Back
तुळजापूर ड्रग्स केस में आरोपी विनोद गंगणे को भाजपा ने नगराध्यक्ष उम्मीदवार बनाया, हंगामा
DPdnyaneshwar patange
Nov 19, 2025 08:08:35
Dharashiv, Maharashtra
धाराशिव – तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामीनावर बाहेर असलेल्या विनोद गंगणे यांना भाजपाने थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देताच तुळजापूर व जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी रिंगणात उतरवला, आणि विरोधकांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात अटक… धाराशिव कारागृहात महिनेभर राहिल्यानंतर फक्त तीन महिन्यांपूर्वीच मिळालेला जामीन… आणि आता त्याच विनोद गंगणेला भाजपाने एबी फॉर्म देत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार केलंय! या निर्णयानं भाजपावर विरोधकांकडून “गुन्हेगारांना अंगशी लावणारी पार्टी” अशी झोड उठली आहे. जुगारअड्डा, मटका बुकी ते ड्रग्ज तस्करी … असा गंगणे यांचा गुन्हेगारी प्रवास. एक गुन्हा अद्याप न्यायप्रविष्ट असताना, असा आरोपी निवडणुकीच्या रिंगणात — आणि तुळजापूर राजकारण अक्षरशः पेटलं! भाजपाचा खरा चेहरा उघडा पडा! ‘पार्टी विथ माफिया’ अशीच ओळख अबोला होत आहे. या वादामागे नाव घेतलं जातं ते भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांचं. परंतु राणा पाटील यांनी या विषयावर मौन बाळगलं. परंतु, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर — राणांनी त्यांना थेट पत्र लिहित प्रत्युत्तर दिलंय. पत्रात म्हटलंय — पुरावे घेऊन या, चर्चा करायला मी तयार आहे! तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला दिलेली उमेदवारी — यावरून तुळजापूरमधलं राजकारण तापलेलं; विरोधक आक्रमक, भाजप बचावाच्या भूमिकेत… आणि आता राणा पाटील विरुद्ध सुप्रिया सुळे या नव्या टप्प्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
130
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowNov 19, 2025 09:16:11111
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 19, 2025 09:13:2643
Report
PNPratap Naik1
FollowNov 19, 2025 08:57:5626
Report
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 08:51:5054
Report
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 08:48:5187
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 19, 2025 07:47:25100
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 19, 2025 07:34:42163
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 19, 2025 07:19:11199
Report
PNPratap Naik1
FollowNov 19, 2025 07:18:31200
Report
SKShubham Koli
FollowNov 19, 2025 07:06:37177
Report
MAMILIND ANDE
FollowNov 19, 2025 06:50:20134
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 19, 2025 06:31:20161
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 19, 2025 05:54:06128
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 19, 2025 05:53:50107
Report