Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410501

HPCL gate par gas kalabazari: truck se silencer utar kar kiya gaya avaidha vikray

HCHEMANT CHAPUDE
Mar 17, 2026 10:19:48
Chakan, Maharashtra
चाकण औद्योगिक क्षेत्रात गॅस टंचाईमुळे उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि कामगारांचे जीवन अडकलेले असतानाच चाकणच्या HP गॅस कंपनीच्या गेटवर रांगेत उभ्या गॅस ट्रकमधूनच सिलेंडर बाहेर काढून सर्रास काळाबाजार केला जात असल्याचे उघड झाले. काल कामगारांनी 500 ते 700 रुपये किलो दराने गॅस विक्री होत असल्याचा गंभीर आरोप केला होता, आणि आज त्याच आरोपाला पुष्टी देणारे चित्र थेट HPCL कंपनीच्या गेटवर कॅमेऱ्यात कैद झाले आहे. कंपनीच्या गेटसमोर रांगेत उभ्या असलेल्या गॅस ट्रकमधूनच सिलेंडर बाहेर काढून सर्रास काळाबाजार केला जात असल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ट्रकमधून काढलेले सिलेंडर घेऊन तीन तरुण घटनास्थळावरून पळून गेले, आणि हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्या ठिकाणी गॅसचा अधिकृत पुरवठा व्हायला हवा, त्याच ठिकाणी चालकांकडूनच काळाबाजार होत असल्याने संपूर्ण व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. एकीकडे गॅसअभावी हॉटेल बंद होण्याच्या उंबरठ्यावर, उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर, आणि सर्वसामन्य नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे काळाबाजार खुलेआम सुरू असल्याचे चित्र संतापजनक आहे. HPCL कंपनीच्या गेटवरच हा प्रकार घडत असल्याने प्रशासन आणि कंपनीच्या देखरेखीवर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. आता प्रश्न एकच हा काळाबाजार थांबवणार कोण? आणि जबाबदारांवर कारवाई कधी होणार?
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKShubham Koli
Mar 17, 2026 11:31:25
Thane, Maharashtra:ठाण्यात चैत्र नवरात्रोत्सवाचा जल्लोष; आई तुळजाभवानी मंदिराची भव्य प्रतिकृती ठाकरे बंधू एकत्र उपस्थित दर्शन घेणार? चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर यंदाही चैत्र नवरात्रोत्सवाचा भक्तीचा महासागर उसळणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे उत्सवाचे हे ३१ वे वर्ष असून, यंदा धाराशिव येथील आई तुळजाभवानी मंदिराची ७० फूट उंच भव्य प्रतिकृती ठाणेकरांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे अनेक राजकीय नेते दर्शनकरिता येत असतात मात्र यंदा ठाकरे बंधू यांच्या युतीमुळे दोन्ही ठाकरे बंधू दर्शनाकरिता येतील व जे युद्ध चालू आहे ते थांबावे अशी देवीकडे प्रार्थना करतो असे यावेळी विचारे म्हणाले आहेत... गुरुवार दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता कळवा बाजारपेठ येथून देवीचा आगमन सोहळा सुरू होईल. ३०० जणांचे लेझीम पथक, वारकरी संप्रदाय, झांज पथक, बँड, घोडेस्वार, आदिवासी नृत्य, दांड पट्टे आणि मावळ्यांच्या लवाजम्यासह ही मिरवणूक काढण्यात येणार आहे.
661
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 17, 2026 11:04:47
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य मोहर्ली मार्गावर वाघाचा वाहनाखाली उतरून पाठलाग केल्याप्रकरणी व्हायरल व्हिडिओवर वनविभागाच्या विविध उपाय योजना, वाघाचा मार्ग अडवल्या प्रकरणी सात जणांची ओळख पटली,आरोपी फरार, वन गुन्हा दाखल, आता सकाळ ते रात्र पर्यंत मोहर्ली मार्गावर सुसज्ज तपासणी वाहन राहणार तैनात, हुल्लडबाजांना आळा घालण्यासाठी वनविभाग घेणार सीसीटीव्हीची ही मदत अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य मोहर्ली मार्गावर वाहनाखाली उतरून वाघाचे अत्यंत जवळून व्हिडिओ घेत हुल्लड करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने कडक पावले उचलली आहेत. या व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवली जात असून यातील सात जणांची ओळख आतापर्यंत पटली आहे. सध्या या प्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्ही. ओ. १) हा बघा विडिओ.... हा व्हिडिओ आहे जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या पद्मापूर- मोहर्ली मार्गावरचा. दुर्दैवाने पर्यटक असलेले हे लोक वाघाला मांजर समजून एक-दोन हात अंतरावरून , वाहनाखाली उतरून व्हिडिओ काढत आहेत. नाचत आहेत, खिदळत आहेत. देशातील मानव वन्य जीव संघर्षात च्या आकड्यात चंद्रपूरचा क्रमांक पहिल्या 10 मध्ये आहे रोज वाघाच्या अथवापण्य जीवाच्या हल्ल्यात कोणी मृत अथवा जखमी झाल्याच्या घटना होत असतात मात्र त्यावरून या पर्यटकांनी कुठलाही बोध घेतला झालेला दिसत नाही खुशाल व्हिडिओ काढत वाघाचा मार्ग अडवून असुरी आनंद व्यक्त केला जातोय सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभाग खडबडून जागा झाला आहे यातील वाहने व व्यक्ती यांची ओळख पटवली जात आहे आतापर्यंत सात जणांची ओळख पटली असून अन्य वाहने ओळखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाची मदत घेतली जात आहे. या मार्गावरील पहिला नाका असलेल्या पद्मापूर द्वारावर सीसीटीव्हीची ही तपासणी केली जात असून फरार असलेल्या आरोपींच्या घरी वनपथक पोहोचले आहे. सध्या काही भागात ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गस्ती वाहनांची  अनियमित ये-जा असते मात्र आता या प्रमुख मोहर्ली मार्गावर सकाळ ते रात्र पर्यंत एक सुसज्ज गस्ती वाहन तैनात राहणार असून हुल्लडबाजांना आळा घालण्यासाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. वन्यजीव हालचाल माहित होण्यासाठी आगरझरी आणि देवाडा या दोन ठिकाणी प्राथमिक प्रतिसाद दल तैनात केले जाणार असून ग्रामस्थांचीही मदत घेतली जात आहे. आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे नियोजन ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रशासनाने केले आहे. बाईट १) प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प व्ही. ओ. २) वाघ- मानव, बिबट- मानव, अस्वल- मानव, रानडुक्कर- मानव असे सर्वच संघर्ष चंद्रपूर जिल्ह्यात प्रकर्षाने पुढे येतात. राखीव जंगलातून जाणारा रस्ता असो वा प्रादेशिक जंगलातला रस्ता आपल्या पुढ्यात वन्यजीव आल्यास काय करावे व काय करू नये याबद्दल तज्ज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत. काय करावे......... 1) वन्यजीवापासून वाहन सुरक्षित अंतरावर असावे 2) वन्यजीवाने रस्ता पार केल्यावर वाहन सावकाश पुढे न्यावे 3) राखीव आणि प्रकल्प क्षेत्रात वाहन वेग मर्यादेत असावा 4) वाहनाखाली उतरू नये 5) हॉर्नचा वापर करू नये, गोंगाट करू नये 6) पुढच्या वन नाक्यावर वन्यजीवाची माहिती द्यावी काय करू नये.......... 1) वन्यजीवांचा मार्ग अडवू नये 2) वाघ अथवा वन्यजीवाने शिकार केलेल्या ठिकाणी थांबू नये 3) वाहन वेग सुसाट असू नये 4) वन्यजीव आकृष्ट होईल असे कृत्य करू नये 5) सेल्फी, शूटिंग, रील चा मोह टाळावा बाईट १) प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प व्ही. ओ. ३) चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 400 वाघ आहेत. प्रादेशिक ,राखीव, वनविकास महामंडळ, बफर आणि कोअर अशी या जंगलांची वर्गवारी आहे. कोअर वगळता या सर्वच जंगलात मनुष्यवस्ती आहे. अशा स्थितीत वन्यजीवाप्रती असलेले नागरिकांचे वर्तन कसे असावे याची पुन्हा एकदा उजळणी करण्याची गरज या viral व्हिडिओमुळे पुढे आली आहे आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
976
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 17, 2026 10:52:46
1039
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 17, 2026 10:52:29
1012
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 17, 2026 10:51:02
Yavatmal, Maharashtra:यवतमाळमध्ये अवैध गो तस्करी रेती व अमली पदार्थ वाहतुकीला सूट देऊन आरटीओ अधिकारी कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहने अडवित असल्याचा आरोप करीत प्रहार जनशक्ती पक्षाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रहार चे जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चा मोठ्या संख्येने शेतकरी कुटुंबीय सहभागी झाले. शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना बाजारसमिती व इतर ठिकाणी अडवून त्यांच्यावर दहा हजार रुपयांवर दंडात्मक कारवाई केल्या जात आहे. आधीच शेतमालाला योग्य भाव नाही त्यात शेतमालाच्या वाहनांवर कारवाया होत असल्याने शेतकरी लुटल्या जात आहे. असा आरोप बिपिन चौधरी यांनी केला. यावेळी दिव्यांग बांधवांना लाइसेंस देण्यात यावे, पिंपळखूटि चेक पोस्ट वरून गोमांस, गांजा, दारू, एमडी ड्रग्स करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करावी, कार्यालयातील व चेकपोस्ट वरील भ्रष्टाचारी अधिकारी व त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.
1001
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 17, 2026 10:50:28
Nashik, Maharashtra:युद्धामुळे ड्रायफ्रूट चे देखील भाव 25 ते 30 टक्के वाढले अँकर आखाती देशात युद्ध सुरू असल्याने आता किराणामाला नंतर ड्राय फूड मध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळतीय.... ड्राय फ्रुट्स मामरा बदाम तब्बल 200 ते 400 रुपये किलो पाठीमागे वाढलाय...आखादी देशातून अंजीर बदाम पिस्ता अशा अनेक गोष्टी भारतात आयात केले जातात आणि युद्धामुळे याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सध्या या सगळ्यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे... 25 ते 30 टक्के एवढी वाढ ड्रायफ्रूट्स मध्ये झाली आहे... ईद महिन्यात सगळ्यात जास्त मागणी हे ड्रायफ्रूटला असते मात्र आता ईद सणाला देखील महागाईचा सामना करावा लागत आहे.... या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी..
1066
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 17, 2026 10:40:11
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ के लासिना वाघापूर में आतिश देशमुख नामक युवक की हत्या कर दी गई। उसकी आँखों में तीखा डाला गया और शरीर पर चाकू के 15 वार किए गए. मूल रूप से आर्णी तालुके से आने वाला आतिश वयस्क दुरुस्ती का काम करता था और परिवार के साथ पिंपळगाव में रहता था. घटना के समय वह भोजन कर रहा था जब उसे मोबाइल कॉल आया और वह खाना छोड़कर बाहर गया. अगले दिन उसका शव मिला. स्थानीय क्राइम ब्रांच ने कॉल रिकॉर्डिंग की जाँच के बाद अंकुश और रुपाली खोडे को गिरफ्तार किया. मृतक आतिश की पूर्व प्रेमिका रुपाली से विवाह से पहले संबंध थे, जो विवाह के बाद भी जारी रहे; अब विवाह के बाद भी वह दबाव बना रहा था. हत्या का साजिशी विचार उसकी धमकियों से जुड़ा था और बेटे-बेटियों पर प्रभाव की आशंका थी, इसलिए रुपाली और उसका पति अंकुश ने आतिश को मार डाला और पुलिस को बयान दिया है. पूर्व प्रेम संबंध से जुड़ी यह कहानी प्रेम विवाह के बंधन के बावजूद विश्वासघात और परिवारों को विस्तृत नुकसान पहुंचाने के बारे में है.
1078
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 17, 2026 10:23:25
Pandharpur, Maharashtra:सांगोला विद्यामंदिर येथील दहावीच्या भूगोल विषयाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरीला गेल्या प्रकरणी बंदोबस्त साठी असलेले पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड दोषी असतील तर कारवाई होईल, सोलापूर ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर यांची माहिती सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट , स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने स्ट्राँग रूम मध्ये तपासणी केली आहे. या द्वारे काही माहिती मिळते का याचा तपास सुरू आहे. या स्ट्राँग रूम जवळ सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत .तसेच शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्य अडचणीत आणण्याचे काम झाले आहे
1060
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 17, 2026 10:06:06
Jalna, Maharashtra:जालना में बसस्थानकात चोरी करणारे चार सराईत आरोपी जेरबंद. जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अँकर- जालना बसस्थानकात चोरी करणा-या चार सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलंय.. शहरातील रमाईनगर येथे आरोपी निवृत्ती सुभाष शेलार याने साथिदारांच्या मदतीने बदनापूर येथून एक बॅग चोरी करून आणल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुशंगाने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने बॅग चोरीची कबुली दिली व त्याने त्याचे साथिदार विकास अशोक गायकवाड, रवी गायकवाड आणि अशोक लंगोटे यांच्याकडे दिली असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता मागच्या 12 महिन्यांपासून ते बसस्थानकात चोरी करत असल्याचं कबुली जबाबात सांगितलंय.. दरम्यान चारही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं असून त्यांच्याकडून 92 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
1078
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 17, 2026 10:03:05
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे दहावीच्या प्रश्न पत्रिकाच चोरीला, उद्या होणाऱ्या भूगोल विषयाच्या पेपर वर प्रश्नचिन्ह सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर या ठिकाणी दहावीच्या प्रश्नपत्रिका ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम केली आहे. येथूनच तालुक्यातील परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका वितरित केल्या जातात. काल रात्री सदर स्ट्राँग रूमचे कुलूप तोडून 50 भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिका चोरी केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे स्ट्राँग रूम असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बंद असल्याचं समोर आले आहे. तसेच या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था सुद्धा ढिसाळ असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील अपर पोलीस अधीक्षक, पोलिस उप अधीक्षक , गट शिक्षणाधिकारी , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक यांनी तपासणी केली आहे. उद्या होणारा भूगोल विषयाचा पेपर आता होणार का नाही याबाबत दहावीच्या विद्यार्थ्या मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य भरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य यावर अवलंबून आहे. याबाबत माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकारी पाहणी करून निर्णय घेण्याची शक्यता आहे.
1008
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 17, 2026 10:00:21
Amravati, Maharashtra:नळ नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी काँग्रेस आक्रमक; यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात पुलावर चक्काजाम आंदोलन, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पुलाच्या टोकावर चढले. अँकर: नळ नदीवर गेल्या आठ वर्षापासून पुलाचं बांधकाम रखडल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत असून आतापर्यंत अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे आज काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात आला आहे. दरम्यान शासनाकडून 17 तारखेपर्यंत पुलाचा काम सुरू करण्याचा आश्वासन दिला आहे मात्र 17 तारखेपर्यंत काम सुरू न झाल्यास 18 तारखेला परत याच ठिकाणी आंदोलन करू असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.
1002
comment0
Report
Advertisement
Back to top