Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001

नागपूर बारहवीं पेपर लीक मामला: ट्यूशन संचालक और शिक्षक गिरफ्तार

AKAMAR KANE
Feb 23, 2026 02:32:49
Nagpur, Maharashtra
नागपूर बारावी दोन पेपर फूटल्याप्रकरणी शिकवणी वर्गाच्या संचालकासह दोघांना अटक करण्यात आलीय. निशिकांत मून आणि फरहान अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपी निशिकांत मून हा एका ट्यूशन क्लासेसचा संचालक असून त्याच्याकडे फरहान हा शिक्षक म्हणून काम करतो.. नागपूरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर गुरुवारी बारावीचा केमिस्ट्री पेपर होता. या पेपर दरम्यान एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात असल्यामुळे पर्यवेक्षकांना संशय आला. महिला शिक्षिकेने तिची झेडपी घेतली असता तिच्याकडे स्मार्टफोन आढळून आला. या स्मार्टफोन मधील एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पेपर सुरू होण्याअगोदरच पेपर आणि त्याची उत्तरे आढळून आली होती. त्यावरून पेपर तासभरापूर्वीच फुटल्याचा संशय पर्यवेक्षकांना आला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. दरम्यानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून हा पेपर लीक झाला होता त्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये निशिकांत एडमिन तर फरहान प्रश्नांची उत्तरे सोडून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती... या पेपर फुटी प्रकरणी पोलीसांना अजून काही धागेदोरे मिळाले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Feb 23, 2026 04:03:20
Shirdi, Maharashtra:साईबाबाच्या शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी अतिरिक्त पुलिस कुमक तैनात... कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस पथकाची स्थापना... बाहेरच्या राज्यातील गुन्हेगारांवर असणार लक्ष ; आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई... दहा दिवसांत सुमारे 70 पाकीटमारांवर कारवाई... नियमभंग करणाऱ्या हॉटेल चालकांवर कठोर कारवाईचा इशारा.. वेश्या व्यवसाय करणारी हॉटेल्स सील करण्याची तयारी... हॉटेल चालकांवर बाल लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा करणार दाखल... शिर्डीत बेकायदेशीर एजंट, हार-प्रसाद विक्रेत्यांवर विशेष नजर... पोलिस जिल्हा अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 23, 2026 04:03:05
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात मजूरांच्या वाहनातला भीषण अपघात; चार मजुरांचा जागीच मृत्यू, खराब रस्ते और ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन 50 फूट दरीत कोसळल्याने हा अपघात झाला आहे. अपघात चार मजुरांचा जागीच मृत्यु झाला असून सात ते आठ मजूर गंभीर जखमी झाले आहे. धारणी तालुक्यातील बेलतलाई वरून कंजूली गावी मजूर जात असताना हा अपघात झाला आहे. मेळघाटातील खराब रस्ते आणि ओव्हरलोड वाहतुकीमुळे हे अपघात झाले असल्याचा अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. होळी सणाच्या निमित्याने बाजार करण्यासाठी बेलतलाईला आदिवासी बांधव गेले असता हा भीषण अपघात झाला आहे. जखमी मजुरांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व धारणी येथे उपचार सुरू असून काही मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मेळघाटामध्ये दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा कमी असल्याने लोकांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 23, 2026 04:01:56
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- उन्हाळ्याची चाहूल लागताच चंद्रपुरात वनविभाग वणवा नियंत्रण कार्यक्रमासाठी झाला सज्ज, ग्राम परिस्थितीकी विकास समिती आणि वनविभागाने संयुक्तपणे सुरू केला फायर लाईन खबरदार कार्यक्रम, वणवा लागू नये यासाठी विविध स्तरावर केल्या जात आहेत उपाययोजना अँकर:--उन्हाळ्याची चाहूल लागताच चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिघात वनविभाग वणवा नियंत्रण कार्यक्रमासाठी सज्ज झालाय. ग्राम परिस्थितीकी विकास समिती आणि वनविभागाने संयुक्तपणे फायर लाईन खबरदार कार्यक्रम सुरू केलाय. वणवा लागू नये यासाठी विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या सितारामपेठ येथे वनविभागाने अशा पद्धतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. वणवा संपूर्ण जैवविविधतेचा शत्रू आहे. यामुळे वन्यजीव गावाकडे कूच करतात. त्यामुळेच तो वेळीच नियंत्रणात आणणे व त्यासाठी उपाय योजना करणे या संदर्भात वनविभागाने बीट आणि वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय स्तरावर स्वतंत्र पथकांची निर्मिती करत त्यांना साहित्य देण्यात आले आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. बाईट १) संतोष थिपे, वनपरिक्षेत्राधिकारी, मोहर्ली आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 23, 2026 03:48:29
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्याला मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती महेंद्र नेरलीकर, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आदींची उपस्थिती होती. सर्व योजना एकाच छताखाली देण्याचे नियोजन असल्यामुळे विविध 40 स्टॉल उभारले गेले. याशिवाय योजनांचा लाभ त्वरित देण्याचे नियोजन सुद्धा करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून लोकांपर्यंत योजना पोहोचविण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. देशाचा प्रत्येक नागरिक हा घटनेचा संरक्षक आहे. मूलभूत अधिकारांची माहिती प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. न्याय प्रत्येकाला मिळाला पाहिजे, हे घटनेचे मूलभूत तत्व आहे. केवळ लाभार्थी म्हणून थांबू नका तर योजनांची माहिती इतरांनाही द्या.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 23, 2026 03:47:10
Ahilyanagar, Maharashtra:रोहित पवार की सुरक्षा के लिए निलेश लंके की मांग, तनाव बढ़ने की आशंका निलеш लंके ने रोहित पवार को सुरक्षा दिए जाने की मांग की है। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार के निधन के बाद राष्ट्रवादी कांग्रेस के नेताओं के बीच विलीनीकरण को लेकर राजनीतिक बहस तेज हो गई है, और लंके ने इस घटनाक्रम को घातपात की तरह देखने की बात कही है। विलीनीकरण पर सभी चर्चाओं के बारे में लंके ने कहा है कि वह चर्चा पूरी तरह समाप्त हो चुकी है और हम सभी एक साथ प्रचार करते रहे, यह उनका कहना रहा। कर्जमाफी के बारे में महायुती ने कानूनी घोषणा की थी, लेकिन अभी तक कर्जमाफी लागू नहीं हुई है; कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे ने जल्द कर्जमाफी की बात कही है। लंके ने सरकार से जल्द से जल्द कर्जमाफी की माँग की है। मढी यात्राकानफीनाथा के दौरान धारा-रोजगार में मुस्लिम व्यापारियों पर रोक के बारे में लंके ने कड़ा विपक्ष किया है; जातिवाद के आरोप लगा कर कुछ लोग अपनी राजनीति चमकाने की रणनीति पर भी निशाना साधा गया। अहिल्यानगर के पारनेर में कृषी प्रदर्शन का आयोजन किया गया था, जिसमें ग्रामीण शेतकऱ्यां को विभिन्न तकनीकों के बारे में जानकारी देने का प्रयास किया गया।
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 23, 2026 03:33:52
Bhandara, Maharashtra:गोंदिया जिल्ह्यात सकाळपासून अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात बदल जाणवला. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या चना, वटाणा आणि लाखोरी, गहू ही पिके काढणीच्या टप्प्यावर आली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कापणीची तयारीही सुरू केली होती मात्र अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ओलाव्यामुळे धान्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, तसेच उत्पादन घटण्याची भीती आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडेलेला शेतकरी पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या संकटात संपडला आहे त्यामुळे वेळीच प्रशासना ने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 23, 2026 03:32:56
Akola, Maharashtra:आपल्या देशात विविध परंपरा आणि वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. विशेषत: उत्तर भारतात होळीचा उत्सव महिनाभर आधीपासूनच सुरू होतो. त्याच धर्तीवर अकोला शहरात “बृज की होली”चे आयोजन मोठ्या राम मंदिरात करण्यात आले. या होळीत रासायनिक रंगांचा किंवा पाण्याचा वापर करण्यात आला नाही. फक्त सुगंधी फुलांच्या पाकळ्यांनी आणि नैसर्गिक रंगांनीच होळी खेळण्यात आली. मंदिर परिसरात फुलांचा वर्षाव होत असताना पारंपरिक होळीच्या लोकगीतांवर भाविकांनी ठेका धरला आणि भक्तीमय वातावरणात “बृज की होली”चा आनंद लुटला. या राम मंदिरात गेल्या बारा वर्षांपासून फुलांची होळी साजरी करण्याची परंपरा सुरू आहे. पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या उपक्रमाला दरवर्षी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यंदाही मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 23, 2026 03:15:35
Shirdi, Maharashtra:मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने पुन्हा एकदा लाँगमार्चची हाक... आदिवासी, शेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी निघणार भव्य लाँगमार्च... अकोले तालुक्यातील राजुर ते अहिल्यानगर असा 148 किलोमीटरचा पायी लाँगमार्च... हजारो आदिवासी, शेतकरी आणि कामगार पायी प्रवास करत धडकणार अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर... डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वात उद्या लाल वादळ अहिल्यानगरकडे कूच करणार... जिल्हा प्रशासनाची आंदोलकांसोबतची बैठक निष्फळ... शासन आश्वासन देते, मात्र अंमलबजावणी नाही.. लाँगमार्च निघणारच.. डॉक्टर अजित नवले यांचा सरकारला इशारा... अधिवेशन काळात अहिल्यानगरच्या रस्त्यांवर उतरणार लाल वादळ... लाँगमार्चबाबत किसान सभेचे डॉ.अजित नवले यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 23, 2026 03:05:20
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 23, 2026 03:04:42
Chandwad, Maharashtra:चांदवड तालुक्यातील परसूल येथील चिंचोली नदीत काल (दुपारी) एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला प्राथमिक तपासात हा मृत्यू अपघाती नसून हत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे निफाड–चांदवड रोडवरील चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात फुगलेल्या अवस्थेत हा मृतदेह तरंगताना आढळून आला मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याचे हात एकमेकांना नायलॉन दोरीने बांधून ते मांडीला बांधलेले असल्याचे दिसून आले तसेच मृताच्या कमरेस सुमारे 20 ते 30 किलो वजनाचे डंबेल्स बांधलेले होते याशिवाय मयताचे तोंड कपड्याने बांधलेल्या अवस्थेत असल्याने हा खून असल्याची शक्यता अधिक बळावली आहे मृत व्यक्ती अंदाजे 35 ते 40 वर्षे वयोगटातील अज्ञात पुरुष असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी परसूल येथील पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे चांदवड पोलीस पुढील तपास करत आहेत दरम्यान, घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलीसांकडून सुरू आहेत
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 23, 2026 03:00:40
Yeola, Maharashtra:येवला–नगरसुल रोडवरील शहराजवळील रेल्वे गेट परिसरात कॅनालजवळ डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. या अपघातात डंपर चालक जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कॅनलजवळ वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे डंपर रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले.स्थानिकांनी तत्काळ जखमी चालकाला डंपरमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 23, 2026 02:48:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर. मराठवाड्यात नव्यावर्षात ही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच... जानेवारी महिन्यात 76 शेतकऱ्यांची आत्महत्या, सर्वाधिक बीड जिल्ह्यात. मराठवाड्यात 2025 या मागील वर्षात तब्बल 1129 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले होते. शेतकरी आत्महत्याचे हे सत्र नव्या वर्षातही सुरूच आहे. जानेवारी 2026 या एका महिन्यात मराठवाड्यात तब्बल 76 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.यात सर्वाधिक 24 आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 20 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. कधी पावसाचा खंड तर कधी अतिवृष्टी-yामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊन त्याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. शिवाय पिकविलेल्या शेतीमालाला हमीभाव प्रमाणे दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. या गोष्टींना कंटाळून अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेत आहेत. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी आता सरकारने ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. ग्राफिक्स जानेवारी महिन्यात मराठवाड्यात कुठल्या जिल्ह्यात किती आत्महत्या झाल्या पाहुयात. - छत्रपती संभाजीनगर - 20 - जालना - 06 - परभणी - 02 - हिंगोली - 05 - नांदेड - 11 - बीड - 24 - लातूर - 03 - धाराशिव - 05 - एकूण - 76
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 23, 2026 02:46:12
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शीत शिवजयंती साजरी करत असताना दोन गटात वाद, वादात बार्शी ग्रामीण रुग्णालयाची केली तोडफोड - बार्शीत शिवजयंती साजरी करत असताना फटाके उडवण्याच्या कारणावरून दोन गटात वाद - दोन गटात झालेल्या वादावरून जोरदार हाणामारी तर दुसऱ्या गटाकडून बार्शी ग्रामीण रुग्णालयाची तोडफोड - एका गटातील तरुणांकडून दुसऱ्या गटातील महिला आणि युवकांना जबर मारहाण - जखमींवर बार्शीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू - नऊ जणांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तर चार आरोपींना अटक - दोन गटात हाणामारी झाल्याने रात्री उशिरापर्यंत एका गटाचे शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन - बार्शीत दोन गटात झालेल्या जबर मारहाणीमुळे शहरात तणावांचे वातावरण
0
comment0
Report
Advertisement
Back to top