Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

Marathwada का अजीब मौसम: बेमौसम बारिश-गजरा से लाखों हेक्टेयर फसलों का भारी नुकसान

VBVAIBHAV BALKUNDE
Feb 25, 2026 08:09:07
Latur, Maharashtra
मराठवाडा में अवकाळीचा तडाखा… हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान. एकट्या लातूर जिल्ह्यात तब्बल १५ हजार हेक्टरवरील शेती बाधित. वादळ, पाऊस आणि गारपिटीचा चांगलाच तडाखा मराठवाड्यात. लातूरसह बीड, परभणी, नांदेड, धाराशिव और हिंगोली जिल्ह्यात अवकाळीने नुकसान. हाता-तोंडाशी आलेली पिकं क्षणात जमीनदोस्त; गहू, ज्वारी आडवी पडली, हरभरा भिजला. जिल्ह्यांत हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त. पंचनाम्याचे आदेश दिले, पण शेतकरी पंचनाम्याची प्रतीक्षा. रंगराव काळे (कारला, लातूर) यांच्या पेरणीसाठी पैसे नसल्याने पत्नीच्या कानातील झुमके विकून शेतीची मशागत केली; पेरणीनंतर अवकाळी पावसाने नुकसान. पिके उद्ध्वस्त, आणखी प्रश्न तेच — शिक्षणाचा खर्च, घर चालवणे, पुढची पेरणी कशी करायची. पंचनामे तात्काळ करावे आणि मदत तात्काळ द्यावी अशी मागणी. जिल्हानिहाय नुकसानाचा प्रारम्भिक अंदाज: परभणी 4900-5000 हेक्टर, नांदेड 70-80, लातूर 15000-15119, बीड 3400-3409, धाराशिव 40-50. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत; मदतची घोषणा झाली असली, प्रत्यक्ष पंचनामे आणि मदत कधी मिळेल हा सवाल.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Feb 25, 2026 11:03:46
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 25, 2026 10:20:17
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 25, 2026 10:01:49
Dharashiv, Maharashtra:तुळजाभवनी कृषी महोत्सवात ‘बबल्या’ बोकड ठरला स्टार आकर्षण तब्बल ८० किलो वजनाचा उस्मानाबादी बोकड पाहण्यासाठी गर्दी. चार किलोचा गिरीराज कोंबडा देखील भाव खातोय. अँकर : धाराशिव जिल्ह्यात सध्या एका बोकडाची आणि एका कोंबड्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तुळजापूरच्या तुळजाभवनी कृषी महोत्सवात ८० किलो वजनाचा ‘बबल्या’ बोकड आणि चार किलोचा गिरीराज कोंबडा चांगलाच भाव खात आहेत. पाहूया या अनोख्या आकर्षणांवरचा हा खास रिपोर्ट. यावर्षीचा महोत्सव एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. उस्मानाबादी जातीच्या बोकडांनी येथे विशेष लक्ष वेधले आहे. ‘बबल्या’ नावाचा तब्बल ८० किलो वजनाचा बोकड प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. शेतकरी आणि नागरिकांची बबल्या पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असून, तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील शेतकऱ्याचा हा बोकड आहे. याचबरोबर ७५ आणि ६० किलो वजनाचे बोकडही प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. फक्त बबल्या बोकडाचीच नाही, तर चार किलो वजनाच्या गिरीराज कोंबड्याची देखील प्रदर्शनात चांगलीच हवा आहे. विजनवाडी येथील शेतकरी पांडुरंग माने यांचा हा कोंबडा महोत्सवातील आकर्षण ठरत आहे. कोंबड्याची किंमत बाराशे ते पंधराशे रुपयांच्या घरात असली, तरी प्रदर्शनात मात्र त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी उत्सुकता दिसून येत आहे. उस्मानाबादी शे Pili आणि अस्सल गावरान कोंबडा त्यांच्या मटणाच्या चवीसाठी राज्यभर प्रसिद्ध आहेत. उस्मानाबादी शेळीला देश-विदेशातून मागणी वाढत आहे. अशा कृषी महोत्सवांच्या माध्यमातून उस्मानाबादी शेळीचे ब्रॅण्डिंग करून तिला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न कौतुकास्पद आहे. ज्ञानेश्वर पतंगे, झी २४ तास, धाराशिव
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 25, 2026 10:00:18
Amravati, Maharashtra:मराठी शाळा वाचवण्यासाठी AISF च्या नेतृत्वात विद्यार्थी उतरले रस्त्यावर; हाथात संविधान घेत फुले, शाहू, आंबेडकरांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे या विरोधात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्या नेतृत्वात अमरावतीत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळा बंद ठेवत फुले, शाहू, आंबेडकर यांच्या वेशभूषा साकारत हातात संविधानाची पुस्तक घेत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. यावेळी मोर्चादरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, पटाच्या आधारावर शिक्षकांची संख्या ठरवणारे धोरण रद्द करावे, कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद समायोजन करण्याचे शासन निर्णय रद्द करावे, शिक्षकांना अध्यापन व्यतिरिक्त इतर कामावर गुंतवणूक नये, हिंदी विषय सक्तीचा लादु नये, केरळ राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत करावे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला या संदर्भात मोर्चा नंतर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देण्यात आलं.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 25, 2026 09:52:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : एखाद्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या माणसाकडे किती संपत्ती असू शकते, जेमतेम घर चालवणारा एक सर्वसामान्य समज मात्र संभाजी नगरात एक असा गाडी चालक आहे त्यावर तब्बल 1600 कोटी रुपयांचा मालक असल्याचा आरोप आहे हा चालक आहे संभाजी नगरचे खासदार संदीपण भुमरे यांचा, पाहुयात काय आहे प्रकार... Vo 1... एक गाडी चालक तब्बल 1600 कोटींचा मालक ? चालक जावेद शेख 1600 कोटीचा धनी ? 2 जमीन घोटाळ्यात 1600 वर कोटींचा मालक असल्याचा आरोप कोट्याधीश चालक खासदार भूमरेचा कर्मचारी ! हा आहे जावेद शेख, व्यवसायाने हा खासदार संदीपण भुमरे यांचा गाडी चालक, गेली 15 ते 20 वर्ष हा इसम भुमरे यांची गाडी चालवतो मात्र गेली वर्षभरात हा चांगलच प्रकाश झोतात आलाय, तो ही तब्बल 1600 कोटी साठी... ubt नेते अंबादास दानवे यांनी या चालकाच्या नावावर शासनाचे भुमरे यांनी तब्बल 1150 कोटी गिळायचा डाव रचला असा आरोप आहे यामागे खासदार आमदार भुमरे पितापुत्र असल्याचा त्यांचा आरोप आहे , आणि याची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे... Byte अंबादास दानवे ( कालच्या पीसीचा bytte Vo 2.. कोण आहे जावेद शेख भुमरे यांचा गाडी चालक जावेद पुंडलिक नगर भागात 20 बाय 30 चे पत्र्याचे घर आहे माहितीनुसार जावेदला 25 हजार पगार आहे, आणि जावेद ला वडिलोपार्जित कुठलीही संपत्ती मिळाली नाहीय... या आरोपनंतर चालक जावेद शेख ही भडकला, आणि माझ्यावर होत असलेले आरोप खोटे असल्याचा सांगत मी अंबादास दानवे यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचं जावेद शेख याचं म्हणणं आहे बरं याच जावेद शेखवर सहा महिन्यान आधी शहरातील एक मोक्याची जागा ज्याची किंमत 500 कोटी होती तिचाही हिबानामा याच्या नावावर आहे आणि तीही जमीन खासदार भुमरे यांनीच लाटली असल्याचा आरोप आहे मात्र जावेद शेख हे सगळे आरोप फेटाळतोय.. Byte जावेद शेख, चालक Vo 3.. अब चालकावर आरोप झाले त्यामुळे खासदार महोदयही भडकले आणि त्यांनीही तातडीने पत्रकार परिषद घेत हे सगळे आरोप फेटाळले आणि माझं नाव अंबादास दानवे यात गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची मानसिक परिस्थिती बिघडली आहे आणि त्यामुळे भुमरे यांनीही अंबादास दानवेवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असं सांगितलं... Byte संदीपण भुमरे, खासदार Vo 4... मूळ प्रश्न असा की जावेद हा एक चालक आहे मग त्याच्यावर आधी 500 कोटींच्या जमिनीचा मालक असल्याचा आरोप होतोय तर नंतर 1150 कोटी गिळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय आणि या सगळ्या मागे खासदार भुमरे असल्याचाही आरोप होतोय या प्रकरणांची चौकशी सुरू आहे आणि ती संपेल ही मात्र या सगळ्यात एक चालक मात्र सोळाशे कोटींच्या मालक असल्याची चर्चा मात्र जोरदार रंगतेय... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 25, 2026 09:43:08
Kolhapur, Maharashtra:Kop Mahayuti Waad Feed:- 2C Anc:- कोल्हापूर महानगरपालिकेत महायुती मधील शिवसेना गटनेते आणि राष्ट्रवादी गटनेत्यामध्ये जोरदार हमरी तुमरी झालीय. शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी गटनेते आदिल फरास यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि आयुक्तांसमोर एकमेकांना बघून घेण्याची भाषा केलीय. महायुती मध्ये पदाच्या फार्म्युल्यानुसार वाद सुरू झाला आहे. गेले काही दिवस शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी गटनेते आदिल फरास यांच्यामध्ये वाद सुरू आहे. याचेच पडसाद कोल्हापूर महानगरपालिकेत अतिक्रमण मुद्द्यावरून आयोजित केलेल्या बैठकीत पाहायला मिळाले. या दोघांमध्ये वाद इतक्या टोकाला गेले की शेवटी महापौर रुपाराणी निकम यांनी हस्तक्षेप करत दोघांना मोठ्या आवाजात शांत राहण्याचे आवाहन केले, तरी देखील एकमेकांनी एकमेकाला बघुन घेण्याची भाषा वापरली. महानगरपालीक घडलेल्या या प्रकारामुळे महायुती मध्ये सर्वकाही अलबेल नसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 25, 2026 09:32:45
Solapur, Maharashtra:सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या अल्पसंख्याक जिल्हाप्रमुखांची सिनेस्टाईल गुंडागर्दी. ऑफिसच्या बाजूला गाडी लावण्याच्या झालेल्या वादातून थेट चारचाकी गाडीचं फोडफोड झाली. शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मुस्ताक शेख यांचे गाडी फोडतानाचे व्हिडिओ व्हायरल. सोलापुरातील बेगम पेठ परिसरात मुस्ताक शेख यांच्या संपर्क कार्यालय आहे. कार्यालयाच्या पाठीमागे अफसर शेख आपल्या कुटुंबासह राहतात. अफसर शेख यांनी आपली चारचाकी गाडी मुस्ताक शेख यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाजूला उभी केली होती. गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाला; मुस्ताक शेख यांनी अफसर शेख यांच्या गाडीचं फोडून टाकले. दरम्यान शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मुस्ताक शेख यांनी महिलांना शिवीगाळ केली असल्याची माहिती मिळाली असून विनयभंगचा गुन्हा दाखल करायचा प्रस्ताव आहे. बेगम पेठ येथील रहिवाशी यांनी गाडी नुकसान भरण्याचे मागणी केली. (दरम्यान मुस्ताक शेख यांच्या बाजूंची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते रुग्णालयात असल्याचे सांगितले गेले).
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 25, 2026 09:19:03
Jalna, Maharashtra:जालना : मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी सरकारने परिपत्रक काढावे विखेंनी मराठा समाजावर गैरविश्वास दाखवू नये-जरांगे मनोज जरांंगे यांची मागणी अँकर : मराठा समाजाला भाजप पासून तुटवू द्यायचं नसेल तर माझ्या नादेला लागू नका,अन्यथा 2029 साली होणाऱ्या निवडणुकीत याची प्रचिती बघा असा ईशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारसह राधाकृष्ण विखे पाटलांना दिलाय.सातारा संस्थानच्या गॅझेटीयरचा जी.आर कधी काढणार?असा सवाल देखील जरांगे यांनी विखेंना केलाय.विखेंनी समाजाचा विश्वास सार्थ ठरवावा विखेंनी त्यांची प्रतिमा समाजात खराब होऊ देऊ नये असा ईशारा देखील जरांगे यांनी विखेंना दिलाय.अधिकारी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत नसल्यानं सरकारने परिपत्रक काढावे अशी मागणीही जरांगे यांनी केली आहे. बाईट : मनोज जरांगे पाटील
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 25, 2026 08:51:12
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 25, 2026 08:50:35
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील युवक मावा खाण्याच्या आहारी, माव्यामुळे होतोय कॅन्सर सारखा भयंकर आजार ( PKG ) - सोलापुरातील हजारो युवक अडकले मावा खाण्याच्या व्यसनात - शहरात पावलोपावली 10-15 रुपयांमध्ये मिळतोय मावा - मावा खाल्ल्याने कॅन्सर होऊन अनेक युवकांचे आयुष्य उध्वस्त - अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सुपारी पासून बनलेल्या माव्याची तरुणांना भुरळ Anchor - सोलापुरात मावा हा व्यसनाचा प्रकार अत्यंत गंभीर बनला आहे. हजारो युवकांचा दिवस हा मावा न खाता जाणे अशक्य झाले आहे. सोलापुरात अगदी टप्प्याटप्प्यावर अगदी सहज रीतीने हा मावा उपलब्ध होतो. मावा म्हणजे काय ? मावा म्हणजे अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सुपारीपासून बनवलेला अत्यंत शरीराला घातक असणारा घटक आहे. हा मावा बनवताना चुना, कात, पाणी, विशिष्ट प्रकारचे द्रव्य वापरले जाते. इतकेच काय तर अनेक ठिकाणी माव्यामध्ये गांजाचे पाणी देखील वापरले जात असल्याची माहिती पुढे येतेय. राज्यात एकीकडे गुटखा विक्रीसाठी बंदी असताना दुसरीकडे सोलापुरात मात्र हा मावा तरुणांसाठी प्रिय बनलाय... मावाचे व्यसन ज्याला जडले आहे तो तरुण दिवसातून कमीत कमी दोन ते तीन पाकीट तरी संपवतोच. काही कारणाने मावा न मिळाल्यास तरुण अक्षरशः चलबिचल होतात हे वास्तव आहे. त्यामुळे मावा विक्री करणाऱ्यांवर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. बाईट - महेश धाराशिवकर ( सामाजिक कार्यकर्ते ) सोलापुरातील एका युवकाला वर्षानुवर्षे मावा खाल्ल्याने त्याला कॅन्सर सारख्या गंभीर आजार झाला आहे. सध्या योग्य उपचार घेतल्याने हा युवक मरणाच्या दारातून परत आलाय. याच युवकांनी आता मावा प्रेमींसाठी प्रेमाचा संदेश दिलाय... मावा खाल्ल्याने त्याचा शरीरावर किती वाईट परिणाम होतो कशा पद्धतीने कॅन्सर सारखा आजाराचा सामना करावा लागतो याबाबत युवकाच्या तोंडूनच आपबीती जाणून घेऊयात.... बाईट - संतोष हवीनाळ ( मावा खाल्याने कॅन्सर झालेला युवक ) मावा खाल्ल्याने कॅन्सर सारखा भयंकर आजार होऊ शकतो याची कल्पना असताना देखील हजारो तरुण माव्याची साथ सोडायला तयार नाही. या मावळ्यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट सारखे भयंकर घटक असल्याने ते कॅन्सर शरीरात जगण्यासाठी मदत करतात अशी माहिती тज्ञ डॉक्टरांनी दिली आहे. बाईट - डॉ. सचिन पुराणीक ( तज्ञ डॉक्टर ) End P2C सोलापुरात सहज रितीने मिळणारा मावा तितक्याच सहजरतीने तरुणांचे आयुष्य बरबाद करतोय... त्यामुळे तरुणांनी वेळीच सावध होणं हे काळाची गरज आहे.... अभिषेक आदेप्पा, सोलापूर प्रतिनिधी
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 25, 2026 08:50:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा देणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल आयडेंटिटी स्कॅनरचा प्रयोग यशस्वी झाला आहे. मुले शाळेत पोहोचली का और शाळेतून घरी निघाली का? यह पालकांना भेडसवणारी चिंता जिल्हा परिषद शाळेने सोडवली आहे. सांगली के अलकुड एम के जिल्हा परिषद शाळेने हा डिजिटल आयडेंटिटी स्कॅनर पायलेट प्रोजेक्ट राबवला. या प्रकल्पात प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयडेंटिटीवर डिजिटल स्कॅनर देण्यात आला. शाळेत प्रवेश/निघण्यावर स्कॅन केला जातो आणि पालकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज जाते. पालकांची आणि शिक्षकांची चिंता कमी झाली. गावातील या प्रकल्पाचा फायदा इतर शाळांसाठी देखील संभव असेल.
0
comment0
Report
Advertisement
Back to top