Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

मेळघाट के मजदूर वाहन दुर्घटना: चार की मौत, सात-आठ घायल; खस्ता सड़कें जिम्मेदार

ADANIRUDHA DAWALE
Feb 23, 2026 04:03:05
Amravati, Maharashtra
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात मजूरांच्या वाहनातला भीषण अपघात; चार मजुरांचा जागीच मृत्यू, खराब रस्ते और ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन 50 फूट दरीत कोसळल्याने हा अपघात झाला आहे. अपघात चार मजुरांचा जागीच मृत्यु झाला असून सात ते आठ मजूर गंभीर जखमी झाले आहे. धारणी तालुक्यातील बेलतलाई वरून कंजूली गावी मजूर जात असताना हा अपघात झाला आहे. मेळघाटातील खराब रस्ते आणि ओव्हरलोड वाहतुकीमुळे हे अपघात झाले असल्याचा अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. होळी सणाच्या निमित्याने बाजार करण्यासाठी बेलतलाईला आदिवासी बांधव गेले असता हा भीषण अपघात झाला आहे. जखमी मजुरांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व धारणी येथे उपचार सुरू असून काही मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मेळघाटामध्ये दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा कमी असल्याने लोकांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Feb 23, 2026 05:33:55
Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात खळबळ.. एक १७ वर्षीय गतिमंद मुलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला.. लैंगिक अत्याचार करून हत्येचा संशय.. बोराखेडी पोलिसकडून तपास सुरु .. buldhana जिल्ह्यामध्ये एक खळबळजनक घटना समोर आली असून मोताळा तालुक्यातील बोराखेडी शिवारामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळला .. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असावी का ?, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे... मोताळा येथील प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागच्या गिट्टी खदान जवळ असलेल्या परिसरात घटना उघडकीस आलीय .. याप्रकरणी आता बोराखेडी पोलिसांनी तपास सुरु केलं असून शवविशेदन तसेच तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केलाय जात आहे .. गतिमंद मुलगी दोन दिवसापासून घरातून बेपत्ता होती.. मात्र सर्वत्र शोध घेत असताना तिचा मृतदेही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे ..
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 23, 2026 05:20:07
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 23, 2026 05:05:39
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Feb 23, 2026 04:46:25
Wardha, Maharashtra:वर्ध्यात कापसाने भरलेल्या बैलगाडीसह पडले विहीर: विचित्र अपघात एका बैलाचा मृत्यू एक बैल व शेतकरी जखमी समुद्रपूर तालुक्याच्या नारायणपुर (कोरा ) येथील घटना अँकर - समुद्रपूर तालुक्यातील कोरा गावाजवळील नारायणपूर येथे शेतकरी आपल्या शेतातील कापूस बैलगाडीमध्ये कापूस भरपूर घराकडे निघत असताना डुक्कराच्या मागे वाघाला पाहून बैलगाडीसह बैल विहीर कोसळले यात एका बैलाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या वाजविण्यात यश आले.शेतकरीही थोडक्यात बचावले. समुद्रपूर तालुक्याच्या नारायणपूर येथील शेतकरी श्रीधर रामकृष्ण सालवटकर वय ५५ वर्षे यांनी दिवसभर मजुरांनी वेचलेला शेतातील कापूस बैलगाडीमध्ये भरपूर निघत असतांनाच बैलगाडी समोर अचानक डुक्कराचा कळप आला डुक्करला पाहताच बैल थांबले मात्र या डुक्कराचे मागे असलेला वाघ दिसताच बैल बैलगाडीसह सैरावैरा पळायला लागले.शेतकरी श्रीधर सालवटकर यांनी प्रसंगावधान राखत बैलगाडीच्या बाजूला झाल्याने त्यांचे प्राण वाचले.असुन ते जखमी झाले. मात्र बैल जवळील असलेल्या विहीरात बैलगाडीसह बैल पडले
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 23, 2026 04:45:30
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे नुकतीच बिरबलनाथ महाराजांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. मात्र यात्रा संपल्यानंतर यात्रास्थळी मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याचे चित्र दिसून येत असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे.यात्रे दरम्यान दुकानदारांकडून लाखो रुपयांचे भाडे घेतले जाते.मात्र यात्रा संपल्यानंतर साफसफाई करण्यात प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.सध्या वाऱ्यामुळे कचरा उडत असून परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.यात्रास्थळी प्लास्टिक,अन्नपदार्थांचे अवशेष,कागद व इतर कचरा सर्वत्र पसरलेला असून त्यामुळे दुर्गंधीही निर्माण झाली आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.संबंधित प्रशासनाने तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून परिसर साफ करावा,अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
0
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Feb 23, 2026 04:22:32
Neral, Maharashtra:रायगड मधील थंड हवेचे ठिकाण आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले माथेरान आणि याच माथेरान मध्ये पर्यटकांच्या सेवेत रुजू झालेल्याई रिक्षा चालकांकडून आजपासून बेमुदत संप पुकारण्यात आलाय. माथेरान मधील अमानवी प्रथा असलेल्या हात रिक्षा चालकांच्या हाती सुद्धा ई रिक्षाचे स्टिअरिंग यावे याकरिता तब्बल 94 ई रिक्षांना मंजुरी देण्यात आली होती मात्र अस असताना 20 ई रिक्षा या रस्त्यावर धावत आहेत. दुसरीकडे माथेरानढोल ही अमानवी प्रथा बंद व्हावी याकरिता सर्वोच्च न्यायालयाने संनियंत्रण समितीला सर्व मजुरांना ई रिक्षा मिळावी असे आदेश दिले होते मात्र अद्याप ही सुविधा मिळत नसल्याने आजपासून येथील स्थानिकांनी संनियंत्रण समिती विरोधात संताप व्यक्त करत संप पुकारलाय.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 23, 2026 04:15:38
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 23, 2026 04:03:20
Shirdi, Maharashtra:साईबाबाच्या शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी अतिरिक्त पुलिस कुमक तैनात... कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस पथकाची स्थापना... बाहेरच्या राज्यातील गुन्हेगारांवर असणार लक्ष ; आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई... दहा दिवसांत सुमारे 70 पाकीटमारांवर कारवाई... नियमभंग करणाऱ्या हॉटेल चालकांवर कठोर कारवाईचा इशारा.. वेश्या व्यवसाय करणारी हॉटेल्स सील करण्याची तयारी... हॉटेल चालकांवर बाल लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा करणार दाखल... शिर्डीत बेकायदेशीर एजंट, हार-प्रसाद विक्रेत्यांवर विशेष नजर... पोलिस जिल्हा अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 23, 2026 04:01:56
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- उन्हाळ्याची चाहूल लागताच चंद्रपुरात वनविभाग वणवा नियंत्रण कार्यक्रमासाठी झाला सज्ज, ग्राम परिस्थितीकी विकास समिती आणि वनविभागाने संयुक्तपणे सुरू केला फायर लाईन खबरदार कार्यक्रम, वणवा लागू नये यासाठी विविध स्तरावर केल्या जात आहेत उपाययोजना अँकर:--उन्हाळ्याची चाहूल लागताच चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिघात वनविभाग वणवा नियंत्रण कार्यक्रमासाठी सज्ज झालाय. ग्राम परिस्थितीकी विकास समिती आणि वनविभागाने संयुक्तपणे फायर लाईन खबरदार कार्यक्रम सुरू केलाय. वणवा लागू नये यासाठी विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या सितारामपेठ येथे वनविभागाने अशा पद्धतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. वणवा संपूर्ण जैवविविधतेचा शत्रू आहे. यामुळे वन्यजीव गावाकडे कूच करतात. त्यामुळेच तो वेळीच नियंत्रणात आणणे व त्यासाठी उपाय योजना करणे या संदर्भात वनविभागाने बीट आणि वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय स्तरावर स्वतंत्र पथकांची निर्मिती करत त्यांना साहित्य देण्यात आले आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. बाईट १) संतोष थिपे, वनपरिक्षेत्राधिकारी, मोहर्ली आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 23, 2026 03:48:29
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्याला मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती महेंद्र नेरलीकर, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आदींची उपस्थिती होती. सर्व योजना एकाच छताखाली देण्याचे नियोजन असल्यामुळे विविध 40 स्टॉल उभारले गेले. याशिवाय योजनांचा लाभ त्वरित देण्याचे नियोजन सुद्धा करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून लोकांपर्यंत योजना पोहोचविण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. देशाचा प्रत्येक नागरिक हा घटनेचा संरक्षक आहे. मूलभूत अधिकारांची माहिती प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. न्याय प्रत्येकाला मिळाला पाहिजे, हे घटनेचे मूलभूत तत्व आहे. केवळ लाभार्थी म्हणून थांबू नका तर योजनांची माहिती इतरांनाही द्या.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 23, 2026 03:47:10
Ahilyanagar, Maharashtra:रोहित पवार की सुरक्षा के लिए निलेश लंके की मांग, तनाव बढ़ने की आशंका निलеш लंके ने रोहित पवार को सुरक्षा दिए जाने की मांग की है। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार के निधन के बाद राष्ट्रवादी कांग्रेस के नेताओं के बीच विलीनीकरण को लेकर राजनीतिक बहस तेज हो गई है, और लंके ने इस घटनाक्रम को घातपात की तरह देखने की बात कही है। विलीनीकरण पर सभी चर्चाओं के बारे में लंके ने कहा है कि वह चर्चा पूरी तरह समाप्त हो चुकी है और हम सभी एक साथ प्रचार करते रहे, यह उनका कहना रहा। कर्जमाफी के बारे में महायुती ने कानूनी घोषणा की थी, लेकिन अभी तक कर्जमाफी लागू नहीं हुई है; कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे ने जल्द कर्जमाफी की बात कही है। लंके ने सरकार से जल्द से जल्द कर्जमाफी की माँग की है। मढी यात्राकानफीनाथा के दौरान धारा-रोजगार में मुस्लिम व्यापारियों पर रोक के बारे में लंके ने कड़ा विपक्ष किया है; जातिवाद के आरोप लगा कर कुछ लोग अपनी राजनीति चमकाने की रणनीति पर भी निशाना साधा गया। अहिल्यानगर के पारनेर में कृषी प्रदर्शन का आयोजन किया गया था, जिसमें ग्रामीण शेतकऱ्यां को विभिन्न तकनीकों के बारे में जानकारी देने का प्रयास किया गया।
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 23, 2026 03:33:52
Bhandara, Maharashtra:गोंदिया जिल्ह्यात सकाळपासून अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात बदल जाणवला. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या चना, वटाणा आणि लाखोरी, गहू ही पिके काढणीच्या टप्प्यावर आली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कापणीची तयारीही सुरू केली होती मात्र अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ओलाव्यामुळे धान्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, तसेच उत्पादन घटण्याची भीती आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडेलेला शेतकरी पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या संकटात संपडला आहे त्यामुळे वेळीच प्रशासना ने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे
0
comment0
Report
Advertisement
Back to top