Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

पैठण में नाथ षष्ठी का महाकुम्भ, भक्तों का समुद्र विठ्ठल के नाम से गूंजा

NMNITESH MAHAJAN
Mar 09, 2026 08:31:20
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर: पैठणच्या वाळवंटात भक्तीचा पूर; शांतीब्रह्माच्या दर्शनासाठी जनसागराचा महापूर दुमदुमला पंढरीचा राणा, पैठणी गूंजला विठ्ठल नामाचा गजर नाथचरणी वारकरी नतमस्तक; दक्षिण काशी दुमडुमली शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित 'नाथ षष्ठी' उत्सवासाठी आज दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या पैठण नगरीत भक्तीचा जनसागर लोटला आहे. भानुदास-एकनाथच्या जयघोषाने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला असून, गोदावरीच्या पात्रात पवित्र स्नानासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. राज्यभरातून आलेल्या शेकडो दिंड्यांनी पैठणमध्ये प्रवेश केला असून, ठिकठिकाणी हरिनामाचा गजर सुरू आहे. नाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, जायकवाडी धरणाच्या परिसरातही विशेष खबरदारी घेतली जात आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 09, 2026 10:34:47
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात नशेखोर तरुणांचा सफाई कामगारावर चाकुने हल्ला , हल्ल्यात सफाई कामगाराचा मृत्यू सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद क CAMP क्रमांक ३ मध्ये ही धक्का दायक घटना घडली आहे. महादू जगताप असे त्या मृत कामगाराच नाव असून तो कोणार्क इन्व्हायरो कंपनीमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. पॅनल क्रमांक ११ मध्ये कामावर असताना ही घटना घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे हे पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 09, 2026 10:33:56
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटा घेऊन तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. - एक लाख रुपये द्या अन तीन लाख रुपये मिळवा - होय ही ऑफर ऐकून तुम्ही देखील चक्रावलात ना ? - एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटा दिल्यास तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देणारी टोळी गजाआड - बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचे राज्यात रॅकेट ? ... सोलापूरात पोलिसांना देखील चक्रावून टाकणारी घटना समोर आलीय. एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटा दिल्यानंतर त्या बदल्यात तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आम्हीच दाखवणाऱ्या टोळीला सोलापूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ... एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा देणारी टोळी सोलापुरात सक्रिय होत असतानाच शहर पोलिसांनी घटनेचे वेळीच गांभीर्य ओळखात दोघा जणांना अटक केलीय. पोलिसांच्या माहितीनुसार संशयीतांनी बनावट नोटा पांढऱ्या कागदावर कलर झेरॉक्स केल्या. दोन कागद एकमेकांना चिकटवून हुबेहूब नोटा तयार करण्यात अल्या होत्या. जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तींना त्या नोटा खराच वाटल्या पाहिजेत अशी पुरेपूर काळजी या प्रक्रियेत घेण्यात आली होती. नोटांवर सिरीयल क्रमांक होता पुढच्या आणि मागच्या बाजूला कलर झेरॉक्स असलेल्या 300 हून अधिक कागदाच्या पती सापडल्या आहेत. एकूण 1 लाख 10 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जपत केल्या आहेत. बनावट नोटा चलनात आणण्यात प्रयत्नात असलेल्या राजू चोरमोले आणि अतुल तावरे या दोघांना जेलरोड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदण्यात आलाय. बाईट - एम. राजकुमार ( पोलीस आयुक्त सोलापूर शहर ) सदरच्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील व्यापारी चांगलेच धास्तावले असून या बनावट नोटांचे बळी आपण तरी नाही ना? अशी भिती त्यांच्या मनात निर्माण झालीय. पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांची सिरीज जाहीर करण्याची मागणी चेंबूर ऑफ कॉमर्सच्या वतीने करण्यात आलीय. अत्यंत गंभीर प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणल्याबद्दल सोलापूर शहर पोलिसांचे अभिनंदन करत व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाईट - राजू राठी ( अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, सोलापूर ) सध्या सदर प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अशा पद्धतीच्या बनावट नोटा त्यांनी कोणाकोणाला दिल्या आहेत ? सदरच्या रॅकेटमध्ये आणखीन कोणा कोणाचा हात आहे ? त्या पुढे कुठे चलनात गेल्या का? त्यांचे पुढे काय झाले? या सर्व बाबींचा सोलापूर शहर पोलीस कसून तपास करीत आहेत. End P2C अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 09, 2026 10:01:31
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... छावणी परिसरातील घराला भीषण आग अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात एका घराला अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. घराच्या तिसऱ्या मजल्यावर मंडपासाठी लागणारे कपडे आणि डेकोरेशनचे साहित्य ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग लागल्यानंतर काही क्षणातच आगीने मोठा भडका घेतला आणि आगीचे लोट बाहेर पडताना दिसत होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे तसेच यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 09, 2026 09:55:55
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिले में पिछले बारह महीनों में पुलिस ने गावठी पिस्तुलें और जिंदा कारतूस बड़ी मात्रा में जपत किए हैं। अपराधियों के द्वारा गावठी पिस्तुलों का इस्तेमाल बढ़ रहा है, और औसतन हर महीने रिकॉर्डेड अपराधियों के कब्जे से दो पिस्तुलें बरामद हो रही हैं, जिससे चिंता बढ़ी है। पुलिस कार्रवाइयों के बावजूद यह सवाल बना हुआ है कि यह गावठी पिस्तुलें कहां से आ रही हैं और कौन सप्लाई कर रहा है, इसका स्पष्ट उत्तर अभी तक नहीं मिल रहा। बड़े पैमाने पर हथियार-सामग्री बरामद होने से नागरिकों में भी भय और चिंता है। हालिया घटनाओं में इचलकरंजी शहर के एक मामले में एक आरोपी के साथ गोलीबारी का आरोप सामने आया। पुलिस ने कुख्यात शस्त्र तस्कर को भी गिरफ्तार किया, जिससे जप्त किए गए हथियारों के तस्करी से जुड़े मुद्दे सामने आए हैं। इसके साथ ही अन्य मामलों में भी गावठी पिस्तुलों, जिंदा कारतूस और घातक शस्त्र रखने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग तेज है।
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 09, 2026 09:55:27
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या रेती घाटां वर नियमबाह्य रेतीचा उपसा होत असल्याचा प्रकार पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बंसल यांनी उघडकीस आणला आहे. पोलीस व महसूल पथकाला सोबत घेऊन त्यांनी वडकी परिसरातील वर्धा नदीच्या रोहिणी घाटावर संयुक्त धाड मारली. खाजगी वाहनाने जात मारलेल्या या छाप्यात रेती वाहतूक करणारे 11 ट्रक, रेती उपसा करणाऱ्या दोन बोटी, दोन पोकलेन मशिन अशी एक कोटी 42 लाख रुपये किमतीची वाहने जप्त केली. या प्रकरणी 20 जणांवर वडकी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्ह्यात उमरखेड, वणी, बाभूळगाव, आर्णी येथील अनेक घाटांवर नियमांची ऐसी तैशी करून बेसुमार रेतीचा उपसा करून त्याचा साठा केल्या जात असतानाच झालेल्या या एका कारवाईमुळे रेती माफीयांचे धाबे दणाणले आहेत.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 09, 2026 09:49:22
Akola, Maharashtra:राज्यसभा आणि विधान परिषदेसारखेच महापालिकेतही विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याची तरतूद आहे. साहित्य, कला, विज्ञान ,सहकार, सामाजिक कार्य, वैद्यकीय, शिक्षण, अभियांत्रिकी किंवा विधी क्षेत्रात किमान पाच वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक म्हणून पाच वर्षांसाठी नियुक्त करता येते. मात्र अकोला महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रियेत या निकषांचे पालन झाले आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अकोला महानगरपालिकेच्या विशेष सभेत आठ स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करण्यात आली. या पदांसाठी एकूण 19 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी भाजपप्रणीत शहर सुधार आघाडीकडून अॅड. देवाशिष काकड, माजी नगरसेवक गिरीश गोखले, सामाजिक कार्यकर्त्या चंदा शर्मा आणि माजी नगरसेवक सुनील मेश्राम यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांनी आज निवड निश्चित झाली आहे. काँग्रेसकडून सामाजिक कार्यकर्ते आकाश कवडे आणि काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे निकटवर्तीय इलियास खान उर्फ गुड्डू पठाण यांची निवड करण्यात आली. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून काँग्रेसमधून काही महिन्या पूर्वी प्रवेश केलेल्या शंकर लंगोटे यांना संधी देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीने बांधकाम व्यावसायिक सुनील इन्नानी यांना उमेदवारी देत त्यांची निवड केली. पक्षांच्या शिफारशींनुसार अर्ज पात्र ठरल्याने या आठही स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत घोषणा सभेत करण्यात आली.मात्र या निवडीवरून काही पक्षांमध्ये नाराजीही उफाळून आली आहे. शिवसेना (उबाठा) मध्ये उमेदवारी न मिळाल्याने सुमारे 25 पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.तर काँग्रेसचे उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनाम दिला आहे.दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने बांधकाम व्यावसायिकाला उमेदवारी दिल्याने शहरात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 09, 2026 09:46:31
Kalyan, Maharashtra:कल्याण जवळील द्वारली पाडा येथील गुरचरण जमिनीवर भूमाफियांचे अतिक्रमण आरोप स्थानिक नागरिकांनी केला. तक्रार देऊन प्रशासन लक्ष देत नसल्याने अखिल संतप्त शेतकरी स्थानिक नागरिकांनी म्हैस घेऊन KDMC आयप्रभाग कार्यालयासमोर आंदोलन केले. कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत पालिकेचा निषेध करण्यात आला. सात दिवसांच्या आत कारवाई केली नाही तर आयुक्ताच्या घराबाहेर म्हशीचा ताबेला सुरु करणार असल्याचा इशारा देण्यात आला. कल्याणपूर्वेतील गुरांच्या चरण्यासाठी राखीव असलेल्या गुरचरण जमिनीवर अतिक्रमण करून अनेक चाळी उभारल्यामुळे या भागातील शेतकरी आणि तबेला चालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या अतिक्रमणामुळे गुरांना खाण्यासाठी जागा उरली नसल्याने आता गुरे कुठे चारायची असा प्रश्न उपस्थित झाला. महानगरपालिका आणि तहसीलदार कार्यालयाला वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी आणि स्थानिक रहिवासी मार्गदर्शनाखालीर सौरभ पांडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. त्यांनी एक म्हैस घेऊन केडीएमसीच्या आयप्रभाग कार्यालयावर धडक आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान एका म्हशीच्या पाठीवर “KDMC कमिशनर” असे लिहिण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांनी “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” असे टी-शर्ट परिधान केले. त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात म्हशीकडून अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र सात दिवसांच्या आत गुरचरण आणि शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई न झाल्यास तबेल्यातील सर्व म्हशी आयुक्तांच्या बंगल्यावर नेऊन तिथेच तबेला सुरू करणे असे इशारे देण्यात आले.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 09, 2026 09:36:18
Kolhapur, Maharashtra:भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असून अद्यापही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणात पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत संविधान हक्क संघर्ष समितीाच्या वतीने कोल्हापुरातील दसरा चौकात निदर्शन झाले. या आंदोलनात महेश पिळणकर यांच्या पत्नी तृप्ती पिळणकर यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ आणि प्रभावी तपास करावा, तसेच महेश पिळणकर यांचा शोध लावावा या मागणीसाठी संविधान हक्क संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापूरातील दसरा चौकात निदर्शने करण्यात आली. आंदोलनात पिळणकर कुटुंबीयांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनात महेश पिळणकर यांचा मुलगा पारस पिळणकर देखील उपस्थित होता. वडिलांचा शोध लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या प्रकरणात पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. कोल्हापुरात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती होतेय का असा सवाल ठाकरे सेनेच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस पक्षाच्या माजी सरपंच दोन महिने गायब आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाने देखील आवाज उठवावा अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान पिळणकर यांचे कुटुंबीय आणि आंदोलकांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तातडीने चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली. यावेळी कोल्हापुरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी महेश पिळणकर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं सांगत कुटुंबीयांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असं आश्वासन दिलं आहे. महेश पिळणकर यांचे नेमकं काय झाले याचे उत्तर कुटुंबीयांकडे नाही, त्यामुळे दररोज कुटुंबीय त्याची वाट पहात आहेत. पोलीस मात्र तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं सांगत लवकरच महेश पिळणकरांचा शोध घेऊ अस अस्वासन देत आहेत.. पण पोलिसांनी कसव वतीने तपास न करता युद्ध पातळीवर महेश पिळणकर याचे काय झाले ? याचा शोध घेतला पाहिजे. अन्यथा त्यांच्या गायब होण्याचे गूढ वाढतच जाईल.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 09, 2026 09:21:39
Malegaon, Maharashtra:राज्य के बजट में वस्त्र उद्योग को कुछ भी राहत नहीं मिली, मालगांव टेक्सटाइल हब में नाराजगी फैल गई। पिछले दौर में टेक्सटाइल मंत्री चंद्रकांत पाटील ने मालगांव का दौरा कर बड़े आश्वासनों की रेखा खींची थी, पर उद्योगपतियों और मजदूरों के लिए अभी तक कुछ भी ठोस नहीं मिला। हर साल करोड़ों रुपए GST टेक्सटाइल उद्योग के जरिये सरकार को जाते हैं, पर कारखानेदारों और मजदूरों को उसी अनुपात में सुविधाएं नहीं मिल रहीं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार ने अर्थसंकल्प में यंत्रमाग उद्योग को कोई रियायत नहीं दी, जिससे मालगांव के कारखानेदारों में नाराजी है। बजट में स्पिनिंग मिल्स के लिए सुविधाओं की मांग तो की गई है, लेकिन पावरलूम कारखानों और मजदूरों को अभी भी पर्याप्त राहत नहीं मिली है। बिजली के मीटर में परिवर्तन के कारण बिल बढ़ने जैसी परेशानियाँ भी सामने आ रही हैं।
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 09, 2026 09:20:56
Dharashiv, Maharashtra:धाराशिव के परंडا तालुक्यात आनाळा येथील घटना शॉर्टसर्किटमुळे जुन्या टायरला लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केल्याची घटना समोर आली आहे. या आगीत एक चारचाकी वाहन जळून खाक धाराशिवच्या परंडा तालुक्यातील आनाळा येथे जुन्या टायरला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने मोठे रूप घेतल्याने जवळ उभी असलेले वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी आले आग लागल्यानंतर टायर आणि डिझेलच्या टाकीमुळे मोठमोठे स्फोटासारखे आवाज झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. पाणी टाकून आणि विविध उपाययोजना करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 09, 2026 09:17:48
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 09, 2026 09:16:16
Nashik, Maharashtra:अँकर: नाशिकच्या उच्चभ्रू गंगापूर रोड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध आयुर्वेदिक महिला डॉक्टरने पतीच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्यांच्यावर लोकांचे मानसिक आरोग्य सुधारण्याची जबाबदारी आहे, ते स्वतः जिल्हा रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले पतीच आता या आत्महत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉ.मनीषा निलेश जेजुरकर यांनी मागील शुक्रवारी 6 मार्च रोजी सकाळच्या sुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केलीये.या घटनेने एकच खळबळ उडाली होती. विशेष बाब म्हणजे जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणारे त्यांचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्या जाचाला कंटाळून डॉ. मनीषाने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय... डॉक्टर मनीषा ह्या खाजगी क्लिनिक चालवत होत्या त्याचबरोबर त्या सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ म्हणून प्रॅक्टिस देखील करत होत्या.... डॉक्टर मनीषा आणि डॉक्टर निलेश जेजुरकर या दोघांमध्ये गेल्या दोन्ही वर्षांपासून वाद सुरू असल्याची माहिती आहे आणि या वादातूनच डॉक्टर मनीषा यांनी आत्महत्या केल्याचं माहेरच्या नातेवाईकांनी दिलेल्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे.या तक्रारीनुसार निलेश जेजुरकर यांच्या विरोधात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी डॉक्टर निलेश जेजुरकर हे फरार असून गंगापूर पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या पथकांकडून त्यांचा शोध सुरू आहे. मात्र डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांना झालेल्या मानसिक त्रासातून आणि घरात मिळणाऱ्या पतीच्या छळवणुकीतून आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याने ही घटना घडल्याचा आरोप करत या प्रकरणात डॉ.मनिषा यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या इतर संशयितांवर देखील कारवाई करण्यात येऊन न्याय मिळावा अशी मागणी डॉ.मनीषा यांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. बाईट-हेमंत भास्कर....मयत मनीषा चा भाऊ... सध्या डॉक्टर निलेश जेजुरकर हे फरार असल्याचे सांगण्यात आले आहे.गंगापूर रोड परिसरातील तपशीलांची पोलिस तपासणी सुरू आहे. संपूर्ण प्रकरणात आणखी तपास सुरू असून न्याय मिळावा हा एकच भाव आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 09, 2026 09:09:03
Shirur, Maharashtra:शिरूर पंचायत समिति के सभापति और उपसभापति पदों की आज चुनाव प्रक्रिया संपन्न हुई। शिरूर पंचायत समिति पर राष्ट्रवादी कांग्रेस के स्वाती घावटे सभापति चुनी गईं और उपसभापति के लिए रामराव सासवडे निर्विरोध चुने गए। चुनाव प्रक्रिया से पहले भाजपा की मनिषा पाचंगे ने सागर देवकर के नाम अर्ज दाखिल कर गुप्त मतदान की मांग की थी, पर निर्वाचन अधिकारी ने गुप्त मतदान के आवेदन को खारिज कर दिया, जिसके बाद भाजपा सदस्योंने अपना आवेदन वापस ले लिया। इस प्रकार सभापति और उपसभापति पदों की चयन प्रक्रिया निर्विघ्न पूरी हुई। राष्ट्रवादी कांग्रेस के नव निर्वाचित सभापति स्वाती घावटे ने तालुके के विकास के लिए आगे भी सभी प्रयास करने की बात कही।
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 09, 2026 09:05:14
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - आम्ही सगळे मुरलेले पैलवान, आमचा परस्पर बाजार करावे,एवढे आम्ही वेडी माणस नाहीत - संजयकाका पाटील. अँकर - सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेचा तिढा कायम असताना,राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्य नोंदणी मध्ये जिल्हा प्रशासनाकडुन त्रुटी काढण्यात येत असल्याने आज राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सगळ्याच नेत्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालय गाठत,सदस्य नोंदणी बजावण्याचा अधिकार गटनेत्या राजेश्वरी नाईक यांना देण्यात आला आहे, तसेच जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात येणाऱ्या त्रुटीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी प्रशासनावर दबाव होता का ? असा सवाल देखील उपस्थित केले आहे,तर आम्ही सगळे मुरलेले पैलवान आहोत,आमचा परस्पर बाजार करावे एवढे आम्ही वेडी माणस नाहीत,अश्या शब्दात संजय काका पाटलांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटलांवर देखील टीका केली आहे. जिल्हा परिषदेमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा हे लवकरच ठरवलं जाईल पण जिल्हा परिषद अध्यक्ष हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा व्हावा,अशी आमची मागणी असल्याचे देखील संजय काका पाटळांनी यावेळी स्पष्ट केले आहे. बाईट - संजयकाका पाटील - माजी खासदार, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष. बाईट - अजित घोरपडे - माजी मंत्री.
0
comment0
Report
Advertisement
Back to top