Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

मराठी भाषा पर गर्व: बंजारा बोली की कविता से अभिमान मराठी उजागर

SRSHRIKANT RAUT
Feb 26, 2026 07:35:54
Yavatmal, Maharashtra
मराठी भाषा दिनानिमित्त बंजारा बोलीभाषेतील कविता. अभिमान मराठी... माझ्या मराठी भाषेची गाते मी गुणगान.. माझी मराठी भाषा सर्वात महान.. माझ्या ओठावरील पहिलं गाणं मराठी माझ्या श्वासात दरवळणारा अभिमान मराठी.. संत तुकोबा ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगातील ज्ञानदीप मराठी.. शौर्याच्या रणांगणात घुमती तलवार मराठी.... छत्रपतींच्या स्वाभिमानाचा तेजस्वी बाण मराठी... आईच्या कोमल स्पर्शातील जाण मराठी... संस्काराच्या मातीत उगवणारे बीज मराठी... माझ्या शब्दाच्या कणा-कणांमध्ये वास करणारे तेज मराठी... ओल्याचिंब भावनांवर फुललेले फुल मराठी... एकतेच्या धाग्यात सकलांना गुंफणारी माय मराठी.... माझ्या गोरबंजारा बोलीची सखी मराठी... माझी शक्ती,माझी शान, माझा अभिमान मराठी... जगातील एक महान भाषा माझी माय मराठी.. शब्द रचना.. मार मराठी भाषर गाउचू गुणगान, मार मराठी भाषा छ सबैमायी मदान... मार होटेपरेरो पेलो गीत मराठी, श्वासेमायी फेलेवाळो अभिमान मराठी.. संत तुकोबा ज्ञानेश्वर माऊलीर अभंगेमायीर ज्ञानदीप मराठी... शौर्येर रणांगणेम घुमेवाळ तलवार मराठी, छत्रपतीर स्वाभीमानेर तेजस्वी बाण मराठी.. याडीर नाजुक स्पर्शमायीर पेल जाग मराठी, संस्कारेर घडीमायीती निकळेवाळो बीज मराठी.. मारे शब्देर कनेंमायी वास करेवाळो तेज मराठी, भिनी-भिनी भावनापर फुलेवाळो फुल मराठी.. एकतार दोरामायी सेनं वनेंवाळो प्रेम मराठी, मारे गोरुर बोलीर भेन मराठी... मार शक्ती, मार शान - मारो अभिमान मराठी... जगेमायीर एक महान भाषा छ मार मराठी... शब्दरचना :
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 26, 2026 09:06:06
Latur, Maharashtra:राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी निश्चित... रामदास आठवले यांचा दावा...उमेदवारीबाबत कोणतीही शंका नाही...आठवले यांची स्पष्टीकरण... राजसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून मंत्रिमंडळात असल्यामुळे माझी उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. अनेकांची नावे चर्चेत असली तरी माझ्या उमेदवारीबाबत कोणतीही शंका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एप्रिल महिन्यात माझा कार्यकाळ संपत असून, काही दिवसांतच मी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले त्यांनी लातूर मध्ये दिली आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 26, 2026 08:34:07
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - द्राक्ष वेलीवर भला मोठा नाग.. प्राणी मित्राकडून सुटका.. अँकर - सद्या उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने मुक्या जीवांची तडफड जाणवू लागली आहे. सांगलीच्या कवलापूर येथे द्राक्ष बागेत काम करताना शेतकरी गणेश पाटील यांना वेलीवर साडे पाच फुट लांबीचा नाग आढळून आला. उन्हाचा तडाख्यापासून बचाव करण्यासाठी वेलीला वेटोळे घालून बसलेला हा नाग सहज दिसून येत नव्हता. यावेळी पाटील यांनी सर्पमित्र याना बोलावून घेतले. घटनास्थळी सर्पमित्र गजानन जाधव आणि त्यांचे सहकारी ओकार कुपाडे यांनी नागाला पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झुडпе, पाण्याची ठिकाणे आणि अडगळीच्या जागा याठिकाणी काम करताना शेत करते नी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जाधव यांनी केले.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 26, 2026 08:30:47
Dhule, Maharashtra:धुले जिलेाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी भूमफायांच्या बाजूने निकाल देत त्यांना कोट्यावधी रुपयांचा आर्थिक लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी आमदार शिवसेना उबाठाचे नेते अनिल गोटे यांनी केलेला आहे. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी भूसंपादनाच्या दराबाबतीतील शेतकऱ्यांचे अपील फेटाळून लावले, मात्र भूमाफी यांचे अपील स्वीकारत त्यांच्या बाजूने निकाल दिल्याचाही आरोप अनिल गोटे यांनी केलेला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या भूसंपादनाला काही लाख रुपयांचा मोबदला दिला जात असताना, भूमाफियांना मात्र कोट्यावधी रुपयांची मोबदला मंजूर केली जात असल्याचा आरोप गोटे यांनी केलेला आहे. यात प्रशासनासह सर्वेच सहभागी असल्याचा नुकसानाची चर्चा ही गोटे यांनी केली आहे. जो न्याय राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी लावण्यात आलेला आहे तोच न्याय मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी लावण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. भूमाफियांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या या कटकारस्थानाबद्दल केंद्रीय मंत्र्याकडे तक्रार केल्याचं ही अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. अनिल गोटे यांच्या तक्रारीची काय दखल घेतली जाते आणि जिल्हाधिकाऱ्यांसह दोषींवरती काय कारवाई होते? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 26, 2026 08:02:31
Satara, Maharashtra:साताऱ्यात गुन्हेगारीचा नवा ट्रेंड समोर येतोय का? शहरात ‘कोयता गँग’ पुन्हा सक्रिय झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या घटनांमध्ये तरुण मुलांचा सहभाग वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. करंजे पेठेतील काल झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या कोयता गँग संस्कृतीचा हा विशेष आढावा… व्हिओ 1 करंजे पेठ नाका… गजबजलेला परिसर… आणि अचानक सुरू होतो कोयत्यांचा थरार…दोन हल्लेखोर गॅरेजमध्ये घुसतात आणि अक्षय गाडे या तरुणावर धारदार कोयत्याने सपासप वार करतात. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.(सीसीटीव्ही व्हिडिओ वापरणे) जखमी अवस्थेतही अक्षय याने धाडस दाखवत एका हल्लेखोराला दुकानातच कोंडून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि एका आरोपीला ताब्यात घेतले. मात्र दुसरा साथीदार मात्र फरार आहे. बाईट - अक्षय गाडे (हल्ल्यात जखमी व्यक्ती) व्हिओ 2 ही घटना एकटी नाही. दोन महिन्यांपूर्वी नेले-किडगाव येथे एका तरुणावर कोयत्याने हल्ला झाला होता यात तो व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. गेल्या महिन्यात देखील करंजे परिसरात रविवार पेठेतील वृषभ जाधव यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले आणि घटनेत त्यांचा मृत्यू झाला.सलग घडणाऱ्या या घटनांमुळे साताऱ्यात ‘कोयता गँग’ सक्रिय झाल्याची चर्चा रंगली आहे. बाईट - तुषार दोशी पोलिस अधीक्षक व्हिओ 3-या कालचा घटनेतील हल्लेखोर हे पुण्यातून आयात करण्यात आले होते .जुन्या वादातून हा हल्ला घडवून आणण्यात आला होता असं पोलिसांचे सांगणे आहे. बाईट - तुषार दोशी पोलिस अधीक्षक ग्राफिक्स / विश्लेषण : भरदिवसा हल्ले धारदार शस्त्रांचा खुलेआम वापर सोशल मीडियावर दहशतीचे प्रदर्शन आणि सर्वात चिंतेची बाब म्हणजे तरुण मुलांचा वाढता सहभाग किरकोळ वाद, परिसरातील वर्चस्व आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी हे हल्ले होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विओ end: साताऱ्यात वाढती ‘कोयता संस्कृती’ ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नाही, तर सामाजिक चिंतेचा विषय ठरत आहे. अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे का वळत आहेत? यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. तुषार तपासे सातारा
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 26, 2026 07:51:30
Akola, Maharashtra:केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारामुळे शेतमालांचे दर घसरले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत हा करार तात्काळ रद्द करावा, अशी मागणी उबाठा गटाने केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्यापोटी हेक्टरी १७ हजार रुपयांची मदत जाहीर केली होती, मात्र ती मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही, ही रक्कम तात्काळ जमा करावी, या मागणीसाठी अकोला जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. अकोला जिल्ह्यातील तब्बल ३६ ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. विविध प्रमुख मार्गांवर रास्ता रोको करून शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलोनकर्त्यांनी सांगितले की, अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे आयात वाढून स्थानिक शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असताना जाहीर केलेली मदतही अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 26, 2026 07:37:53
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात स्वयंघोषित पंतप्रधानाचा प्रकार उघडकीस आला आहे. महादेव आसेकर नावाच्या व्यक्तीने स्वतःला पंतप्रधान घोषित करत लेटरपॅड प्रिंट केले असून त्यावर पीएम भारत सरकार असे छापले आहे. आपल्या स्वतःच्या फॉर्चूनर गाडीवरही त्यांनी पीएम लिहिले आहे. आसेकर यांना जमीन विक्रीतून मोठी रक्कम मिळाली, आणि या रकमेतून लक्झरी वाहन घेतल्याचे सांगितले जाते. आसेकर यांनी पोलिसांना पत्र देत पंतप्रधान म्हणून आपल्याला अंगरक्षक आणि पिस्तौल देण्याची मागणी केली आहे. आपल्या मागण्या पूर्ण न करणाऱ्या ठाणेदाराला बदलून नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे. या प्रकाराकडे सध्या विनोदी पद्धतीने बघितले जात असले तरी पोलिसांनी मात्र याची दखल घेतल्याचे समजते. या नव्या पंतप्रधानाची मात्र वरोरा शहरात चर्चा आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 26, 2026 07:15:49
Jalna, Maharashtra:जालना : मनोज जरांगे( पॅकेज) जरांगेंविरोधात मंत्रालयात कुणी रचला कट? जरांगेंच्या आरोपाने खळबळ अँकर :मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट करत त्यांच्या विरोधात मंत्रालयात मोठा कट रचण्यात आल्याचा आरोप केला आहे.हा कट कुणी रचला यात कोण कोण सहभागी आहे याबाबत जरांगेंनी स्पष्ट सांगितलं नसलं तरीही येत्या 15 दिवसांत सगळं काही उघड होणार असल्याचे संकेत जरांगेंनी दिलेत.व्हिओ: मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा चर्चेत आलेत.यावेळी जरांगे चर्चेत येण्याचं कारण देखील मोठंय.1 ते 6 फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील मंत्रालयात माझ्या विरोधात मोठा कट रचण्यात आल्याचा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी केलाय.मंत्रालयातील या कटाचं सध्या स्टिंग ऑपरेशन सुरू असून हा कट रचतेवेळी एक महिला देखील उपस्थित असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.काल हिंगोली जिल्ह्यातील कामठा गावात आयोजित कार्यक्रमात जरांगे यांनी हा गौप्यस्फोट केलाय.या कटाबाबत माहिती मिळाल्यानंतर आपण या कटाची पडताळणी केली असून यातील माहिती खरी निघाल्याचही जरांगे यांनी भाषणात म्हटलंय.साऊंड बाईट : मनोज जरांगे बाईट व्हिओ : या कटाची माहिती आपल्याला 8 दिवसांपूर्वी मिळाली असल्याचा खुलासाही जरांगे यांनी त्यांच्या भाषणात केलाय. जरांगे यांनी नेमका कट काय आणि कुणी रचला याबाबत सध्यातरी माहिती देण्यास नकार दिलाय.मात्र ज्यांनी कट रचला त्यांच्यातीलच काही लोकांनी आपल्याला भेटून या कटाची माहिती दिल्याचं म्हटलंय.तसंच या कटाची राज्याच्या गृह मंत्रालयाकडून कसून चौकशी सुरू असून तपास अंतिम टप्प्यात असल्याचं देखील जरांगे यांनी नमूद केल्यानं एकच खळबळ उडालीय.साऊंड बाईट : मनोज जरांगे पाटील व्हिओ :०३: मनोज जरांगे यांनी त्यांच्या विरोधात विरोधकांनी रचलेल्या कटाचा गौप्यस्फोट केल्यानं मराठा समाजात संतापाची लाट उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचं आवाहन केलंय.जरांगे यांनी केलेला कट रचण्याचा हा पहिलाच आरोप नाही. याआधी देखील त्यांनी धनंजय मुंडे,देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचे आरोप केलेले आहेत.त्यामुळे आता राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयातच आपल्या विरोधात कट रचण्यात आल्याचा आरोप जरांगे यांनी केल्यानं जोरदार खळबळ उडालीय.आता हा कट कुणी आणि का रचला तसेच हा कट नेमका काय होता हे तपासाअंतीच उघड होणार हे निश्चीत नितेश महाजन,झी मीडिया,जालना
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 26, 2026 06:46:47
Beed, Maharashtra:बीड जिल्ह्यात 22 फेब्रुवारी रोजी पोलीस पाटील भरतीची लेखी परीक्षा पार पडली. परंतु याच परीक्षेत काही उमेदवारांना चुकीच्या संचाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. ही बाब तेथील प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रश्नपत्रिका बदलण्यात आली. मात्र तोपर्यंत पेपर सोडविण्याचा बराच वेळ निघून गेला. त्यामुळे प्रशासनाच्या चुकीची शिक्षा उमेदवारांना भोगण्याची वेळ आली. सुकन्या राठोड या महिला उमेदवाराने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही बाब समोर आणली आहे. ज्या उमेदवारांना चुकीच्या संचाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्या उमेदवारांच्या परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली जातेय. जिल्ह्यात 11325 पोलीस पाटील पदाच्या परीक्षेसाठी 10886 उमेदवाराने परीक्षा दिली. मात्र अंबाडोगाई इथल्या परीक्षा केंद्रावर उमेदवारांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिके बाबत हा गोंधळ समोर आला. प्रशासनाच्या चुकीची शिक्षा उमेदवारांना का? असा सवाल केला जातोय. तर उमेदवारांच्या परीक्षा पुन्हा घेऊन दोन मार्च रोजी लागणारा अंतिम निकाल थांबवावा अशी मागणी उमेदवारांची आहे. या गोंधळावर आता प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.. बाईट : सुकन्या राठोड - उमेदवार बाईट: रविकुमार आडे -
0
comment0
Report
Advertisement
Back to top