Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mumbai City400003
किशोरी पेडणेकर ने राजावाड़ी अस्पताल का निरीक्षण किया, सुरक्षा और सुविधाओं पर सवाल
APAMOL PEDNEKAR
Feb 24, 2026 07:47:52
Mumbai, Maharashtra
anchor : मुंबई मनपा मधील शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेत्य किशोरी पेडणेकर यांनी आज घाटकोपर च्या राजावाडी रुग्णालयाची पाहणी केली. या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. पेडणेकर यांनी सर्व वॉर्ड मध्ये जाऊन रुग्णांशी, त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली.या वेळी त्यांनी सुरक्षा रक्षक, डॉक्टर, आणि साहित्यांची उपलब्धता या बाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राजावाडी रुग्णालयामध्ये डॉक्टर्स आणि नर्स चांगल्या पद्धतीने काम करत आहे.. सुरक्षा रक्षक वाढवणे गरजेच आहे ती दिसून येत नाही... रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी सुसज्ज हॉस्पिटल असणे गरजेचे... आरोग्य खात्यावर किती खर्च केला हे दिसलं पाहिजे.. महानगरपालिकेचे रुग्णालयाचे खाजगीकरण होता कामा नये खाजगी सारखं या ठिकाणी ट्रीटमेंट केलं जाईल खाजगीकरणाला आम्ही विरोध करू ...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Feb 24, 2026 09:06:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दानवे यांची पत्र assgnment नंबर वर पाठवली आहे... उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा खासदार संदीपान भुमरे यांच्यावर कोट्यवधी च्या जमिनी बळकावली असल्याचा आरोप केलाय... त्यांचा ड्राइवर जावेद रसूल शेख यांच्या नावावर हिबनामा करून त्या जमिनीचे संपादन मूल्य 1150 कोटी रुपये हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा त्यांनी आरोप केलाय... छत्रपती संभाजी नगरात जटवाडा मध्ये 23 एकर 30 गुंठे जमीन आहे, ही जमीन महाराष्ट्र विकास मंडळाने संपादित केली आहे, या जमीनीबाबत कुणीही कायदेशीर वारसदार नव्हते ही जमीन सरकारने अधिग्रहण केली आणि समृद्धी महामार्गसाठी ही जमीन देण्याचे आदेश झाले , त्यानुसार या जमिनीचे मूल्य 1150 कोटी रुपये ठरवण्यात आले हे सगळं झाल्यावर या आतापर्यंत सरकार दरबारी कुठलीही नोंद नसणारे या जमिनीचे मालक पुढे आले आणि त्यांनी पैशांची मागणी केली, धक्काादायक म्हणजे या जमिनीच्या मूळ मालक असणारे सांगणाऱ्यानी या जमिनीचा हिबानामा (म्हणजे जमीन दुसऱ्याच्या नावावर करणे मुस्लिम पद्धतीनुसार ) जावेद रसूल शेख यांच्या नावावर केल्याचेही दावा केलाय.. 1971 ला हा हिबानामा झाला असे सांगण्यात आले , मुळात जावेद चा जन्म हा 1985 मध्ये झाला असा दावा दानवे यांनी केलाय त्यामुळं 1971 मध्ये हिबनामा त्याचा नावावर कसा होऊ शकतो असा सवाल दानवे यांच्या केलाय... याच जावेद च्या नावावर आणखी एक 400 कोटीचे हिबानामा प्रकरण आहे ते सुद्धा खासदार भुमरे यांनीच केले होते आणि आता या समृद्धी मध्ये गेलेल्या जमिनीत ही खासदार भुमरे यांनीच खेळी केल्याचा आरोप दानवे यांनी केलाय यातुन चालकाच्या नावाने 1150 कोटी हडपण्याचा भुमरे यांचा डाव असल्याचा आरोप दानवे यांनी केलाय याबाबत कागदपत्रांसह मुख्यमंत्री याना पत्र लिहले आहे आणि या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे या चौकशीतून भुमरे यांचा सगळं बाहेर येईल असा अंदाज दानवे यांचा दावा आहे..
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 24, 2026 08:30:35
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर से मुंबई मार्ग पर आठवड्यातील सातही दिवस, सकाळी और संध्याकाळी इन दोन सत्रांमध्ये Indigo कंपनीकडून विमान सेवा शुरू होणार आहे. 29 मार्चपासून कोल्हापूर ते नवी मुंबई विमानतळ, या दरम्यान Indigo कडून नवीन सेवा सुरू होण्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. रोज सकाळी 8:00 वाजता नवी मुंबई विमानतळावरून कोल्हापुरसाठी Indigoचे विमान उडान भरेल, आणि साडे9 वाजता हे विमान कोल्हापुरात बसेल. त्यानंतर सकाळी 9:35 वाजता कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान नवी मुंबई विमानतळावर 10:35 वाजता पोहोचेल. तर सायंकाळी 7:20 वाजता नवी मुंबईतून उडान घेतलेले विमान साडेआठ वाजता कोल्हापुरात येईल. त्यानंतर 8:50 वाजता कोल्हापूरून सुटणारे विमान 9:50 वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरेल. आठवड्यातील सातही दिवस Indigo विमानसेवा सुरू असल्याने कोल्हापूरातून मुंबईला जाऊन दिवसभरातील कामे पूर्ण करून पुन्हा संध्याकाळी कोल्हापूरला परत येणे शक्य होईल. कोल्हापूरकरांची एक प्रदीर्घ मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 24, 2026 08:16:23
Oros, Maharashtra:शेकडो वर्षांपूर्वीपासून कोकणातील गावपळणीची परंपरा असणाऱ्या मालवण तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या वायंगणी गावात ढोलांचा गजर झाला आणि गावपळण सुरू झाली. श्री देव रवळनाथाच्या कौलाने सुमारे दोन हजार वस्तीचा गाव देवांसहित रयतेला घेऊन वेशीबाहेर तीन दिवस तीन रात्रीसाठी वास्तव्यास गेला. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली प्राचीन प्रथा आजही आधुनिकतेकडे जाणाऱ्या प्रवाहातही वायंगाणी गावातील ग्रामस्थ स्वखुशीने तेवढीच श्रद्धापूर्वक जपत आहेत. आता वेशीबाहेर गेलेल गाव हा तीन दिवस, तीन रात्री नंतर देव रवळनाथ यांच्या हुकुमाने गाव वेशीबाहेर जातो. तीन दिवसांनी गावाचे बारापाच मानकरी आणि ग्रामस्थ सकाळी गाव भरण्याचा कौल घेणार. देवाने कौल दिल्यास वेशीबाहेर गेलेला गाव परत वायंगणी गावात परतनार आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 24, 2026 08:02:29
Ahilyanagar, Maharashtra:रिपोर्टर- लैलेश बारगजे स्लग- mim ऑन मढी यात्रा मुस्लिम व्यवसायिक फीड 2c Anc:- अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढी यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना दुकान लावू न देण्यासंदर्भाते गेल्या वर्षीचाच ठराव कायम असणार आहे. या संदर्भात मढी येथील माजी सरपंच संजय मरकड यांनी भूमिका मांडल्याने आता या प्रकरणात एआयएमआयएम ने उडी घेतलीये.. एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज असरफी यांनी संजय मरकड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये.. त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. या संदर्भात प्रशासन निर्णय घेत नसून प्रशासन असमर्थ असल्याचं त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी प्रशासनावर खापर फोडत टीका केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितल आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 24, 2026 08:01:39
Kolhapur, Maharashtra:Kop Dhanjay Mahadik Byte मुद्दे ऑन कृष्णराज महाडिक निवड जगातील मोठ्या पक्षाच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची वर्णी लागली त्याबद्दल आनंद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मी आभार मानतो. तो विधानसभेची तयारी करत होता, महानगरपालिका नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उतरणार होता, पण पक्षाने आदेश दिल्याने तो थांबला होता. आम्ही कुटुंब म्हणून चिंतेत होतो.. खासदाराचा मुलगा म्हणून जर थांबावा लागत असेल तर त्याचं भवितव्य काय याचा विचार करत होतो. पण भाजपा पक्ष हा दूरदृष्टी असणारा पक्ष, त्यामुळे कृष्णराज महाडिक यांची ओळख धनंजय महाडिक यांचा मुलगा म्हणून नाही हे पक्षाला लक्षात आले, त्यानंतर त्यांनी त्याची निवड केली. त्याचे सामाजिक काम, त्याचं नाव लौकिक आहे, तो युट्युबवर म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे, त्याचा खूप मोठा नेटवर्क राज्यभर आहे हे ओळखून प्रदेशाध्यक्षांनी त्याच्यावर जबाबदारी सोपावली. राज्यभर भारतीय जनता पार्टीची युवा ताकत वाढवण्यासाठी त्याचा प्रयत्न राहील याचा विश्वास. मी नेहमीच सांगत आलो तो खूप हार्डवर्कर आहे, पूर्वापर असणारा राजकीय वसा आणि वारसा याचे बाळकडू त्याला मिळाले. अनपेक्षित पणे इतकी मोठी जबाबदारी त्याला मिळाली, हे आम्हाला अपेक्षित नव्हतं. महाराष्ट्र शासनाच्या सर्व मंत्री महोदय यांच्या सोबत त्याचा संपर्क आहे. त्यातून तो लोकांची काम करत होता. प्रदेशाध्यक्ष म्हणून खूप मोठी राजकीय पायरी त्याला मिळाली. तो ते समर्थपणे पेलेल याची खात्री. कृष्णराज याच्या दृष्टीने नवी पहाट उजाडले आहे, त्यामुळे चांगला सूर्य उगवला आहे असं म्हणता येईल. ऑन कोल्हापूर जिल्हा परिषद राष्ट्रवादीची संख्या सर्वाधिक आहे, त्यामुळे मुश्रीफ साहेबांची अपेक्षा अतिशय रास्ता आहे. पण भारतीय जनता पार्टीला देखील अध्यक्ष पद मिळावं ही भाजपची भूमिका. पहिला कोणाला अध्यक्षपद हा विषय फक्त राहिला आहे. पण महायुती म्हणून आमचा समन्वय आहे. ऑन गोकुळ निवडणूक ज्या पद्धतीने नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवली. त्याच पद्धतीने गोकुळच्या निवडणुकीला सामोरे जावे अशा प्रकारची आमची भावना आहे. त्याला सर्वांचे समर्थन आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनवरोध होईल असं मला वाटत नाही. गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्याचे कोणते कारण दिसत नाही. सहकाराच्या नियमानुसार संख्या वाढ झाली आहे, काही सभासद संख्या देखील वाढली आहे. किती अपात्र होणार या संदर्भात अध्यात निर्णय झालेला नाही. गोकुळ दूध संघाच्या निवडणुक महायुती म्हणून आम्ही सामोरे जाणार आहे. ऑन शहर करवाढ अनेक वर्षानंतर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता मिळाली आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा त्रास नागरिकांना होईल, करवाढ होईल, अशा बाबी आम्ही होऊ देणार नाही. उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून महापालिकेचा कारभार चालविणार. ऑन कोल्हापुर मुंबई विमानसेवा कोल्हापूरकरांचे गेल्या अनेक दिवसांपासूनचे स्वप्न पूर्ण होत आहे. वाशीला नवीन विमानतळ झालं त्यामुळे कोल्हापूरला नवीन एअर कनेक्टिव्हिटी मिळत आहे. येणाऱ्या 2026 ऑक्टोबरच्या आत आणखी सात ते आठ विमानसेवा कोल्हापूरला मिळणार आहे. ही विमान सेवा इथल्या कृषीसाठी उद्योगासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कोल्हापुरातून कमीत कमी 15 ठिकाणी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू होईल यासाठी देखील प्रयत्न सुरू आहे. ऑन नदी प्रदूषण अमृत योजनेमधून शहर आणि गावांसाठी खूप चांगल्या योजना आहेत, जिल्हा परिषदेची सत्ता आमच्या ताब्यात आली आहे, त्यामुळे लवकरच आम्ही यावर सोल्युशन काढू. नदी हे स्वच्छ असलेच पाहिजे, त्यासाठी योजना राबवून या नद्या स्वच्छ करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 24, 2026 08:01:21
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि कुंभोज मार्गावर एका लॉजने रस्त्याच्या कडेला लावलेल्या बोर्डाला धडकून दुचाकीस्वाराचा भीषण अपघात होऊन मृत्यू झालाय. या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद झाला असून दुचाकीस्वार बोर्डाला धडकून काही फुटावर फेकला गेला. सौरभ गाझी असं दुचाकी स्वाराचे नाव असून उपचार सुरू होण्याअगोदर त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल झाला असून मृत सौराभ हा गेले काही वर्षे कराडमध्ये मामाकडे राहत होता. तो दुचाकी घेऊन हातकणंगलाहून दुधगावकडे निघाला होता, याच दरम्यान लक्ष्मी मंदिराजवळ रस्त्याला लागून असलेल्या एका लॉजच्या फलकाला धडकून तो शेजारी असलेल्या झाडावर जाऊन आदळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 24, 2026 07:30:27
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Feb 24, 2026 07:04:11
Nashik, Maharashtra:ब्रेकिंग विश्व मराठी संमेलन – नाशिक • नाशिकमध्ये गुरुवारपासून विश्व मराठी संमेलन सुरू • १२ देशांतून सुमारे ४५०० मराठी भाषिक सहभागी होणार • विदेशातील मराठी उद्योजक, साहित्यिक व संशोधकांची उपस्थिती • कार्यक्रम मविप्र संस्थेच्या मैदानात होणार • माजी सरन्यायाधीश भूषण गवई व मुख्यमंत्री उपस्थित राहणार • सुमारे १० हजार मराठी भाषिक सहभागी होण्याचा अंदाज • अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा आदी देशांतील प्रतिनिधी येणार • ६० × ४० आकाराचे २ भव्य सभामंडप उभारले • यापूर्वी याच ठिकाणी मराठी पार पडले होते साहित्य संमेलन • परदेशातील मराठी बांधवांना एकत्र आणण्याचा उद्देश
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 24, 2026 07:03:54
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड येथे वडिलोपार्जित शेतीच्या वादाने एका सुखी कुटुंबाचा शेवट केला आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी सख्ख्या भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुलाब विलास खरोसे आणि त्यांचा धाकटा भाऊ उल्हास विलास खरोसे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या वाटणीवरून तीव्र वाद सुरू होता. हा वाद मिटण्याऐवजी दिवसेंदिवस चिघळत गेला. वादाच्या भरात संतापाने आंधळ्या झालेल्या उल्हासने आपला मोठा भाऊ गुलाब यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. सुरुवातीला दोरीने गळा आवळून आणि त्यानंतर काठी व कोयत्याने वार करून बेदम मारहाण के करून गुलाब यांची निर्घृण हत्या केली. आणि त्यानंतर आपल्या भावाचा अपघात झाला आहे असा बनाव रचला.... बाईट :- प्रविण राठोड ( पोलीस अधिकारी ) VO 02 :- सुरुवातीला हा प्रकार अपघात असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती, जखमांचे स्वरूप आणि काही विसंगतींमुळे पोलिसांचा संशय बळावला. कासारशिरसी पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली. चौकशीदरम्यान आरोपीच्या जबाबात तफावत आढळून आली. तांत्रिक पुरावे, घटनास्थळाचा बारकाईने केलेला पंचनामा आणि सातत्यपूर्ण चौकशीमुळे सत्य हळूहळू बाहेर येऊ लागले. आणि शेवटी पुन्हा एकदा सिद्ध झाले. “पोलीस के हाथ लंबे होते हैं.” अपघाताचा बनाव कोसळला… आणि सख्ख्या भावानेच रचलेला खुनाचा कट उघड झाला. आरोपी उल्हास विलास खरोसे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. VO 03 END :- एकाच आईच्या पोटी जन्मलेले दोन भाऊ… एकाच अंगणात वाढलेले… पण वडिलोपार्जित जमिनीच्या वादाने त्यांच्यात अशी दरी निर्माण केली, की त्या दरीतच रक्त सांडलं. अपघाताचा पडदा उभारला गेला… सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला... पण तपासाची दिशा बदलली आणि पडदा हळूहळू बाजूला सरकला. खुनामागचं काळं सत्य समोर आलं… आणि सख्खा भाऊच पक्का वैरी ठरला. रामलिंग मुदगଡमधील ही घटना केवळ एका कुटुंबाचा अंत नाही, तर नात्यांवर लोभाने केलेला घाव आहे.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Feb 24, 2026 06:48:39
Buldhana, Maharashtra:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बाईट पॉईंटर... #हनुमंत पवार मारहाण, काँग्रेसची भूमिका घाशीराम कोतवाल यांच्या स्वरूपात देवेंद्र फडणवीस काम करत आहेत राज्य मध्ये कुठलीही कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही.. भाजपने पुण्याचा तालिबान केलाय... (१.३३ सेकंद) #शरद पवार महाविकास आघाडीचे राज्यसभेचे उमेदवार, यावर... मित्र पक्षाची बैठक होईल, बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करू.. यासंदर्भात काँग्रेसचा दावा आहे, शिवसेनेची भूमिका आहे..राष्ट्रवादीची भूमिका समजून घेऊन निर्णय घेतला जाईल... (२४ सेकंद) #राज्यसभेसाठी पार्थ पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब... तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, मात्र राज्यसभेवर पाठवताना महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, सभ्यता आहे ती ध्यानात घेऊन नाव सुचवाव ही अपेक्षा... (१५ सेकंद) #नरहरी झिरवाळ क्लिनचीट... हे क्लिनचीट बहाद्दर सरकार आहे.. मुख्यमंत्री स्वतः आणि सरकार भ्रष्ट असल्यामुळे ते प्रत्येक भ्रष्टाचाराला पाठीशी घालतात... (२३ सेकंद) #एअर ॲम्बुलन्स अपघात.. ताबडतोब चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, बारामतीच्या विमानात अपघात आणि आता झालेल्या अपघाताचे काही साम्य आहे का..हे देखील तपासले पाहिजे... (२१ सेकंद) #सांगली महापालिकेमध्ये काँग्रेसमध्ये गटबाजी... चंद्रपूर मध्ये 27 नगरसेवक आम्ही एक संघ आहोत, सांगलीतील खासदार आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम हे सर्व नगरसेवक एकसंघ ठेवतील... (३७ सेकंद) #राजीव गांधी प्रमाणे सुसाईड बॉम्ब नुसार अजित दादांचे हत्या झाली का, अमोल मिटकरी यांचा संशय... अनेक प्रश्न उपस्थित होत आहे मात्र यांचे उत्तर शोधणारा तपास पुढे जात नाही हे दुर्दैव आहे.. सर्व शंका तंत्रशुद्ध आहेत स्वभाविक आहेत... (३२ सेकंद) #बांगलादेशी वर कारवाईसाठी किरीट सोमय्या मालेगाव मध्ये... किरीट सोमय्या यांनी मालेगाव किंवा इतर ठिकाणी जाण्याआधी त्यांनी दिल्लीत जावं, बारा वर्षापासून मोदी सरकार आहे त्यांनी एकही बांगलादेशी पकडला नाही याचा जाब विचारावा, त्यांना हिंदू मुस्लिम जातीय दंगल निर्माण करण्याची मोठी हौस आहे.. त्यांनी त्यांच्या हौशीवर वावर घालावा... (३७ सेकंद) #राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू उद्या शेगाव दौऱ्यावर... त्यांचे जिल्हात स्वागत आहे, बुलढाणा जिल्ह्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांनी निर्णय घ्यावा, बुलढाणा जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये खारपान पट्ट्यापासून शेतमालाच्या प्रक्रिया प्रकल्प याबाबतीत त्यांच्याकडून अपेक्षा आहेत.. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे, कुपोषण आहे.. जलजीवन मिशन मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे.. या सगळ्या मुद्द्यांवर महामहीम निर्देश देतील अशी आशा आहे... (५३ सेकंद) बाईट - हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
0
comment0
Report
Advertisement
Back to top