Back
कोल्हापूर के सावंत परिवार ने दुग्ध व्यवसाय से बनाई नई मिसाल
PNPratap Naik1
Nov 19, 2025 08:57:56
Kolhapur, Maharashtra
धडपड, जिद आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे संस्कार यांचा संगम साधत कोल्हापूरच्या नूल येथील सावंत बंधूंनी दुग्धव्यवसायातून अभूतपूर्व प्रगती साधली आहे. या गोमातेची प्रतिकृतीची पंचक्रोशी सध्या जोरदार चर्चा झाली..
कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील नूल या ठिकाणी राहणारे सावंत कुटुंब गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. खरंतर वडिलोपार्जित शेतीत भाजीपाला घेत असतानाही योग्य दर न मिळाल्याने सावंत कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते. त्यामुळे प्रकाश आणि बाळासाहेब सावंत या भावांनी 2004 मध्ये हात उसने पैसे घेऊन फक्त दोन गायी खरेदी केल्या आणि दुग्धव्यवसाय सुरू केला. सुरुवातीचा टप्पा कठीण होता, पण जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी हा व्यवसाय वृद्धिंगत केला. सुरुवातीला मोजक्या गाईंपासून सुरू केलेला व्यवसाय 45 जनावरांचा आधुनिक गोठा त्यांनी उभारला. वर्षानुवर्षे कष्ट आणि सुधारणा करत आज या गोठ्यात त्यांची 108 जनावरे आहेत. दररोज 700 ते 800 लिटर दूध ते स्वतःच्या गजानन सहकारी दूध संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळकडे पुरवतात. त्यातून त्यांना वर्षाकाठी तब्बल दीड कोटींचे उत्पन्न मिळत. त्यामुळे त्यांनी यातील एका गाईची 6 फुटी प्रतिकृती बंगल्याच्या टेरेसवर उभारून गाईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
या दुग्ध व्यवसायात कुटुंबातीलच 18 जण रोज त्यांच्या गोठ्यात राबतात. बाहेरची एकही व्यक्ती कामगार म्हणून या ठिकाणी काम करण्यासाठी येत नाही. प्रकाश आणि बाळासाहेब सावंत त्यांचे पुत्र संतोष, ऋषिकेश, सुशांत, प्रशांत तसेच त्यांच्या पत्नी रेवती, शिवानी, ऐश्वर्या आणि राजश्री हे सर्वजण पहाटेपासून सायंकाळपर्यंत जनावरांच्या सेवेत गुंतलेले असतात. या एकजुटीमुळेच सावंत कुटुंबाचे घर आज स्वावलंबनाचे प्रतीक बनले आहे. दुग्ध उत्पन्नातून कोटींचा बांधलेला बंगला आणि बंगल्यावर गोमाताची उभी केलेली मूर्ती सध्या पंचक्रोशील चर्चेचा विषय बनली आहे.
42
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 10:11:030
Report
KPKAILAS PURI
FollowNov 19, 2025 10:04:310
Report
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 10:01:030
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 19, 2025 09:45:32103
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 19, 2025 09:39:3231
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 19, 2025 09:39:1464
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 19, 2025 09:39:0033
Report
UPUmesh Parab
FollowNov 19, 2025 09:16:11207
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 19, 2025 09:13:2670
Report
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 08:51:50105
Report
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 08:48:5196
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 19, 2025 08:08:35130
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 19, 2025 07:47:25100
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 19, 2025 07:34:42163
Report