Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109
बिहार परिणाम के बाद महाराष्ट्र में सत्ता-चर्चा तेज, ईवीएम-चोरी पर बहस गरम
KJKunal Jamdade
Nov 15, 2025 10:40:13
Shirdi, Maharashtra
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साई दर्शनासाठी साई दरबारी... आ.अमोल खताळ हे देखील उपस्थित... बाईट पॉईंटर्स - शिर्डीला आल्यानंतर साईबाबांचे दर्शन आणि आशिर्वाद घेण्याची प्रत्येकाची भावना... महाराष्ट् यााच्या समृद्धीसाठी , आरोग्य संपन्नेसाठी साईबाबांकडे आशिर्वाद मागितले... ऑन बिहार निकाल - महाराष्ट्रात ज्या पद्धतीने निकाल लागले त्यानंतर जे आरोप - प्रत्यारोप झाले त्याला उत्तर बिहार निवडणुकीतून मिळालय... जनतेच्या मनात जे असतं तोच निर्णय लागतो.. वोट चोरी , ईव्हिएम मशिन , यापेक्षाही जनता ग्रेट.. ऑन आगामी निवडणुका - ज्या पद्धतीने बिहार मध्ये यश मिळालय त्याच पद्धतीने महायुतीला निश्चितपणे यश मिळेल.. त्या दृष्टीने राज्याचे तिनही प्रमुख नेते आम्हा सर्वांना करतायत... पुढच्या तिनही निवडणुकांमध्ये तसा रिझल्ट मिळेल... ऑन संजय राऊत ट्विट - महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मोठा विजय मिळाला त्यानंतर वोट चोरी , ईव्हिएम मध्ये दोष असे वेगवेगळे आरोप लावण्यात आले... कालचा बिहारचा ज्या पद्धतीने निकाल लागला त्या आरोपांची सर्व उत्तरे मिळालीत... ऑन बिबटयांचे वाढलेले हल्ले - जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीवर वावर वाढतोय हा काळजीचा विषय.. सुप्रिम कोर्टाचे जे निर्देश आहे त्यावर केंद्र आणि राज्य सरकारने निर्णय घेणे गरजेचे... कोर्टाला देखील ते निदर्शनास आणुन देण गरजेचे आहे... बिबटयांची वाढती संख्या यावर उपाययोजना करणे गरजेचे...
134
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HPHARSHAD PATIL
Nov 15, 2025 12:20:07
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 15, 2025 12:19:44
30
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 15, 2025 12:05:09
Baramati, Maharashtra:पुण्याच्या इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग..... जिल्हाध्यक्ष गारटकरांच्या विरोधाला डावलून भरत शहांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भरत शहा यांना उमेदवारी......माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी दाखल केली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी.... कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आणखी एक अर्ज दाखल करणार.... राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करणार... पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या भूमिकेकडे लक्ष....भरत शहा यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीला गारटकर यांचा विरोध कायम.... Date 15 Nov 25 Anchor_ इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज भरत शहा यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. *मुदत संपण्याच्या आत भरत शहा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांसह इतर नेते मंडळींच्या उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन करीत आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.* इंदापूर नगरपालिका अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कोणाला उमेदवारी देणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागलं होतं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून यावरती शिक्कामोर्तब झाले असून भरत शहा यांना इंदापूर नगरपालिका अध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे जिल्हाध्यक्ष गारटकर यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना अजित पवार गटात घेऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यास अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. असं असताना ही पक्षाने जिल्हाध्यक्ष गारटकर विरोधी भूमिका घेत भरत शहा यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कायम केली आहे.आज भरत शहा यांनी इंदापूर नगर नगरपालिका परिषदच्या नगराध्यक्ष पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्या भूमिकेकडे लक्ष... इंदापूर नगरपालिका परिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचन्द्र पवार पक्षात असलेले इंदापूर नगरपालिका परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यास पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर आणि त्यांच्या समर्थकांचा प्रचंड विरोध आहे. नगराध्यक्ष पदाचा हा तिढा सोडवण्यासाठी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यात दोन दिवसापूर्वी बैठक पार पडली. मात्र या बैठकीत देखील जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या इच्छेप्रमाणे तोडगा निघाला नाही. त्यानंतर जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी इंदापूर मध्ये त्यांच्या निवासस्थानी दाखल होत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत जर पक्षाने गारटकर समर्थक विरोधी भूमिका घेतली तर मात्र आपल्या पदाचा राजीनामा देऊ आणि इंदापूर मध्ये स्थानिक आघाडी करून नगर परिषदेची निवडणूक लढवू असा पवित्रा गारटकर आणि त्यांच्या समर्थकांनी घेतला. एकूणच नगराध्यक्ष पदाच्या मुद्द्यावरून गारटकर यांनी पक्षाला रामराम ठोकण्याची तयारी देखील दर्शवली आहे. जर पक्षाने आपल्या विरोधी निर्णय घेतला तर स्थानिक आघाडी करून निवडणुकांच्या आखाड्यात उतरू, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू आणि राजीनामा देऊ.जर पक्षाने आमचं ऐकलं,योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळा वरती आहोत पक्षाने जर आम्हाला कोलल तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही.असा थेट इशाराच इंदापूरातून जिल्हाध्यक्ष गारटकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इंदापूरचे आमदार राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिलेला आहे. एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर कोणती भूमिका घेणार ? पक्षाला सोडचिट्टी देणार की अन्य मार्ग अवलंबणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गारटकर पाटील माने आघाडीतून मंत्री भरणेंपुढे उभे केले जाणार आव्हान.... इंदापूर मध्ये शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते प्रवीण माने आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या स्थानिक आघाडीची चर्चा सुरू झाली असून इंदापूर मध्ये यातून एक नव समीकरण पाहायला मिळेल. गेले कित्येक वर्ष एकमेकांच्या विरोधात असलेले गारटकर आणि पाटील या नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येत मानेंना सोबत घेत दत्तात्रय भरणे यांच्या समोर 2029 साठी मोठं आव्हान उभा करतील अशी चर्चा आता तालुक्यात रंगू लागली आहे.
56
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 15, 2025 11:38:45
Dhule, Maharashtra:Anchor - धुले जिल्ह्यातील शिरपूर वरबाडे नगर परिषदेाच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या वतीने माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल यांच्यासह चिंतनभाई पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरपूर वरवडे नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी भाजपाच्या वतीने संकल्प मेळावा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षांपासून शिरपूर वरवडे नगर परिषदेवर माजी मंत्री अमरीश पटेल यांचा वर्चस्व असून याही निवडणुकीमध्ये अमरीश पटेल यांचे बंधू भूपेश पटेल तसेच चिरंजीव चिंतन पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान गेल्या 40 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा शिरपूरकर भाजपालाच भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास यावेळी माजी मंत्री अमरीश पटेल यांनी व्यक्त केला आहे. तर होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये शिरपूर नगरपालिकेसह जिल्ह्यातील चारही नगरपरिषदेवर भाजप महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केला.
18
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 15, 2025 11:32:43
47
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 15, 2025 11:23:35
Nagpur, Maharashtra:नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. (बाईट) - एक्सयो यांनी लॉजिस्टिक मध्ये दोन हजार कोटी रुपये गुंतवलेले आहे अत्यंत भव्य लॉजिस्टिक पार्कची निर्मिती केलेली आहे..जवळपास दहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.. - ब्लॅक स्टोनसारख्या मोठ्या संस्थेने एफडीआयची गुंतवणूक या ठिकाणी आणलेली आहे. नागपूर मध्यवर्ती असल्याने, देशाच्या इतिहासाचा मोठा वाटा यामध्ये आहे. आम्ही नवीन लॉजिस्टिक पॉलिसी तयार करताना नागपूरला मोठा दर्जा दिलेला आहे. या गुंतवणुकीमुळे लॉजिस्टिक मोठी इकोसिस्टीम तयार होणार आहे. सप्लाय चेन मध्ये सहभागी पाहिजे आहे त्याकडे पुढे जाऊ.. (On वाढवण बंदर समृद्धीला जोडणारा) - वाढवण बंदर हे जगातील पहिल्यादा बंदरामध्ये एक आहे...समृद्धी हायवे पासून डेडिकेटेड एक्स Access रोड आम्ही तयार करत आहे. त्याचा नकाशा मान्य केलेला आहे. हा बंदर जोडल्या गेल्यामुळे हे लॉजिस्टिक पार्ट असतील किंवा इंडस्ट्रीअसतील त्याला फायदा होणार आहे.. - महाराष्ट्रमध्ये लॉजिस्टिक पॉलिसी तयार केली आहे. कुणाकडे जमिनी असतील इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था तयार करणे यातून आपल्याला यश मिळत आहे. On शक्तीपीठ महामार्ग - शक्तिपीठ महामार्गाकडे आपण चाललो आहोत. 70% अलाइनमेंटचे काम पूर्ण झाले आहे. तीन टक्के अलाइनमेंट मध्ये दोन पर्याय समोर आलेले आहे. त्यातील दोन पर्याय आम्ही लवकर स्वीकारणार आहोत. थोड्याच अंतराचा तो पर्याय आहे. त्यामुळे कुठले काम आता अडलेलं नाही. लवकरच पैसे देऊन जागा अधिग्रहण केली जाईल. - नागपूर एअरपोर्ट संदर्भातील सगळेच अडथळे संपलेले आहे लवकर काम सुरू होईल.
78
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 15, 2025 11:06:17
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात सुरू झाले तीन दिवस चालणारे अकरावे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन , मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित संमेलनात राज्यातून आपल्या प्रोजेक्टसह 100 विद्यार्थी 50 शिक्षक झाले सामील, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशी, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातल्या लोकमान्य शाळेत तीन दिवस चालणारे अकरावे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन प्रारंभ झाले. मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित संमेलनात राज्यातून आपल्या प्रोजेक्टसह 100 विद्यार्थी 50 शिक्षक सामील झाले. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशी, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. मानसी राजाध्यक्ष यांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते मॉडेल आणि पोस्टर प्रदर्शनीचे उत्साही उद्घाटन झाले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये बाल वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे महत्त्वाचे आहे असे सांगत गेली अनेक वर्षे संशोधनाच्या कार्यामध्ये मग्न असताना परदेशी संशोधनापेक्षा भारतात होणारे संशोधन अधिक सरस असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण आणि जेष्ठ वैज्ञानिक डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी केले. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रांच्या श्रेणीत न्यायचे आहे. त्यासाठी देशाचे दरडोई उत्पन्न वाढवावे लागणार असून हे शक्य करण्यासाठी विज्ञान-संशोधन याची कास धरावी लागेल. म्हणजेच विज्ञानाची शेती करावी लागणार असून बाल आणि युवा विज्ञान संमेलने हा टप्पा नावीन्यतेच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचे डॉ. जोशी म्हणाले. बाईट १) डॉ. ज्येष्ठराज जोशी, शास्त्रज्ञ आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
156
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 15, 2025 11:00:35
72
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 15, 2025 10:53:27
Nashik, Maharashtra:महापालिका उमेदवार ठरविण्याचे अधिकार पक्षी धरिस्थी घेतील. आग्रह किंवा मागणी करा घोषणा करू नका. शिवसेनेच्या वाढत्या लोकप्रियतेचा धक्का घेतला आहे. स्थानिक पातळीवर घेतलेल्या निर्णयाचा वरिष्ठ निर्णय घेतील. भगूर येथे आमचा भगवा फडकेल. प्रत्येकाला अस्तित्वाचा प्रयत्न आहे. भांडण करून सत्ता मिळवणे आमचे ध्येय नाही. सर्वांना अर्ज भरण्यास सांगितले आहे. महायुतीत वाढल्यास अर्ज मागे घेणे लागणार आहे. ab फॉर्म तिघंही पक्षाने दिले आहेत. युती होत असेल तर अर्ज मागे घेणार नाहीतर मैत्रीपूर्ण लढत होणार. शरद पवार स्थानिक पद्धवरील आमदार आणि पद्धधिकार्यन निर्णय सोडला आहे. शरद पवार राजकारण करत असतात ते युती सोबत जाणार नाही. काँग्रेस ला दुर्बिणीने शोधावे लागणार आहे. महायुतीत लढणार असल्याच शिंदे यांनी सांगितलं आहे. कोणी वाईट परिमाण होईल. गिरीश महाजन संकट मोचक असल्याने ते पटकन उडी मारून येतात. त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्स असणे योग्य नाही. महायुतीत निवडणूक लढविल्यास फायदा होणार असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय.
74
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 15, 2025 10:53:15
136
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 15, 2025 10:18:48
Kalyan, Maharashtra:प्रसिद्ध रील स्टार शैलेश रामूगडे याला अटक.. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अनेक तरुणींची फसवणूक.. ठाण्यात राहणारा रिल स्टार शैलेश रामूगडे याला डोंबिवलीच्या विष्णू नगर पोलिसांनी अटक केली आहे शैलेश आगोदर मैत्री करताचा नंतर विश्वास संपादन करून प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्याच्या कडून सोन्याचे दागिने आणि रोख पैसे काढायचा गेल्या वर्षी ठाण्याच्या कापुरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याचं बरोबर विष्णूनगर पोलिस ठाण्यात देखील एका तरुणीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे तिच्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांनी शैलेश रामगुडे अटक केली असून याच्याकडून ३७ लाखांचे दागिने , एक बीएमडब्लू कार, चार महागडे आयफोन हस्तगत केले आहेत व शैलेश रामगडे इन्स्टाग्रामवर ९ लाख फॉलोवर्स आणखी तक्रारी येण्याची शक्यता आहे याबत पुढील तपास विष्णू नगर पोलीस करत आहेत
144
comment0
Report
Advertisement
Back to top