Back
मनोज जरांगे के आरोप: मंत्रालय के खिलाफ बड़ा साजिश-कट!
NMNITESH MAHAJAN
Feb 26, 2026 07:15:49
Jalna, Maharashtra
जालना : मनोज जरांगे( पॅकेज) जरांगेंविरोधात मंत्रालयात कुणी रचला कट? जरांगेंच्या आरोपाने खळबळ अँकर :मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट करत त्यांच्या विरोधात मंत्रालयात मोठा कट रचण्यात आल्याचा आरोप केला आहे.हा कट कुणी रचला यात कोण कोण सहभागी आहे याबाबत जरांगेंनी स्पष्ट सांगितलं नसलं तरीही येत्या 15 दिवसांत सगळं काही उघड होणार असल्याचे संकेत जरांगेंनी दिलेत.व्हिओ: मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा चर्चेत आलेत.यावेळी जरांगे चर्चेत येण्याचं कारण देखील मोठंय.1 ते 6 फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील मंत्रालयात माझ्या विरोधात मोठा कट रचण्यात आल्याचा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी केलाय.मंत्रालयातील या कटाचं सध्या स्टिंग ऑपरेशन सुरू असून हा कट रचतेवेळी एक महिला देखील उपस्थित असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.काल हिंगोली जिल्ह्यातील कामठा गावात आयोजित कार्यक्रमात जरांगे यांनी हा गौप्यस्फोट केलाय.या कटाबाबत माहिती मिळाल्यानंतर आपण या कटाची पडताळणी केली असून यातील माहिती खरी निघाल्याचही जरांगे यांनी भाषणात म्हटलंय.साऊंड बाईट : मनोज जरांगे बाईट व्हिओ : या कटाची माहिती आपल्याला 8 दिवसांपूर्वी मिळाली असल्याचा खुलासाही जरांगे यांनी त्यांच्या भाषणात केलाय. जरांगे यांनी नेमका कट काय आणि कुणी रचला याबाबत सध्यातरी माहिती देण्यास नकार दिलाय.मात्र ज्यांनी कट रचला त्यांच्यातीलच काही लोकांनी आपल्याला भेटून या कटाची माहिती दिल्याचं म्हटलंय.तसंच या कटाची राज्याच्या गृह मंत्रालयाकडून कसून चौकशी सुरू असून तपास अंतिम टप्प्यात असल्याचं देखील जरांगे यांनी नमूद केल्यानं एकच खळबळ उडालीय.साऊंड बाईट : मनोज जरांगे पाटील व्हिओ :०३: मनोज जरांगे यांनी त्यांच्या विरोधात विरोधकांनी रचलेल्या कटाचा गौप्यस्फोट केल्यानं मराठा समाजात संतापाची लाट उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचं आवाहन केलंय.जरांगे यांनी केलेला कट रचण्याचा हा पहिलाच आरोप नाही. याआधी देखील त्यांनी धनंजय मुंडे,देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचे आरोप केलेले आहेत.त्यामुळे आता राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयातच आपल्या विरोधात कट रचण्यात आल्याचा आरोप जरांगे यांनी केल्यानं जोरदार खळबळ उडालीय.आता हा कट कुणी आणि का रचला तसेच हा कट नेमका काय होता हे तपासाअंतीच उघड होणार हे निश्चीत नितेश महाजन,झी मीडिया,जालना
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowFeb 26, 2026 08:34:070
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 26, 2026 08:30:470
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 26, 2026 08:30:260
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 26, 2026 08:06:450
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 26, 2026 08:02:310
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 26, 2026 08:01:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 26, 2026 07:51:300
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 26, 2026 07:51:070
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 26, 2026 07:37:530
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 26, 2026 07:35:540
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 26, 2026 06:51:400
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 26, 2026 06:46:470
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 26, 2026 06:46:180
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 26, 2026 06:17:400
Report