Back
लातूर के सरकारी स्कूल में 8-9 वर्ष के बच्चों ने अश्लील वीडियो देखकर साथी पर किया अनैतिक हमला
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 15, 2025 09:53:33
Latur, Maharashtra
लहान मुलांच्या हातातील मोबाईल किती धोकादायक ठरू शकतो याचं गंभीर उदाहरण लातूरमध्ये समोर आलं आहे. पालक मुलांना मोबाईल देतात… पण त्यावर ते काय पाहतात याकडे लक्ष न गेल्यानं त्याचे विनाशकारी परिणाम आता दिसू लागले आहेत. तिसरीतील विद्यार्थ्यानं सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर—वर्गमित्रावरच अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणानं शाळेत खळबळ उडाली असून… लहान मुलांच्या मोबाईल वापरावर पालकांचं नियंत्रण सुटलं आहे का, हा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
लहान मुलंच मोबाईलच्या आहारी गेले आहेत. आता मोबाईलचा समावेश आहे. मात्र मोबाईलमध्ये मुलं काय बघतात? त्यांचे काय सुरू आहे? यावर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लातूरमध्ये जी घटना घडली आहे, ती पालकांची चिंता वाढवणारी आहे. लातूर शहराजवळ असलेल्या एका सरकारी शाळेतच ही घटना घडली आहे. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थांनी केलेला घृणास्पद प्रकारामुळं एकच गोंधळ उडाला आहे. तिसरीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी त्याचे वयच साधारण 8-9 वर्षे असेल. या वयात अभ्यास, खेळणे आणि दंगा करण्याचे सोडून या विद्यार्थ्यांनी वर्गमित्रावरच अश्लील व्हिडिओ पाहून अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने पालकही भेदरले असून शाळा प्रशासनातही खळबळ उडाली आहे.
प्रताप शिंदे ( पालक )
लहान मुलांचं मेंदूचं वय अतिशय संवेदनशील असतं… ते पाहिलेलं त्वरित कॉपी करतात. अश्लील किंवा हिंसक कंटेंट त्यांना काय चूक आणि काय बरोबर हे समजण्याआधीच खोल परिणाम करतो. पालकांनी मुलांना मोबाईल देताना वेळ, कंटेंट आणि वापर यावर कडक नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक असल्याचं तज्ञ स्पष्ट सांगतात.
डॉ. मनोजकुमार भडके
ही घटना इतकी गंभीर आहे की… मोबाईल मुलांच्या हातात दिल्यानंतर जबाबदारी संपत नाही ती तेव्हाच सुरू होते. अशा घटनांपासून बचाव करायचा असेल, तर पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर सतत लक्ष ठेवणं, स्क्रीन टाइम नियंत्रित करणं आणि त्यांच्याशी मुक्त संवाद ठेवणं या तीन गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत.
वैभव बालकुंदे
ZEE 24 TAAS Latur
164
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 15, 2025 11:48:110
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 15, 2025 11:38:4518
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 15, 2025 11:32:4347
Report
AKAMAR KANE
FollowNov 15, 2025 11:23:3578
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 15, 2025 11:06:1789
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 15, 2025 11:00:3572
Report
SNSWATI NAIK
FollowNov 15, 2025 11:00:1490
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 15, 2025 10:53:2754
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 15, 2025 10:53:15104
Report
KJKunal Jamdade
FollowNov 15, 2025 10:40:1358
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 15, 2025 10:39:5393
Report
ABATISH BHOIR
FollowNov 15, 2025 10:18:48144
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 15, 2025 10:03:3542
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 10:02:55190
Report
AKAMAR KANE
FollowNov 15, 2025 09:57:5997
Report