Back
चंद्रपूर भाजप में फिर विवाद, महापौर उम्मीदवार को लेकर उभरा नया झगड़ा
AAASHISH AMBADE
Feb 06, 2026 07:38:10
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर भाजपात पुन्हा एक वादाची ठिणगी, चंद्रपूर शहर मनपा निवडणूक महापौर उमेदवार म्हणून पक्षाने ठरविल्या व्यतिरिक्त आणखी एका नगरसेविकेचा अर्ज दाखल करण्यावरून 'वॉर' प्रसंग
चंद्रपूर मनपा निवडणुकीत भाजप कडून काल ऐन वेळेवर सारिका संदुरकर या नगरसेविकेने महापौर पदासाठी वेगळा अर्ज दाखल केल्याच्या मुद्द्यावरून आ. किशोर जोरगेवार आणि आ. सुधीर मुनगंटीवार गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. महापौर पदाच्या पक्षाकडून, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यातर्फे देण्यात आलेल्या अधिकृत उमेदवार संगीता खांडेकर मुनगंटीवार गटाच्या आहेत तर काल ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सारिका संदूरकर या जोरगेवार गटाच्या नगरसेविका आहेत. सारिका संदूरकर यांचा अर्ज सावधानता म्हणून भरला जाण्याची माहिती स्थानिक स्तरावर कुणालाही देण्यात आली नाही. भडकलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र आज बोलताना माझ्यासाठी ही आश्चर्यकारक बाब आहे, मुख्यमंत्र्यांकडे जी बैठक झाली त्यात प्रदेशाध्यक्षांनी संगीता खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितलं होते असे सांगितले. आता जे काही झाले आहे, याची नोंद पक्ष घेईल आणि योग्य क्षणी कारवाई होईल असे सांगत भाजपमध्ये काँग्रेस प्रमाणे वागणं नंतर महागात पडते हे अनेकांनी अनुभवलं आहे असा टोला लगावला. पक्षाच्या अध्यक्षाचा अवमान करणं हे पक्षाच्या अनुशासनात बसत नाही, आधी एबी फॉर्म घोळ आणि आता अर्ज भरणे याची नक्कीच पक्षाच्या बैठकीत गंभीर नोंद होईल अशी प्रतिक्रिया मुनगंटीवारांनी दिली. यावर प्रतिक्रिया देताना किशोर जोरगेवार यांनी
आमच्या खांडेकर यांच्या फॉर्ममध्ये एखादी त्रुटी निघू शकते आणि अडचण येऊ शकते, असं आमच्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा मी निवडणूक प्रमुख म्हणून इतर नेत्यांशी चर्चा करून हा फॉर्म वेळेवर भरल्याचे सांगितले. प्रिकॉशन म्हणून आम्ही हा फॉर्म भरला आणि तेव्हाच आम्ही उमेदवाराकडून विड्रॉल वर सही देखील घेतल्याचे सांगितले. जो पक्षाचा आदेश येईल तोच पाळला जाईल, यामध्ये शंका घेण्यासारखं काही नाही, माझ्या सूचनेनुसार हा अर्ज दाखल करण्यात आला आहे अशी।माहिती दिली.
बाईट 1) आ. सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
बाईट 2) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowFeb 06, 2026 09:33:390
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 06, 2026 09:33:070
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 06, 2026 09:31:490
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 09:19:03Nagpur, Maharashtra:नागपूर
नागपूर महापालिका महापौर और चंद्रपूर महापौर 9 am live
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 06, 2026 08:55:420
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 06, 2026 08:19:210
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 06, 2026 07:53:160
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 06, 2026 07:34:320
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 07:33:340
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 06, 2026 07:33:220
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 06, 2026 07:19:200
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 06:50:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 06:48:450
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 06, 2026 06:47:350
Report