आली होती, मात्र पुढे त्याची जामिनावर सुटका झाली होती.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowFeb 16, 2026 13:39:580
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 16, 2026 13:19:290
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 16, 2026 13:05:520
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 16, 2026 13:04:560
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 16, 2026 13:04:410
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 16, 2026 12:48:490
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 16, 2026 12:37:190
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 16, 2026 12:36:220
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 16, 2026 12:02:540
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 16, 2026 12:01:380
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 16, 2026 12:01:150
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 16, 2026 11:52:190
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 16, 2026 11:38:330
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 16, 2026 11:38:030
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 16, 2026 11:37:250
Report