Back
लातूर में जमीन विवाद पर सगे भाइयों के बीच खून, परिवार पर छाया मातम
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 24, 2026 07:03:54
Latur, Maharashtra
लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड येथे वडिलोपार्जित शेतीच्या वादाने एका सुखी कुटुंबाचा शेवट केला आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी सख्ख्या भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
गुलाब विलास खरोसे आणि त्यांचा धाकटा भाऊ उल्हास विलास खरोसे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या वाटणीवरून तीव्र वाद सुरू होता. हा वाद मिटण्याऐवजी दिवसेंदिवस चिघळत गेला. वादाच्या भरात संतापाने आंधळ्या झालेल्या उल्हासने आपला मोठा भाऊ गुलाब यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. सुरुवातीला दोरीने गळा आवळून आणि त्यानंतर काठी व कोयत्याने वार करून बेदम मारहाण के करून गुलाब यांची निर्घृण हत्या केली. आणि त्यानंतर आपल्या भावाचा अपघात झाला आहे असा बनाव रचला....
बाईट :- प्रविण राठोड ( पोलीस अधिकारी )
VO 02 :- सुरुवातीला हा प्रकार अपघात असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती, जखमांचे स्वरूप आणि काही विसंगतींमुळे पोलिसांचा संशय बळावला.
कासारशिरसी पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली. चौकशीदरम्यान आरोपीच्या जबाबात तफावत आढळून आली. तांत्रिक पुरावे, घटनास्थळाचा बारकाईने केलेला पंचनामा आणि सातत्यपूर्ण चौकशीमुळे सत्य हळूहळू बाहेर येऊ लागले. आणि शेवटी पुन्हा एकदा सिद्ध झाले. “पोलीस के हाथ लंबे होते हैं.” अपघाताचा बनाव कोसळला… आणि सख्ख्या भावानेच रचलेला खुनाचा कट उघड झाला. आरोपी उल्हास विलास खरोसे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
VO 03 END :- एकाच आईच्या पोटी जन्मलेले दोन भाऊ… एकाच अंगणात वाढलेले… पण वडिलोपार्जित जमिनीच्या वादाने त्यांच्यात अशी दरी निर्माण केली, की त्या दरीतच रक्त सांडलं. अपघाताचा पडदा उभारला गेला… सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला...
पण तपासाची दिशा बदलली आणि पडदा हळूहळू बाजूला सरकला. खुनामागचं काळं सत्य समोर आलं… आणि सख्खा भाऊच पक्का वैरी ठरला.
रामलिंग मुदगଡमधील ही घटना केवळ एका कुटुंबाचा अंत नाही, तर नात्यांवर लोभाने केलेला घाव आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowFeb 24, 2026 08:30:350
Report
UPUmesh Parab
FollowFeb 24, 2026 08:19:500
Report
UPUmesh Parab
FollowFeb 24, 2026 08:16:230
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 24, 2026 08:02:290
Report
PNPratap Naik1
FollowFeb 24, 2026 08:01:390
Report
PNPratap Naik1
FollowFeb 24, 2026 08:01:210
Report
APAMOL PEDNEKAR
FollowFeb 24, 2026 07:47:520
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 24, 2026 07:32:480
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 24, 2026 07:32:040
Report
AKAMAR KANE
FollowFeb 24, 2026 07:30:270
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 24, 2026 07:17:060
Report
YKYOGESH KHARE
FollowFeb 24, 2026 07:04:110
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 24, 2026 06:48:390
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 24, 2026 06:33:030
Report