Back
परसूल की चिंचोली नदी में अज्ञात पुरुष की हत्या, शव डंबेल से बंधा मिला
SKSudarshan Khillare
Feb 23, 2026 03:04:42
Chandwad, Maharashtra
चांदवड तालुक्यातील परसूल येथील चिंचोली नदीत काल (दुपारी) एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला प्राथमिक तपासात हा मृत्यू अपघाती नसून हत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे निफाड–चांदवड रोडवरील चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात फुगलेल्या अवस्थेत हा मृतदेह तरंगताना आढळून आला मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याचे हात एकमेकांना नायलॉन दोरीने बांधून ते मांडीला बांधलेले असल्याचे दिसून आले तसेच मृताच्या कमरेस सुमारे 20 ते 30 किलो वजनाचे डंबेल्स बांधलेले होते याशिवाय मयताचे तोंड कपड्याने बांधलेल्या अवस्थेत असल्याने हा खून असल्याची शक्यता अधिक बळावली आहे मृत व्यक्ती अंदाजे 35 ते 40 वर्षे वयोगटातील अज्ञात पुरुष असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी परसूल येथील पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे चांदवड पोलीस पुढील तपास करत आहेत दरम्यान, घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलीसांकडून सुरू आहेत
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MAMILIND ANDE
FollowFeb 23, 2026 04:46:250
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 23, 2026 04:45:300
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowFeb 23, 2026 04:22:320
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 23, 2026 04:15:380
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 23, 2026 04:03:200
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 23, 2026 04:03:050
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 23, 2026 04:02:100
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 23, 2026 04:01:560
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 23, 2026 03:48:290
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 23, 2026 03:47:100
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 23, 2026 03:36:090
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 23, 2026 03:33:520
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 23, 2026 03:32:560
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 23, 2026 03:15:350
Report
PNPratap Naik1
FollowFeb 23, 2026 03:05:200
Report