Back
पुरानी दुश्मनी पर तलवार से निर्मम हत्या, 24 वर्षीय युवक की मौत; आरोपी ने सरेंडर
PTPRAVIN TANDEKAR
Mar 18, 2026 04:30:39
Bhandara, Maharashtra
जुन्या वैरातून तलवारीने रक्तरंजित हल्ला! युवकाची निर्घृण हत्या.... आरोपीचा थेट सरेंडर.... परिसरात भीतीचं सावट. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा हेटी येथे जुन्या वैरातून एका २४ वर्षीय युवकाची तलवारीने निर्दयी हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत युवकाचे नाव देवेंद्र चुन्नीलाल ताराम (२४) असे असून, तो काही दिवसांपूर्वीच जामिनावर कारागृहातून सुटून गावात परतला होता. त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी सुनील आसाराम कांबले (२५) याने जुन्या वैरातून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी देवेंद्र ताराम याच्याविरुद्ध आरोपीच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, त्याला अटक करून भंडारा कारागृहात पाठविण्यात आले होते. मात्र, आठ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून गावात आला होता. दरम्यान, वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने आरोपी सुनील कांबळे यांनी संधीच्या शोधात होता. देवेंद्र गावात परतल्याची माहिती मिळताच, रात्री त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात देवेंद्रच्या गळा, मान, हात, पाय आणि पोटावर गंभीर जखमा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आरोपीने थेट पोलीस पाटलासमोर आत्मसमर्पण केले. त्याच्याकडे हत्येसाठी वापरलेले शस्त्रही आढळून आले. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, तपासादरम्यान आरोपीचा मोठा भाऊ हंसराज कांबले (४३) यालाही संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 05:31:460
Report
AKAMAR KANE
FollowMar 18, 2026 05:30:260
Report
KPKAILAS PURI
FollowMar 18, 2026 05:20:37602
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 05:17:33613
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 05:05:11984
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 05:00:34894
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 18, 2026 04:48:55910
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 18, 2026 04:47:071079
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 18, 2026 04:46:291069
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 04:46:161080
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 04:45:54970
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 18, 2026 04:30:541050
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 04:18:481056
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 18, 2026 04:16:501023
Report