Back
ताडोबा- अंधारी के मुख्य प्रवेश मार्ग पर बाघ के वीडियो के बाद वन विभाग ने कड़े कदम उठाए; सात लोग पहचान में आए
AAASHISH AMBADE
Mar 17, 2026 11:04:47
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य मोहर्ली मार्गावर वाघाचा वाहनाखाली उतरून पाठलाग केल्याप्रकरणी व्हायरल व्हिडिओवर वनविभागाच्या विविध उपाय योजना, वाघाचा मार्ग अडवल्या प्रकरणी सात जणांची ओळख पटली,आरोपी फरार, वन गुन्हा दाखल, आता सकाळ ते रात्र पर्यंत मोहर्ली मार्गावर सुसज्ज तपासणी वाहन राहणार तैनात, हुल्लडबाजांना आळा घालण्यासाठी वनविभाग घेणार सीसीटीव्हीची ही मदत
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य मोहर्ली मार्गावर वाहनाखाली उतरून वाघाचे अत्यंत जवळून व्हिडिओ घेत हुल्लड करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने कडक पावले उचलली आहेत. या व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवली जात असून यातील सात जणांची ओळख आतापर्यंत पटली आहे. सध्या या प्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्ही. ओ. १) हा बघा विडिओ....
हा व्हिडिओ आहे जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या पद्मापूर- मोहर्ली मार्गावरचा. दुर्दैवाने पर्यटक असलेले हे लोक वाघाला मांजर समजून एक-दोन हात अंतरावरून , वाहनाखाली उतरून व्हिडिओ काढत आहेत. नाचत आहेत, खिदळत आहेत. देशातील मानव वन्य जीव संघर्षात च्या आकड्यात चंद्रपूरचा क्रमांक पहिल्या 10 मध्ये आहे रोज वाघाच्या अथवापण्य जीवाच्या हल्ल्यात कोणी मृत अथवा जखमी झाल्याच्या घटना होत असतात मात्र त्यावरून या पर्यटकांनी कुठलाही बोध घेतला झालेला दिसत नाही खुशाल व्हिडिओ काढत वाघाचा मार्ग अडवून असुरी आनंद व्यक्त केला जातोय सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभाग खडबडून जागा झाला आहे यातील वाहने व व्यक्ती यांची ओळख पटवली जात आहे आतापर्यंत सात जणांची ओळख पटली असून
अन्य वाहने ओळखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाची मदत घेतली जात आहे. या मार्गावरील पहिला नाका असलेल्या पद्मापूर द्वारावर सीसीटीव्हीची ही तपासणी केली जात असून फरार असलेल्या आरोपींच्या घरी वनपथक पोहोचले आहे. सध्या काही भागात ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गस्ती वाहनांची अनियमित ये-जा असते मात्र आता या प्रमुख मोहर्ली मार्गावर सकाळ ते रात्र पर्यंत एक सुसज्ज गस्ती वाहन तैनात राहणार असून हुल्लडबाजांना आळा घालण्यासाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. वन्यजीव हालचाल माहित होण्यासाठी आगरझरी आणि देवाडा या दोन ठिकाणी प्राथमिक प्रतिसाद दल तैनात केले जाणार असून ग्रामस्थांचीही मदत घेतली जात आहे. आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे नियोजन ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रशासनाने केले आहे.
बाईट १) प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प
व्ही. ओ. २) वाघ- मानव, बिबट- मानव, अस्वल- मानव, रानडुक्कर- मानव असे सर्वच संघर्ष चंद्रपूर जिल्ह्यात प्रकर्षाने पुढे येतात. राखीव जंगलातून जाणारा रस्ता असो वा प्रादेशिक जंगलातला रस्ता आपल्या पुढ्यात वन्यजीव आल्यास काय करावे व काय करू नये याबद्दल तज्ज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत.
काय करावे.........
1) वन्यजीवापासून वाहन सुरक्षित अंतरावर असावे
2) वन्यजीवाने रस्ता पार केल्यावर वाहन सावकाश पुढे न्यावे
3) राखीव आणि प्रकल्प क्षेत्रात वाहन वेग मर्यादेत असावा
4) वाहनाखाली उतरू नये
5) हॉर्नचा वापर करू नये, गोंगाट करू नये
6) पुढच्या वन नाक्यावर वन्यजीवाची माहिती द्यावी
काय करू नये..........
1) वन्यजीवांचा मार्ग अडवू नये
2) वाघ अथवा वन्यजीवाने शिकार केलेल्या ठिकाणी थांबू नये
3) वाहन वेग सुसाट असू नये
4) वन्यजीव आकृष्ट होईल असे कृत्य करू नये
5) सेल्फी, शूटिंग, रील चा मोह टाळावा
बाईट १) प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प
व्ही. ओ. ३) चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 400 वाघ आहेत. प्रादेशिक ,राखीव, वनविकास महामंडळ, बफर आणि कोअर अशी या जंगलांची वर्गवारी आहे. कोअर वगळता या सर्वच जंगलात मनुष्यवस्ती आहे. अशा स्थितीत वन्यजीवाप्रती असलेले नागरिकांचे वर्तन कसे असावे याची पुन्हा एकदा उजळणी करण्याची गरज या viral व्हिडिओमुळे पुढे आली आहे
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 12:17:410
Report
ABATISH BHOIR
FollowMar 17, 2026 12:16:480
Report
JMJAVED MULANI
FollowMar 17, 2026 12:02:59428
Report
SKShubham Koli
FollowMar 17, 2026 11:31:25978
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 17, 2026 11:06:36Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिका बजट में कर वृद्धि नहीं, सोलर प्रकल्प व 50 बसों की खरीद
1063
Report
SNSWATI NAIK
FollowMar 17, 2026 10:52:461092
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 10:52:291012
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 10:51:021001
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 10:50:281066
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 10:40:111078
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 17, 2026 10:23:37992
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 10:23:251060
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 10:19:481095
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 17, 2026 10:06:061078
Report