Back
सातारा में कोयता गैंग फिर से सक्रिय, युवाओं की भागीदारी बढ़ी
TTTUSHAR TAPASE
Feb 26, 2026 08:02:31
Satara, Maharashtra
साताऱ्यात गुन्हेगारीचा नवा ट्रेंड समोर येतोय का? शहरात ‘कोयता गँग’ पुन्हा सक्रिय झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या घटनांमध्ये तरुण मुलांचा सहभाग वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. करंजे पेठेतील काल झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या कोयता गँग संस्कृतीचा हा विशेष आढावा…
व्हिओ 1
करंजे पेठ नाका… गजबजलेला परिसर… आणि अचानक सुरू होतो कोयत्यांचा थरार…दोन हल्लेखोर गॅरेजमध्ये घुसतात आणि अक्षय गाडे या तरुणावर धारदार कोयत्याने सपासप वार करतात. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.(सीसीटीव्ही व्हिडिओ वापरणे)
जखमी अवस्थेतही अक्षय याने धाडस दाखवत एका हल्लेखोराला दुकानातच कोंडून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि एका आरोपीला ताब्यात घेतले. मात्र दुसरा साथीदार मात्र फरार आहे.
बाईट - अक्षय गाडे (हल्ल्यात जखमी व्यक्ती)
व्हिओ 2
ही घटना एकटी नाही.
दोन महिन्यांपूर्वी नेले-किडगाव येथे एका तरुणावर कोयत्याने हल्ला झाला होता यात तो व्यक्ती गंभीर जखमी झाला होता.
गेल्या महिन्यात देखील करंजे परिसरात रविवार पेठेतील वृषभ जाधव यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले आणि घटनेत त्यांचा मृत्यू झाला.सलग घडणाऱ्या या घटनांमुळे साताऱ्यात ‘कोयता गँग’ सक्रिय झाल्याची चर्चा रंगली आहे.
बाईट - तुषार दोशी पोलिस अधीक्षक
व्हिओ 3-या कालचा घटनेतील हल्लेखोर हे पुण्यातून आयात करण्यात आले होते .जुन्या वादातून हा हल्ला घडवून आणण्यात आला होता असं पोलिसांचे सांगणे आहे.
बाईट - तुषार दोशी पोलिस अधीक्षक
ग्राफिक्स / विश्लेषण :
भरदिवसा हल्ले
धारदार शस्त्रांचा खुलेआम वापर
सोशल मीडियावर दहशतीचे प्रदर्शन
आणि सर्वात चिंतेची बाब म्हणजे तरुण मुलांचा वाढता सहभाग
किरकोळ वाद, परिसरातील वर्चस्व आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी हे हल्ले होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विओ end:
साताऱ्यात वाढती ‘कोयता संस्कृती’ ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नाही, तर सामाजिक चिंतेचा विषय ठरत आहे. अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे का वळत आहेत? यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.
तुषार तपासे सातारा
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 26, 2026 09:19:290
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 26, 2026 09:06:060
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 26, 2026 08:34:070
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 26, 2026 08:30:470
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 26, 2026 08:30:260
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 26, 2026 08:06:450
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 26, 2026 08:01:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 26, 2026 07:51:300
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 26, 2026 07:51:070
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 26, 2026 07:37:530
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 26, 2026 07:35:540
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 26, 2026 07:15:490
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 26, 2026 06:51:400
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 26, 2026 06:46:470
Report