Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

सचिन तेंडुलकर ने ताडोबा जंगल सफारी में जूनाबाई शेरनी और उसके बच्चों से भेंट की

AAASHISH AMBADE
Mar 28, 2026 09:37:46
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आठव्यांदा ताडोबात, मदनापूर गेट सफारी करताना प्रसिद्ध वाघीण जुनाबाईचे पिल्लांसह झाले दर्शन मदनापुर गेट सफारी करताना प्रसिद्ध वाघीण जुनाबाई आणि तिच्या पिल्लांचे दर्शन झाले. आधीपासूनच जुनाबाईच्या प्रेमात पडलेल्या सचिनसाठी हा क्षण आनंददायी ठरला. सचिनने याच खेपेस दोन अन्य गेटवरूनही सफारी केली मात्र त्यात व्याघ्रदर्शन झाले नाही. मात्र मदनापूर सफारी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. त्याने इथले गाईड आणि जिप्सी चालक यांच्यासह फोटो देखील काढून घेतला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Mar 28, 2026 10:46:05
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर में पुलिस कॉन्स्टेबल के डराने-धमकाने के बाद उसकी ही बेटी ने अपने पिता को विष देकर हत्या की, यह चौंकाने वाला मामला तीन साल बाद सामने आया है. मयत पुलिस कर्मी की आरोपी बेटी भी चंद्रपूर पुलिस विभाग में कांस्टेबल है और ससुर को नौकरी से बर्खास्त किया गया है. मयत पिता के प्रेमप्रकरण के विरोध के कारण बेटी ने विष देकर पिता की हत्या की. 25 अप्रैल 2023 को जयंत बल्लावार (45) ड्यूटी पर थे, जिल्हाधिकारी कार्यालय के प्रशासकीय भवन में चक्कर आने से मृत्यु हो गई. उस समय पुलिस ने केवल मर्ग बनवाया. तीन दिन पहले मृतक के दामाद आशिष शेडमाके ने पुलिस को अपने सभी अपराध कबूल कर बताए कि उसकी पत्नी आर्या बल्लावार ने पिता को विष दिया. आर्या ने मिल्कशेक में विष मिलाकर पिलाया. जावय को ड्यूटी पर प्रशासकीय भवन में जाते समय मृत्यु हो गई. 2022 से प्रेम संबंध में थे आर्या और आशिष; जयंत बल्लावार ने विरोध किया. आर्या ने अपने मामा चैतन्य गेडाम से विष खरीदा. 5000 रुपये में विष लिया गया. शादी के बाद दोनों के रिश्ते में कलह. आशिष को ट्रेनिंग के दौरान बडतर्फ किया गया. ट्रेनिंग के बाद आर्या सास के घर नहीं गई. नाराज आशिष ने सब कुछ उघाड़ दिया. रामनगर पुलिस ने आरोपी महिला पुलिस अधिकारी आर्या बल्लावार के अलावा नवरा आशिष शेडमाके, चैतन्य गेडाम और विष खरीदने वाले एक नाबालिग आरोपी को गिरफ्तार किया है. अदालत ने सभी को पुलिस कस्टडी दी है. इस प्रकरण ने पुलिस तंत्र को भी चौंका दिया है.
843
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 28, 2026 10:38:33
891
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 28, 2026 10:18:48
Nanded, Maharashtra:नांदेड जिल्ह्यात आजपासून 11 एप्रिल पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आली. 28 मार्चच्या सकाळी 6 वाजेपासून ते 11 एप्रिल 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी नियमित आदेशाप्रमाणे हे आदेश लागू केले आहेत. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीशेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
1025
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 28, 2026 10:10:24
1035
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 28, 2026 10:09:58
Kolhapur, Maharashtra:2017 च्या जनगणनेनंतर कोल्हापूर शहराची हद्दवाढ अटळ असल्याचा दावा कोल्हापूर शहराचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. जनगणनेनंतर मतदारसंघ आणि प्रभाग रचना बदलणे अनिवार्य असल्याने या तांत्रिक कारणामुळेच कोल्हापूर शहराची हद्दवाढ सध्या लांबणीवर पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच दहा गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्यास सर्वांची सहमती असल्याचा दावा देखील आमदार क्षीरसागर यांनी केला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेकडून हद्दवाढीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. कोल्हापूर शहरातील सर्किट हाऊस येथे हद्दवाढ, टेक्स्टाईल टुरिझम हब, कोल्हापूर-सांगली पूर नियंत्रण प्रकल्प, तसेच आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहर हद्दवाडी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
1019
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 28, 2026 09:48:26
Akola, Maharashtra:महाराष्ट्रात सध्या गावयात्रांच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर गावात सिदाजी महाराजांची यात्रा आज पार पडली. या एकदिवसीय यात्रेला तब्बल 138 वर्षांची परंपरा आहे. दहीहंडीची वैभवशाली परंपरा असणारा हा उत्सव पातुरकरांसाठी जणू दिवाळीसारखाच. नेमकं कशी हैय पातूरच्या सिदाजी महाराजांची यात्रा?, काय आहेय या यात्रेच्या परंपरा?, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी चला फेरफटका मारूयात पातूरच्या या जत्रेत. सायंकाळी सिदाजी महाजारांची पालखी गावातून काढण्यात येते पालखी उचलण्याचा मान भोई समाजाला दिला गेला आहे.यानंतर संपूर्ण गावा करिता भांडाऱ्याच आयोजन करण्यात येते यासाठी मोठी तयारी केली जाते.या करिता पहाटे पासून याची जय्यत तयारी सुरू केली जाते.ही यात्रा म्हणजे पातूरकरांनसाठी जणू दिवाळी..
918
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 28, 2026 09:37:20
Beed, Maharashtra:बीड : परळी बसस्थानकात धक्कादायक घटना; अनोळखी महिलांकडे मुलगी देऊन आई पसार परळी बसस्थानक परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीला बसस्थानकात अनोळखी महिलांच्या ताब्यात देऊन माता फरार झाल्याची घटना घडली आहे. “मी बाथरूमला जाऊन येते, तोपर्यंत मुलीला सांभाळा,” असे सांगून त्या महिलेने दोन प्रवासी महिलांकडे मुलीला सोपवले आणि तिथून काढता पाय घेतला. मात्र बराच वेळ उलटूनही ती महिला परतली नाही. बसस्थानक परिसरात शोध घेऊनही तिचा कोणताही पत्ता लागला नाही. अखेर या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या मातेचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे... दरम्यान बसस्थानक बांधकामाचे काम सुरू असल्याने सीसीटीव्ही नाहीयेत, त्यामुळे या मातेचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे.
1038
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 28, 2026 09:20:18
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरातील शाहू मिल सुरू होण्यासाठी आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या कार्यालयात लोकप्रतिनिधींसह आंदोलकांची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती, कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे आणि हातकणंगलेचे आमदार अशोक माने उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीत शाहू मिल शासनाने चालवावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येत सरकार दरबारी पाठपुरावा करून शाहू मिल पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी शाहू मिलच्या जागेवर शाहू महाराजांचे स्मारक उभारण्याबरोबरच मिल पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरendanceा करू असे स्पष्ट केले.
1100
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 28, 2026 09:04:02
Malegaon, Maharashtra:वणी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी मालेगावात पोलिसांचा मोठा फौज फाटा... उद्या खानदेशातून मालेगावात येणाऱ्या देवीच्या मानाच्या रथाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त... शहरात 280 होमगार्ड, एक एस आर पी प्लाटून, 378 पोलीस अंमलदार, 42 पोलीस अधीकारी त्या सोबत RTO टीम, महामार्ग वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस असा फौज फाटा तैनात शहरातील मुख्य ठिकाणी CCTV कॅमेऱ्यांची नजर... ANC: आद्य शक्ती पीठ नाशिकच्या वनी सप्तशृंगी गडावर लाखो भाविक पायी जात नतमस्तक होत असतात. खानदेशातून मोठ्या संख्येने भाविक मालेगाव मार्गे वणी गडावर पायी जात असतात. मालेगाव शहर संवेदनशील असल्याकारणाने पोलिसांना विशेष मोठी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने उद्या मानाच्या रथांचे आगमन खानदेशातून होत मालेगाव मार्गे गडावर जात आहे. त्यासाठी शहरात 280 होमगार्ड, एक एस आर पी प्लाटून, 378 पोलीस अंमलदार, 42 पोलीस अधीकारी त्या सोबत RTO टीम, महामार्ग वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस असा फौज फाटा तैनात केला असून शहराच्या मुख्य चौक, रस्ते याठिकाणी 20 CCTV कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.
1051
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 28, 2026 09:03:46
1015
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 28, 2026 08:21:57
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शताब्दी वर्षाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ... अँकर - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा शताब्दी वर्ष पार पडत आहेत.शताब्दी वर्ष महोत्सव निमित्ताने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून विविध कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात आले आहे.शताब्दी वर्षाच्या शुभारंभ निमित्ताने बोध चिन्हाचे उद्घाटन करत केक कापत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 100 सोसायटींच्या संचालकांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. तसेच शताब्दी वर्षाचा प्रारंभ म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने सांगली शहरातून बाईक रॅली काढून करण्यात आला. ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह आजी-माजी आमदार ,माजी मंत्री व बँकेचे संचालक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. साऊंड बाईट - मानसिंगराव नाईक - ,अध्यक्ष ,जिल्हा मध्यवर्ती बँक,सांगली.
1089
comment0
Report
Advertisement
Back to top