Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

अमरावती महापालिका चुनाव: रवि राणा के युवा स्वाभिमान ने अंबादेवी मंदिर महाआरती कराई

ADANIRUDHA DAWALE
Feb 06, 2026 07:33:22
Amravati, Maharashtra
अमरावती महापालिका चुनाव: रवि राणा के युवा स्वाभिमान ने अंबादेवी मंदिर महाआरती कराई अमरावती महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होणार आहे त्यापूर्वी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडून अमरावतीच आराध्य दैवत असलेल्या अंबा देवी मंदिरात महाआरतीचा आयोजन करण्यात आले आहे. महाआरतीला युवा स्वाभिमान पक्षाच्या सर्व नगरसेवकांची उपस्थिती असून आमदार रवी राणा यांच्या युवा सन्मान पक्षाचा प्रथमच उपमहापौर होत असताना अंबा देवीचे आशीर्वाद घेऊन युवा स्वाभिमानचे नगरसेवक महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाचं कामकाज सुरू करणार आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून मी मुख्यमंत्री यांना भाजपचा महापौर बनवणार असल्याचा शब्द दिल्याचा सांगितला आहे आणि तो शब्द मी आता खरा करत असल्याची प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली. बाईट :- रवी राणा, आमदार, युवा स्वाभिमान पक्ष
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Feb 06, 2026 09:33:39
Shirdi, Maharashtra:जागतिक किर्तीच्या साईनगरी शिर्डीत बालकांच्या शोषणाविरोधात पोलीस प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. मंदिर परिसरात लहान मुलांकडून भिक्षा मागवणे तसेच वस्तू विक्रीस भाग पाडणाऱ्या पालकांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत...शिर्डी पोलिसांनी राबवलेल्या या विशेष मोहिमेत 10 मुले आणि 4 मुली अशा एकूण 14 बालकांची सुटका करण्यात आली...या बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार श्रीरामपूर, संगमनेर आणि राहुरी येथील बाल निरीक्षण गृहात पाठवण्यात आले आहे.बाल न्याय अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्या पालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी दिलाय...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 06, 2026 09:33:07
Kalyan, Maharashtra:कल्याण–डोंबिवलीकरांसाठी आरोग्य क्षेत्रात दिलासादायक मोठी बातमी केडीएमसी ची बाई रुक्मिणीबाई, गौरीपाडा व शक्तिधाम रुग्णालये अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील कल्याणमधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, गौरीपाडा येथील रुग्णालय आणि पूर्वेकडील कोळसेवाडी येथील शक्तिधाम रुग्णालय ही तीन रुग्णालये अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी सात वर्षांच्या कालावधीसाठी संलग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात पालिका आयुक्त आणि महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्यात अधिकृत सामंजस्य करार अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्ण होणार आहे.या संलग्नतेमुळे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, इंटर्न, निवासी डॉक्टर तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचे मनुष्यबळ पालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार असून, रुग्णांना तत्पर आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळणे शक्य होणार आहे. लोकप्रतिनिधींची राजवट सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा महत्त्वाचा निर्णय घेऊन, आरोग्यासारखा संवेदनशील विषय राजकीय ओढाताणीमध्ये अडकू नये, याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.राज्य शासनाने जुलै २०२३ मध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे संलग्न रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली आहे. या महाविद्यालयाच्या मंजुरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र सध्या वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत व संलग्न रुग्णालयाचे काम पूर्ण झालेले नसल्याने, विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी KDMC ची रुग्णालये वापरण्याचा निर्णय घेण्यात आले आहे.रुक्मिणीबाई रुग्णालयात प्राधान्याने अति दक्षता विभाग (ICU) सुरू करण्याचे प्रयत्न अंबरनाथ वैद्यकीय महाविद्यालयामार्फत करण्यात येणार आहेत. महाविद्यालयाच्या आस्थापनेवर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर गौरीपाडा येथील रुग्णालय ताब्यात घेण्यात येईल, तर शक्तिधाम रुग्णालयाचे आरक्षण बदल पूर्ण झाल्यानंतर ते महाविद्यालयाकडे हस्तांतरित केले जाणार आहे.या संलग्नतेसंबंधीचा प्रशासकीय ठराव आयुक्त अभिनव गोयल आणि पालिका सचिव किशोर शेळके यांच्या स्वाक्षरीने मंजूर करण्यात येणार असून आला आहे. ही संलग्नता सात वर्षांसाठी असली तरी महाविद्यालयाची स्वतःची रुग्णालय इमारत लवकर उभी राहिल्यास या कराराचा कालावधी कमी केला जाऊ शकेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.पालिका आयुक्त आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यात झालेला हा सामंजस्य करार भविष्यात KDMC च्या आरोग्य व्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरणार असून, अत्यावश्यक वैद्यकीय सुविधाअधिक बळकट होतील, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 06, 2026 09:31:49
Jalna, Maharashtra:जालना : जालन्यात भाजपचे महापौर, उपमहापौर ठरले कैलास गोरंटयाल समर्थक वंदना मगरे जालना महानगरपालिकेच्या पहिल्या mahापौर उपमहापौरपदी राजेश राऊत,औपचारिक घोषणा बाकी अँकर : जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदी वंदना मगरे यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे तर उपमहापौर पदी राजेश राऊत यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.वंदना मगरे या माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही मुदत 15 महिन्यांसाठी असणार आहे.जालना महानगरपालिकेच्या महापौरपदी वंदना मगरे यांची तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांचे नाव निश्चित करण्याची शिफारस माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यासह भाजपा महानगराध्यक्ष भास्कर दानवेंनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्यानुसार 15 महिन्यांसाठी महापौरपदी वंदना मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांचे नाव निश्चित करण्यात आल्यानंतर आज महापौर पदासाठी वंदना मगरे आणि उपमहापौर पदासाठी राजेश राऊत या दोघांचेही अर्ज दाखल करण्यात आले.त्यांच्या विरोधात एकहीं अर्ज महापौर आणि उपमहापौर पदासाठी दाखल न झाल्यानं या दोघांच्याही निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे.दरम्यान जालना महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 9 फेब्रुवारी रोजी निवडणूक पार पडणार आहे.त्यामुळे 9 फेब्रुवारी रोजी या निवडीबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.महानगरपालिका निवडणुकीत 65 पैकी 41 जागा जिंकून जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली आहे.दरम्यान या निवडीवर माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यासह भाजप महानगराध्यक्ष भास्कर दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Feb 06, 2026 08:19:21
Pune, Maharashtra:Headline : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकिसाठी मतदान साहित्याचे कर्मचाऱ्यांना वाटप जिल्हा परिषद आणि मावळ पंचायत समिती साठी उद्या प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी आज मावळ तहसीलदार कार्यालय परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात आले. मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 5 जागा व पंचायत समितीच्या 10 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी 243 मतदान केंद्रावर हे मतदान पार पडणार आहे. मावळ तालुक्यात कोणतेही संवेदनशील मतदान केंद्र नसून पिंक मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र व मुस्लिम महिलांसाठी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी एकूण 1 हजार 500 अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याच ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी..
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 06, 2026 07:38:10
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर भाजपात पुन्हा एक वादाची ठिणगी, चंद्रपूर शहर मनपा निवडणूक महापौर उमेदवार म्हणून पक्षाने ठरविल्या व्यतिरिक्त आणखी एका नगरसेविकेचा अर्ज दाखल करण्यावरून 'वॉर' प्रसंग चंद्रपूर मनपा निवडणुकीत भाजप कडून काल ऐन वेळेवर सारिका संदुरकर या नगरसेविकेने महापौर पदासाठी वेगळा अर्ज दाखल केल्याच्या मुद्द्यावरून आ. किशोर जोरगेवार आणि आ. सुधीर मुनगंटीवार गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. महापौर पदाच्या पक्षाकडून, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यातर्फे देण्यात आलेल्या अधिकृत उमेदवार संगीता खांडेकर मुनगंटीवार गटाच्या आहेत तर काल ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सारिका संदूरकर या जोरगेवार गटाच्या नगरसेविका आहेत. सारिका संदूरकर यांचा अर्ज सावधानता म्हणून भरला जाण्याची माहिती स्थानिक स्तरावर कुणालाही देण्यात आली नाही. भडकलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र आज बोलताना माझ्यासाठी ही आश्चर्यकारक बाब आहे, मुख्यमंत्र्यांकडे जी बैठक झाली त्यात प्रदेशाध्यक्षांनी संगीता खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितलं होते असे सांगितले. आता जे काही झाले आहे, याची नोंद पक्ष घेईल आणि योग्य क्षणी कारवाई होईल असे सांगत भाजपमध्ये काँग्रेस प्रमाणे वागणं नंतर महागात पडते हे अनेकांनी अनुभवलं आहे असा टोला लगावला. पक्षाच्या अध्यक्षाचा अवमान करणं हे पक्षाच्या अनुशासनात बसत नाही, आधी एबी फॉर्म घोळ आणि आता अर्ज भरणे याची नक्कीच पक्षाच्या बैठकीत गंभीर नोंद होईल अशी प्रतिक्रिया मुनगंटीवारांनी दिली. यावर प्रतिक्रिया देताना किशोर जोरगेवार यांनी आमच्या खांडेकर यांच्या फॉर्ममध्ये एखादी त्रुटी निघू शकते आणि अडचण येऊ शकते, असं आमच्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा मी निवडणूक प्रमुख म्हणून इतर नेत्यांशी चर्चा करून हा फॉर्म वेळेवर भरल्याचे सांगितले. प्रिकॉशन म्हणून आम्ही हा फॉर्म भरला आणि तेव्हाच आम्ही उमेदवाराकडून विड्रॉल वर सही देखील घेतल्याचे सांगितले.  जो पक्षाचा आदेश येईल तोच पाळला जाईल, यामध्ये शंका घेण्यासारखं काही नाही, माझ्या सूचनेनुसार हा अर्ज दाखल करण्यात आला आहे अशी।माहिती दिली. बाईट 1) आ. सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते बाईट 2) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 06, 2026 07:34:32
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, 18 लाख 18 हजार 742 मतदार邦 मतदानाचा हक्क बजावणार. अँकर - सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदाना प्रक्रिया पार पडणार आहे,यासाठी प्रशासन आता सज्ज झाले आहे.61 जिल्हा परिषद गट आणि 122 पंचायत समिती गणासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 18,18,742 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या मतदान प्रक्रियेसाठी 2 हजार 39 मतदान केंद्रे आणि 9 हजार कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.मतदान प्रक्रियेसाठी ईव्हीएम मशीन तालुक्याच्याठिकाणी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत.उद्या मतदान तर 9 फेब्रुवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली . बाईट - उत्तम दिघे - निवडणूक निर्णय अधिकारी - मिरज.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 06, 2026 07:33:34
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगढ़ जिले की परिषद और १५ पंचायत समितियों के सार्वत्रिक चुनाव के लिए कल मतदान हो रहा है। रायगढ़ जिले प्रशासन की तैयारी अंतिम चरण में है। मतदान सामग्री लेकर अधिकारी, कर्मचारी निर्धारित मतदान केंद्र पर आज रवाना हो गए। जिले के २३२३ मतदान केंद्रों पर मतदान होगा और इसके लिए लगभग १२ हजार अधिकारी और कर्मचारी नियुक्त किए गए हैं। उनके साथ पर्याप्त पुलिसकर्मियों की तैनाती की गई है। जिला परिषद की ५९ और पंचायत समितियों की ११८ सीटों के लिए मतदान होगा और कुल मतदाता १७ लाख ३८१ हैं, जिनमें महिला मतदाताओं की संख्या अधिक है। मतदान के लिए ५५९५ बलेट यूनिट और २५०१ कन्ट्रोल यूनिट इस्तेमाल किए जाएंगे।
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 06, 2026 06:47:35
Nanded, Maharashtra:नांदेड महापालिकेत यंदा पहिल्यांदाच भाजपाचा महापौर बसणार आहे. महापौर पदासाठी कविता मुळे आणि उपमहापौर पदासाठी दिपकसिंह रावत यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. दुपारी उमेदवारी अर्ज भरण्याची औपचारीकता केवळ बाकी आहे. नांदेड महापालिकेत एकूण 81 संख्याबळ आहे. भाजपने एकहाती सत्ता मिळवत 45 जागा मिळवल्या आहेत. शिवसेनेच्या चार सदस्यांनीही भाजपला पाठींबा दिलाय. महापौर कोण होणार याबाबत उत्सुकता लागली होती. आज भाजपच्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापौरासाठी कविता मुळे तर उपमहापौरासाठी दिपकसिंह रावत यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यांचे उमेदवारी अर्ज दुपारी भरले जाणार आहेत. येत्या 10 फेब्रुवारी रोजी निवड प्रक्रिया होणार आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top