Back
भाजपा ने कृष्णराज महाडिक को युवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त किया
PNPratap Naik1
Feb 24, 2026 08:01:39
Kolhapur, Maharashtra
Kop Dhanjay Mahadik Byte मुद्दे
ऑन कृष्णराज महाडिक निवड
जगातील मोठ्या पक्षाच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिक यांची वर्णी लागली त्याबद्दल आनंद.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मी आभार मानतो.
तो विधानसभेची तयारी करत होता, महानगरपालिका नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उतरणार होता, पण पक्षाने आदेश दिल्याने तो थांबला होता.
आम्ही कुटुंब म्हणून चिंतेत होतो.. खासदाराचा मुलगा म्हणून जर थांबावा लागत असेल तर त्याचं भवितव्य काय याचा विचार करत होतो.
पण भाजपा पक्ष हा दूरदृष्टी असणारा पक्ष, त्यामुळे कृष्णराज महाडिक यांची ओळख धनंजय महाडिक यांचा मुलगा म्हणून नाही हे पक्षाला लक्षात आले, त्यानंतर त्यांनी त्याची निवड केली.
त्याचे सामाजिक काम, त्याचं नाव लौकिक आहे, तो युट्युबवर म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे, त्याचा खूप मोठा नेटवर्क राज्यभर आहे हे ओळखून प्रदेशाध्यक्षांनी त्याच्यावर जबाबदारी सोपावली.
राज्यभर भारतीय जनता पार्टीची युवा ताकत वाढवण्यासाठी त्याचा प्रयत्न राहील याचा विश्वास.
मी नेहमीच सांगत आलो तो खूप हार्डवर्कर आहे, पूर्वापर असणारा राजकीय वसा आणि वारसा याचे बाळकडू त्याला मिळाले.
अनपेक्षित पणे इतकी मोठी जबाबदारी त्याला मिळाली, हे आम्हाला अपेक्षित नव्हतं.
महाराष्ट्र शासनाच्या सर्व मंत्री महोदय यांच्या सोबत त्याचा संपर्क आहे. त्यातून तो लोकांची काम करत होता.
प्रदेशाध्यक्ष म्हणून खूप मोठी राजकीय पायरी त्याला मिळाली. तो ते समर्थपणे पेलेल याची खात्री.
कृष्णराज याच्या दृष्टीने नवी पहाट उजाडले आहे, त्यामुळे चांगला सूर्य उगवला आहे असं म्हणता येईल.
ऑन कोल्हापूर जिल्हा परिषद
राष्ट्रवादीची संख्या सर्वाधिक आहे, त्यामुळे मुश्रीफ साहेबांची अपेक्षा अतिशय रास्ता आहे.
पण भारतीय जनता पार्टीला देखील अध्यक्ष पद मिळावं ही भाजपची भूमिका. पहिला कोणाला अध्यक्षपद हा विषय फक्त राहिला आहे. पण महायुती म्हणून आमचा समन्वय आहे.
ऑन गोकुळ निवडणूक
ज्या पद्धतीने नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवली. त्याच पद्धतीने गोकुळच्या निवडणुकीला सामोरे जावे अशा प्रकारची आमची भावना आहे. त्याला सर्वांचे समर्थन आहे.
गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनवरोध होईल असं मला वाटत नाही. गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्याचे कोणते कारण दिसत नाही.
सहकाराच्या नियमानुसार संख्या वाढ झाली आहे, काही सभासद संख्या देखील वाढली आहे. किती अपात्र होणार या संदर्भात अध्यात निर्णय झालेला नाही.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुक महायुती म्हणून आम्ही सामोरे जाणार आहे.
ऑन शहर करवाढ
अनेक वर्षानंतर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता मिळाली आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा त्रास नागरिकांना होईल, करवाढ होईल, अशा बाबी आम्ही होऊ देणार नाही.
उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून महापालिकेचा कारभार चालविणार.
ऑन कोल्हापुर मुंबई विमानसेवा
कोल्हापूरकरांचे गेल्या अनेक दिवसांपासूनचे स्वप्न पूर्ण होत आहे. वाशीला नवीन विमानतळ झालं त्यामुळे कोल्हापूरला नवीन एअर कनेक्टिव्हिटी मिळत आहे. येणाऱ्या 2026 ऑक्टोबरच्या आत आणखी सात ते आठ विमानसेवा कोल्हापूरला मिळणार आहे. ही विमान सेवा इथल्या कृषीसाठी उद्योगासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कोल्हापुरातून कमीत कमी 15 ठिकाणी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू होईल यासाठी देखील प्रयत्न सुरू आहे.
ऑन नदी प्रदूषण
अमृत योजनेमधून शहर आणि गावांसाठी खूप चांगल्या योजना आहेत, जिल्हा परिषदेची सत्ता आमच्या ताब्यात आली आहे, त्यामुळे लवकरच आम्ही यावर सोल्युशन काढू. नदी हे स्वच्छ असलेच पाहिजे, त्यासाठी योजना राबवून या नद्या स्वच्छ करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 24, 2026 09:36:080
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 24, 2026 09:22:160
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 24, 2026 09:21:440
Report
HPHARSHAD PATIL
FollowFeb 24, 2026 09:21:190
Report
PNPratap Naik1
FollowFeb 24, 2026 09:21:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 24, 2026 09:20:340
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 24, 2026 09:18:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 09:06:340
Report
PNPratap Naik1
FollowFeb 24, 2026 08:30:350
Report
UPUmesh Parab
FollowFeb 24, 2026 08:19:500
Report
UPUmesh Parab
FollowFeb 24, 2026 08:16:230
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 24, 2026 08:02:290
Report
PNPratap Naik1
FollowFeb 24, 2026 08:01:210
Report
APAMOL PEDNEKAR
FollowFeb 24, 2026 07:47:520
Report