Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर में गैस सिलेंडर की किल्लत गहराई, नागरिकों को आठ-दस दिन प्रतीक्षा

VBVAIBHAV BALKUNDE
Mar 18, 2026 04:30:54
Latur, Maharashtra
लातूरमध्ये सध्या गॅस सिलिंडर टंचाईचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे… घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना तब्बल आठ ते दहा दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे… आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असल्याचं चित्र आहे… एजन्सीकडूनही उशिरा डिलिव्हरी होत असल्याने सर्वसामान्य लातूरकरांचे हाल वाढले आहेत…
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Mar 18, 2026 05:31:46
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 18, 2026 05:30:26
Nagpur, Maharashtra:नागपुर में वीजकेंद्रों को ड्रोन धमकी received? Wait - The content provided is in Marathi. Cleaned version: नागपूर - नागपुरात वीजकेंद्रांना ड्रोनहल्ल्याची धमकी, प्रशासनात खळबळ - खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन आणि कोराडी थर्मल पॉवर स्टेशनलाला धमकीचे ई-मेल आले होते - ड्रोनद्वारे सायनाइड हल्ल्याची धमकी ई-मेलमधून देण्यात आल्याची माहिती आहे... - खापरखेडा केंद्राची BDDS कडून सखोल तपासणी, काहीही संशयास्पद आढळले नाही - कोराडी वीजकेंद्राचीही रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. - तामिळनाडूतून ई-मेल पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती - पोलिस उपायुक्त डॉ.संदीप पाखाले यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी - धमकीनंतर वीजकेंद्र परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली - ड्रोनद्वारे सुरू असलेले सर्वेक्षण तात्पुरते बंद - राज्यातील इतर वीजकेंद्रांनाही अशाच धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती.. - यापूर्वी जिल्हा न्यायालय व पासपोर्ट कार्यालयालाही धमकीचे ई-मेल आले होते.. - बॉम्बशोधक पथकांकडून सतत तपासणी, पोलिसांचा सायबर तपास सुरू असल्याची माहिती...
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 18, 2026 05:20:37
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून रिक्षातून फिरणाऱ्या एका टोळीन अक्षरशः उच्छाद मांडला होता. कोयत्याचा धाक दाखवून वाटेत भेटणाऱ्या प्रवाशांचे अपहरण करायचे आणि त्यांच्याकडून खंडणी उकळायचे, त्यामुळ दहशतीच वातावरण होते. अखेर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकान अत्यंत धाडसानसापळा रचून या टोळीचा पर्दाफाश केला. नाशिक फाटा इथ 15 मार्च रोजी नितीन महाजन नावाच्या प्रवाशाला रिक्षात बसवून, कोयत्याचा धाक दाखवत त्याच अपहरण करण्यात आल. हा थरार संपत नाही तोच, अवघ्या 24 तासांत म्हणजेच 16 मार्चला सूरज शेलार या दुसऱ्या व्यक्तीचाही अपहरण करत खंडणी वसूल केली. या घटनांमुळे भोसरी आणि सांगवी परिसरात भीतीचे वातावरण पसरले होत. भररस्त्यातून लोकांच अपहरण होत असल्यान पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल होत. अखेर खंडणी विरोधी पथकान तांत्रिक बाबी तपासत दोघांना अटक केलीय..! पवन छगन उजगरे आणि सुमित हनुमंत कराड अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत...
602
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 18, 2026 05:17:33
Shirur, Maharashtra:पुण्यात कुठेही गॅस साठी लाईन नाही. काल पासून OTP प्रणाली नुसार बुकिंग केल्यानंतर 96 तासाच्या आत घरपोच गॅस सिलेंडर घरपोच मिळणार. काल पुण्यात शिस्त पाळली होती. कोणीही लाईन लावायची आवश्यकता नाही. एकदा गॅस घेतल्या नंतर 25 दिवसानंतर पुन्हा गॅस घेता येईल. वितरण करणार्‍यांना आदेश दिले आहेत की सर्वांना गॅस घरपोच करावेत. माझ्याकडे तक्रार आली आहे की काळ्या बाजारात गॅस देतात. मी याबाबत गोपनीय टीम पाठवून तपास सुरू केला आहे. लोकांकडे extra सिलेंडर असेल असे लोक हे गैरकृत्य करत असतील. एजन्सी वर OTP मार्फतच गॅस दिला जातो. ज्याच्याकडे गॅस कनेक्शन नाही अशी लोक तक्रार करतात की गॅस मिळत नाही दिली. bhiमाशंकर मंदिर: भाजपच्या खासदार भीमाशंकरला आले ती त्यांची खाजगी ट्रिप होती. प्रशासनाने कोणती माहिती नव्हती त्यांच्याकडून कोणतीही परवानगी दिली नाही आणि मागितली नाही; 9 जानेवारी पासून मंदिर बंद आहे. त्याची प्रशासनाने कोणती माहिती दिली नाही आणि व्यवस्था केली नाही. भीमाशंकर 9 एप्रिल पर्यंत मंदिर बंद असणार आहे. हे काम 2020 मध्ये मंजूर झालेलं काम सुरू आहे. अनेक ठिकाणी इतर मंदिरात चेंगराचेंगरी झालेली आहे अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी भीमाशंकर मंदिरात विविध विकास काम सुरू आहे. मंदिर दर्शनासाठी सर्वासाठी बंद आहे. मी माहिती घेत आहे कोणी परवानगी दिली. मंदिर प्रशासन दिली असेल तर कारवाई करणार. असे येथील प्रांतांना सांगितले आहे त्यांनी मंदिर प्रशासनाचा नोटीस दिली आहे. भीमाशंकर मंदिराचे काम पूर्ण व्हायला एक वर्ष लागेल मात्र भाविकांना दर्शन करता यावे इतके काम 3 महिन्यात पूर्ण होईल. आम्ही मान्यता सहा महिन्याची घेतली होती मात्र जे काम सहा महिन्याचे होते ते 3 महिन्यात पूर्ण करणार आहोत. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
613
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 18, 2026 05:00:34
894
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 18, 2026 04:48:55
Akola, Maharashtra:अकोला शहरातील सराफा बाजारात धिंगाणा घालणाऱ्या एका इसमाविरुद्ध अखेर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. ५ मार्च रोजी घडलेल्या या प्रकारानंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अकोला शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात एका इसमाने उभ्या वाहनांना लाथा मारत तसेच एका सराफा व्यवसायिकाला शिवीगाळ करत गोंधळ घातल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. भीतीमुळे कोणीही समोर येऊन तक्रार देण्यास तयार नव्हते. मात्र, माध्यमांनी या घटनेला वाचा फोडल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली. सिटी कोतवाली पोलिसांनी सरकारतर्फे तक्रार दाखल करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली.यानंतर नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी आणून पाहणी केली,तसेच संबंधित दुकानदाराची सर्वांसमोर माफी मागण्यास भाग पाडले. कोणत्याही प्रकारची दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींना घाबरू नका. अशा घटना घडल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार द्या,असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.
910
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 18, 2026 04:47:07
1079
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 18, 2026 04:46:16
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात सहा शेतकरी जखमी अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याने एका मागून एक केलेल्या हल्ल्यात सहा शेतकरी जखमी झाले आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव आणि पिंपळगाव भोसले या गावातील ही घटना असून जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. ही दोन्ही गावं वैनगंगा नदीच्या लगत असून काल दुपारच्या दरम्यान हे सर्व शेतकरी आपल्या शेतात काम करत होते. याच दरम्यान बिबट्याने शेतात काम करणाऱ्या या शेतकऱ्यांवर हल्ले केले. हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालय आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वनविभागाने घटनेची माहिती मिळताच या भागात ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून हल्ला करणाऱ्या बिबट्याचा शोध सुरू केलाय.
1080
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 18, 2026 04:30:39
Bhandara, Maharashtra:जुन्या वैरातून तलवारीने रक्तरंजित हल्ला! युवकाची निर्घृण हत्या.... आरोपीचा थेट सरेंडर.... परिसरात भीतीचं सावट. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा हेटी येथे जुन्या वैरातून एका २४ वर्षीय युवकाची तलवारीने निर्दयी हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत युवकाचे नाव देवेंद्र चुन्नीलाल ताराम (२४) असे असून, तो काही दिवसांपूर्वीच जामिनावर कारागृहातून सुटून गावात परतला होता. त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी सुनील आसाराम कांबले (२५) याने जुन्या वैरातून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी देवेंद्र ताराम याच्याविरुद्ध आरोपीच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, त्याला अटक करून भंडारा कारागृहात पाठविण्यात आले होते. मात्र, आठ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून गावात आला होता. दरम्यान, वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने आरोपी सुनील कांबळे यांनी संधीच्या शोधात होता. देवेंद्र गावात परतल्याची माहिती मिळताच, रात्री त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात देवेंद्रच्या गळा, मान, हात, पाय आणि पोटावर गंभीर जखमा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आरोपीने थेट पोलीस पाटलासमोर आत्मसमर्पण केले. त्याच्याकडे हत्येसाठी वापरलेले शस्त्रही आढळून आले. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, तपासादरम्यान आरोपीचा मोठा भाऊ हंसराज कांबले (४३) यालाही संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
1079
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 18, 2026 04:18:48
Washim, Maharashtra:अँकर: वाशिमच्या मालेगाव तहसील कार्यालयातील चेकबुक चोरी प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. पाच दिवसांपूर्वी चोरी गेलेले चेकबुक अचानक नायब नाझर कार्यालयात सापडल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चोरी केलेल्या चेकद्वारे पाच जणांच्या खात्यात तब Dell 5 लाख 58 हजार रुपये जमा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल असून तपास सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी कार्यालय उघडताना खिडकीखाली पिशवीत चेकबुकचा बंडल आढळून आला. यातील 12 चेकवर सही व शिक्के असून उर्वरित चेक कोरे असल्याचे आढळले. पोलिसांनी पंचनामा करून चेकबुक जप्त केले आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आले नसून, तहसील कार्यालयाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले आहे.
1056
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 18, 2026 04:16:50
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यातील लोहारा, उमरगा, तुळजापूरला गारपिटीचा तडाखा. वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. नळदुर्ग परिसरात महामार्गावर बर्फासारखी गारांची चादर. द्राक्ष, कांदा, केळी, ज्वारी, मका पिकांचे अतोनात नुकसान धाराशिव जिल्ह्यात सोमवारी रात्री निसर्गाचा कहर पाहायला मिळाला. लोहारा, उमरगा आणि तुळजापूर तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान गारपिटीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काल सायंकाळी अचानक वातावरणात बदल होत विजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला. उमरगा-नळदुर्ग परिसरात गारपीट इतकी तीव्र होती की महामार्गावर अक्षरशः बर्फ पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. द्राक्ष, केळी, आंबा, कलिंगड आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काढणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामान विभागाने १७ आणि १८ मार्चदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला होता, त्यानुसारच ही गारपीट झाली. मात्र या अवकाळी पावसाने काढणीस आलेल्या शेती पिकाचा अतोनात नुकसान केलं.
1023
comment0
Report
Advertisement
Back to top