Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

प्याज उत्पादक किसान मुंबई-आग्रा मार्ग पर रास्ता रोको, आंदोलन तेज

SKSudarshan Khillare
Feb 26, 2026 06:17:40
Yeola, Maharashtra
चांदवड ब्रेक संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकरी व उपोषणकर्त्यांकडून मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू... शासनाने आंदोलनाची कोणतीही दखलना घेतल्यामुळे शेतकऱ्यांचा झाला उद्रेक..... रस्ता रोको आंदोलनामुळे मुंबई आग्रा महामार्ग दुतर्फा झाला चक्काजाम..... पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू......
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Feb 26, 2026 07:15:49
Jalna, Maharashtra:जालना : मनोज जरांगे( पॅकेज) जरांगेंविरोधात मंत्रालयात कुणी रचला कट? जरांगेंच्या आरोपाने खळबळ अँकर :मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट करत त्यांच्या विरोधात मंत्रालयात मोठा कट रचण्यात आल्याचा आरोप केला आहे.हा कट कुणी रचला यात कोण कोण सहभागी आहे याबाबत जरांगेंनी स्पष्ट सांगितलं नसलं तरीही येत्या 15 दिवसांत सगळं काही उघड होणार असल्याचे संकेत जरांगेंनी दिलेत.व्हिओ: मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा चर्चेत आलेत.यावेळी जरांगे चर्चेत येण्याचं कारण देखील मोठंय.1 ते 6 फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील मंत्रालयात माझ्या विरोधात मोठा कट रचण्यात आल्याचा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी केलाय.मंत्रालयातील या कटाचं सध्या स्टिंग ऑपरेशन सुरू असून हा कट रचतेवेळी एक महिला देखील उपस्थित असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.काल हिंगोली जिल्ह्यातील कामठा गावात आयोजित कार्यक्रमात जरांगे यांनी हा गौप्यस्फोट केलाय.या कटाबाबत माहिती मिळाल्यानंतर आपण या कटाची पडताळणी केली असून यातील माहिती खरी निघाल्याचही जरांगे यांनी भाषणात म्हटलंय.साऊंड बाईट : मनोज जरांगे बाईट व्हिओ : या कटाची माहिती आपल्याला 8 दिवसांपूर्वी मिळाली असल्याचा खुलासाही जरांगे यांनी त्यांच्या भाषणात केलाय. जरांगे यांनी नेमका कट काय आणि कुणी रचला याबाबत सध्यातरी माहिती देण्यास नकार दिलाय.मात्र ज्यांनी कट रचला त्यांच्यातीलच काही लोकांनी आपल्याला भेटून या कटाची माहिती दिल्याचं म्हटलंय.तसंच या कटाची राज्याच्या गृह मंत्रालयाकडून कसून चौकशी सुरू असून तपास अंतिम टप्प्यात असल्याचं देखील जरांगे यांनी नमूद केल्यानं एकच खळबळ उडालीय.साऊंड बाईट : मनोज जरांगे पाटील व्हिओ :०३: मनोज जरांगे यांनी त्यांच्या विरोधात विरोधकांनी रचलेल्या कटाचा गौप्यस्फोट केल्यानं मराठा समाजात संतापाची लाट उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचं आवाहन केलंय.जरांगे यांनी केलेला कट रचण्याचा हा पहिलाच आरोप नाही. याआधी देखील त्यांनी धनंजय मुंडे,देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचे आरोप केलेले आहेत.त्यामुळे आता राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयातच आपल्या विरोधात कट रचण्यात आल्याचा आरोप जरांगे यांनी केल्यानं जोरदार खळबळ उडालीय.आता हा कट कुणी आणि का रचला तसेच हा कट नेमका काय होता हे तपासाअंतीच उघड होणार हे निश्चीत नितेश महाजन,झी मीडिया,जालना
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 26, 2026 06:46:47
Beed, Maharashtra:बीड जिल्ह्यात 22 फेब्रुवारी रोजी पोलीस पाटील भरतीची लेखी परीक्षा पार पडली. परंतु याच परीक्षेत काही उमेदवारांना चुकीच्या संचाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. ही बाब तेथील प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रश्नपत्रिका बदलण्यात आली. मात्र तोपर्यंत पेपर सोडविण्याचा बराच वेळ निघून गेला. त्यामुळे प्रशासनाच्या चुकीची शिक्षा उमेदवारांना भोगण्याची वेळ आली. सुकन्या राठोड या महिला उमेदवाराने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही बाब समोर आणली आहे. ज्या उमेदवारांना चुकीच्या संचाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्या उमेदवारांच्या परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली जातेय. जिल्ह्यात 11325 पोलीस पाटील पदाच्या परीक्षेसाठी 10886 उमेदवाराने परीक्षा दिली. मात्र अंबाडोगाई इथल्या परीक्षा केंद्रावर उमेदवारांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिके बाबत हा गोंधळ समोर आला. प्रशासनाच्या चुकीची शिक्षा उमेदवारांना का? असा सवाल केला जातोय. तर उमेदवारांच्या परीक्षा पुन्हा घेऊन दोन मार्च रोजी लागणारा अंतिम निकाल थांबवावा अशी मागणी उमेदवारांची आहे. या गोंधळावर आता प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.. बाईट : सुकन्या राठोड - उमेदवार बाईट: रविकुमार आडे -
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 26, 2026 06:46:18
Amravati, Maharashtra:मेळघाट यात्रेपूर्वी बच्चू कडूंनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत मांडली मेळघाटची व्यथा; बच्चू कडूंनी दाखवलं मेळघाटातील बालमजुरीचा भयान वास्तविक ज्या वयात मुलांच्या हातात पुस्तक असायला हवी होती त्या वयात मुलांच्या डोक्यावर विटा असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे त्यामुळे यात्रेपूर्वी बच्चू कडू यांच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देखील मेळघाटातील अनेक गावांपर्यंत मुलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती अत्यंत वेदनादायक आहे. शिक्षण, आरोग्य, वीज, पिण्याचे पाणी या प्राथमिक गरजांपासून आजही येथील नागरिक वंचित आहेत. याहूनही मन सुन्न करणारी बाब म्हणजे ज्या वयात मुलांच्या हातात पुस्तके असायला हवीत, स्वप्नं असायला हवीत, त्या कोवळ्या वयात हीच लेकरं विटभट्ट्यांवर कष्ट करताना दिसत आहेत. मेळघाट संघर्ष व कर्जमाफी आठवण यात्रा प्रचारादरम्यान आमच्या कार्यकर्त्यांनी पाहिलेली ही दृश्यं केवळ हृदयद्रावक नाहीत, तर आपल्या विकासाच्या दाव्यांवर एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत. ही केवळ काही मुलांची कथा नाही तर ही संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची जिवंत साक्ष असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 26, 2026 06:17:06
Kalyan, Maharashtra:कल्याण पश्चिमेतील ‘बिरला वन्या’ सोसायटीत कचऱ्याचा कहर; दुर्गंधीमुळे ८०० कुटुंबस त्रस्त, रहिवासी रस्त्यावर उतरले दुर्गंधीमुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिक आजारी... घर सोडून जाण्याची रहिवाशांची वेळ Anc..कल्याण पश्चिमेतील बिरला वन्या या उच्चभ्रू सोसायटीमध्ये सध्या सुमारे ८०० कुटुंबस वास्तव्यास आहेत. बाराशेहून अधिक फ्लॅट्स असलेल्या या सोसायटीमध्ये ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उभारण्यात आलेला प्रकल्प योग्य पद्धतीने न चालवता कचरा गोडाऊनमध्ये साचवला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) ने १०० किलोहून अधिक घनकचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना स्वतःच्या आवारात कचरा वर्गीकरण आणि खतनिर्मिती (कंपोस्टिंग) बंधनकारक केले आहे. मात्र संबंधित सोसायटीमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया न करता तो साठवून ठेवल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.रहिवाशांच्या मते, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक जण आजारी पडत आहेत. याबाबत अनेकवेळा विकासकांना सूचना करूनही दखल न घेतल्याने अखेर नागरिकांनी सोसायटीबाहेरील गाड्या आडव्या लावून निषेध नोंदवला. “हायप्रोफाईल सोसायटी म्हणून घर घेतले, पण आता दुर्गंधीमुळे घर विकण्याची वेळ आली आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली.दरम्यान, विकासकांकडून याबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर महानगरपालिकेचे घनकचरा विभागाचे अधिकारी रामदास कोकरे यांनी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.या प्रकारामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, रहिवाशांना तातडीने दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Byte : रहिवाशी 1,2,3,4
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 26, 2026 06:06:45
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील सरडपार गावात आंतरजातीय विवाह केल्याने गावाने सामाजिक बहिष्कार घातल्याचा दाम्पत्याचा आरोप, गावाने केला इन्कार अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात असलेल्या सरडपार गावात राहणाऱ्या सचिन आणि सुजाता सोनटक्के या जोडप्याने गावाने आपल्यावर आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार घातल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. ग्रामस्थांनी मात्र याचा इन्कार केलाय. व्ही. ओ. १) चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या सरडपार गावात आंतरजातीय विवाह केल्याने ग्रामस्थांनी एका जोडप्यावर बहिष्कार घालण्याची घटना उजेडात आली आहे. सचिन सोनटक्के हे अनुसूचित जातीतले आहेत तर सुजाता या अनुसूचित जमातीतील आहेत. मे 2023 मध्ये या दाम्पत्याचा अंतरजातीय विवाह झाला. मात्र त्यानंतर सोनटक्के कुटुंबीयांचे घरगुती वाद सुरू झाले आणि सचिन उनकी आई आणि भावाने सरडपार गावातील घर सोडून सिंडेवाही येथे आपला मुक्काम हलवला. मात्र सचिन आणि त्यांच्या पत्नीचा आरोप आहे की त्यांच्या कुटुंबीयांनी गावातील लोकांना त्यांच्या विरोधात भडकवले आणि तेव्हापासून त्यांच्यावर गावाने आणि विशेषत: त्यांच्या जातीतील लोकांनी सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकलाय. इतकच नाही तर त्यांच्या एक वर्षाच्या मुलाला देखील आशा वर्कर कडून कुठल्याही प्रकारची लस किंवा इतर गळ्या दिल्या गेल्या नाही. याबाबत पोलिसांत अनेक वेळा दाद मागितली गेली मात्र यावर कुठलीही कारवाई झालेली नाही असाही या दाम्पत्याचा आरोप आहे. TICTAC with सचिन सोनटक्के आणि सुजाता सोनटक्के, बहिष्कृत दाम्पत्य व्ही. ओ. २) तर दुसरीकडे गावातील लोकांनी या दाम्पत्यावर कुठल्याही प्रकारचा सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकण्यात आल्याच्या बाबीचा स्पष्टपणे इन्कार केलाय. बाईट ३) वासुदेव रामटेके, ग्रामपंचायत सदस्य, सरडपार व्ही. ओ. ३) या गंभीर घटनेवर सिंदेवाही पोलीसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर प्रकरण चौकशीत असल्याचं सांगत पोलिसांनी यावर बोलण्यास नकार दिलाय. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 26, 2026 05:46:59
Shirdi, Maharashtra:राजूर ते अहिल्यानगर निघालेल्या लॉंग मार्चचा आज तिसरा दिवस असून संगमनेर प्रांताधिकारी कार्यालय परिसरात कालचा मुक्काम आंदोलकांनी केला. 148 किलोमीटर पैकी 50 किलोमीटरच्या अंतर आंदोलकांनी पार केले असून काल मंत्रालयात झालेल्या बैठकीच्या चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. डॉ. अजिक नवले यांच्यासह 13 जणांच्या शिष्टमंडळाने काल मंत्रालयात चर्चा केली. या चर्चेत काही मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती असली तरी अनेक मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. या सगळ्या मागण्यांबाबत आज दुपारी 12:00 वाजेपर्यंत मंत्रालयातून काय निर्णय होतो यावरच आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट होईल. आंदोलकांनी आपल्या पुढील टप्प्याच्या लॉंग मार्च साठी तयारी पूर्ण केली असून आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या लोणी गावात हे लाल वादळ आज धडकणार आहे. संगमनेर प्रांत कार्यालयाबाहेर आंदोलकांनी घोषणाबाजी करत ठिय्या सुरू केलाय या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 26, 2026 05:46:15
Nagpur, Maharashtra:नागपुरात एका घरातील झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय . कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी घरमालक शेजाऱ्याला अटक केली आहे. कुश राजेंद्र पटेल असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. मंगळवारी तो घरासमोर खेळत होता. सायंकाळी सात वाजून गेल्यावरदेखील तो घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. घरासमोर राहणाऱ्या घराच्या जिन्याखाली रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या टाकीत एकाने सहज वाकून पाहिले असता तेथे कुश बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तातडीने बाहेर काढून पारेख इस्पितळात व तेथून वर्धमाननगरातील पुगलिया इस्पितळात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ज्या घराचे पाण्याच्या टाकीला झाकण किंवा जाळी लावली नव्हती. त्यामुळे खेळता खेळता कुश त्यात पडला. कुशचे काका जितेंद्र पटेल यांच्या तक्रारीवरून टाकीचे झाकण उघड्या असलेल्या घरमालकाला गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 26, 2026 05:46:06
Nagpur, Maharashtra:नागपूर एम्स मेस के खाने में किडे और सुरवंट आढळले विद्यार्थ्यांच्या मेसमधील घटना, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) में विद्यार्थ्यांच्या मेसच्या जेवणात किडे आणि सुरवंट आढळले. मशरूमأैवजी, मशरूम करीमध्ये स्पंजयुक्त पदार्थ आढळला. बुधवारी, पदवीधर विद्यार्थ्यांच्या मेसमध्ये जेवताना, विद्यार्थ्यांना एक सुरवंट आढळला. सुरवंट पूर्णपणे तेलात तळलेला होता. फळांच्या तुकड्यावर एक मृत किडा आढळला आणि भाजीमध्ये माशीसारखा पदार्थ आढळला. शिवाय, मशरूम करीमध्ये एक स्पंजयुक्त पदार्थ आढळला, एम्ससारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या मेसमधील निष्काळजीपणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 26, 2026 05:00:29
Amravati, Maharashtra:27 फेब्रुवारीपासून सीसीआयची कापूस खरेदी नोंदणी होणार बंद; हजारो विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी अँकर :- 27 फेब्रुवारी पासून अमरावती जिल्ह्यात सीसीआयची कापसू खरेदी नोंदणी बंद होणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या आठ-दहा दिवसात कापसाचे दर हजार ते बाराशे रुपये कमी झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सीसीआय मध्ये कापूस विकण्यासाठी नोंदणी करायला सुरुवात केली होती मात्र आता 27 फेब्रुवारी पासून सीसीआयची कापड खरेदीची नोंदणी बंद होणार असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांकडे कागदपत्र तयार नसल्याने शेतकरी 27 फेब्रुवारी पूर्वी सीसीआय कडे नोंदणी करू शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी भावात कापसाची विक्री करावी लागणार आहे आता सीसीआयने नोंदणी बंद केली तर शेतकऱ्यांनी कापूस विक्री कुठे करावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top