Back
जालना के सालगड्या के भिकन रोजेकर UPSC में 812वीं रैंक, गांव में उत्साह
NMNITESH MAHAJAN
Mar 17, 2026 09:30:56
Jalna, Maharashtra
जालना | सालगड्याच्या मुलाचं UPSC मध्ये यश, पत्र्याच्या शेडमध्ये राहून यश मिळवल्यानं सत्कारासाठी गावकऱ्यांची गर्दी (पॅकेज) अँकर : यश मिळवण्यासाठी परिस्थिती कधीही अडथळा ठरत नाही. त्यासाठी अथक परिश्रम, सातत्य, जिद्द अन चिकाटीची आवश्यकता असते. हेच सिद्ध करून दाखवलं आहे. जालन्यातील भिकन रोजेकर याने. नुकत्याच जाहिर झालेल्या युपीएससी परीक्षेच्या अंतिम गुणवत्ता यादीत भिकन देशात 812 रॅंक ने उत्तीर्ण झाला आहे.भिकनच्या वडिलांनी सालगडी म्हणून काम केलेलं असल्यानं भिकनचं यश कौतुकाचा विषय बनलाय.पाहूया भिकनच्या यशावरचा हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ :१: यूपीएससी परीक्षेचे निकाल लागले आणि जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या सपकाळ जळगाव गावातल्या नागरिकांच्या आनंदाला उधाण आलंय.याच गावातल्या एका सालगड्याच्या मुलानं यूपीएससी परीक्षेत जोरदार मुसंडी मारत 812 वी रँक मिळवलीय. भिकन रोजेकर असं या यशस्वी विद्यार्थ्यांचं नाव आहे.याआधी भिकनने 4 वेळा यूपीएससीची परीक्षा दिली पण पदरी निराशाच पडली पण पाचव्या प्रयत्नात त्यानं यशाला गवसणी घातली.भिकनला IPS कॅडर मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय.भिकन रोजेकर यांचे प्राथमिक शिक्षण चाळीसगाव तालुक्यातील वाडा येथे झाले. भिकन यांनी माध्यमिक शिक्षण जळगाव सपकाळ येथील विनय विद्यालयातून, तर पदवी छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयातून पूर्ण केली.त्यानंतर भिकनने UPscच्या तयारी साठी दिल्ली गाठली आणि पाचव्या प्रयत्नात युपीएससी सर करत घर गाठलं. भिकन रोजेकर,यूपीएससी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी(चेक्स शर्टवरील बाईट) भिकनच्या कुटुंबाची परिस्थिती तशी बेताचीच आहे.त्याच्या वडिलांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून काम केलंय.भिकनच्या कुटुंबाकडे अवघी 2 एकर जमीन आहे.या जमिनीवरच राब राब राबून या कुटुंबाची वर्षभर गुजरान चालते.मात्र भिकनं यूपीएससीत यश मिळवल्यानं वडिलांच्या डोळ्यांचे पारणे फेडले गेलेत. जगन रोजेकर,भिकनचे वडील(फेटा घातलेले) यूपीएससीच्या निकालात भिकननं मिळवलेल्या यशामुळे त्याच्या गावातील नागरिकांसह परीसरातील नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाहीय.दररोज लोक येऊन भिकनसह कुटुंबियांचा सत्कार करतायत.एका सालगड्याच्या मुलानं पत्र्याच्या शेडमध्ये राहून यश मिळवल्याचा आनंद गावकऱ्यांच्या आणि भिकनच्या मित्रांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. गावातील नागरिक आणि भिकनच्या हिरव्या शर्टवरील मित्राचा बाईट टाकावा. भिकनच्या कुटुंबात आई,वडील,बहीण आणि भाऊ राहतात. भिकनचा भाऊ भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून काम करतोय.तर भिकनने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानं रोजेकर कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाहीय.त्यामुळे झी-२४ तास कडूनही भिकनच्या यशाचं कौतुक आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 17, 2026 10:52:46505
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 10:52:29439
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 10:51:02441
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 10:50:28558
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 10:40:111018
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 17, 2026 10:23:37908
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 10:23:251050
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 10:19:481091
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 17, 2026 10:06:061078
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 10:03:58Yeola, Maharashtra:प्रहार जनशक्ती मोर्चा आंदोलन संदर्भात
1002
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 10:03:05956
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 17, 2026 10:00:21970
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 09:56:10989
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 17, 2026 09:55:481024
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 09:54:331035
Report