Back
नागपुर में चंद्रपुर महापालिका चुनाव की भाजपा बैठक हंगामेदार, तीखी बहस
AAASHISH AMBADE
Dec 26, 2025 12:16:57
Chandrapur, Maharashtra
Feed slug removed. टायटल:--चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीसाठी नागपुरात झालेली पक्षाची बैठक ठरली वादळी, थेट चढ्या आवाजात आरोप-प्रत्यारोप झाल्याची चर्चा, बैठकीत सहभागी महसूलमंत्री बावनकुळे आणि आणि पक्ष निरीक्षक चैनसुख संचेती यांनी मात्र सर्व काही आलबेल असल्याची दिली ग्वाही अँकर:--चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीसाठी नागपुरात झालेली पक्षाची बैठक वादळी ठरली. नेत्यांमध्ये थेट चढ्या आवाजात आरोप-प्रत्यारोप झाल्याची चर्चा आहे. बैठकीत सहभागी महसूलमंत्री बावनकुळे आणि आणि पक्ष निरीक्षक चैनसुख संचेती यांनी मात्र सर्व काही आलबेल असल्याची ग्वाही दिली. चंद्रपुरात स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी मुनगंटीवार आणि आपल्यातील वाद मीडियाने तयार केल्याचाही दावा व्ही. ओ. १) चंद्रपूर मनपाच्या निवडणुकी संदर्भात नागपुरात आयोजित बैठकीकडे मुनगंटीवार आणि जोरगेवार या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष होते. या बैठकीत सर्व नेते एकत्र जमताच चढ्या आवाजात एकमेकांना जाब विचारणे सुरू झाल्याची चर्चा आहे. हे चढे आवाज बैठकीच्या कक्षाबाहेर आल्याने भाजपने तातडीने पावले उचलत अनावश्यक लोकांना इमारतीतून बाहेर केले. गेल्या काही दिवसात आ. मुनगंटीवार आणि आ जोरगेवार यांच्यात सुरू असलेल्या प्रचंड वादाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या गटाला किती जागा मिळाव्यात या संदर्भात प्राथमिक स्वरूपाची चर्चा यात झाल्याचे समजते. मुख्यत्वे मुनगंटीवारांनी एकाच घरी एकाहून अधिक तिकिटे नको, पक्षात नुकतेच आलेल्यांना तातडीने तिकीट देऊ नयेत, नेत्यांच्या निष्क्रिय मुलांना तिकिटे देऊ नयेत अशा प्रकारचे निकष लावावेत यावर भर दिला. यашिवाय दोन स्वतंत्र सर्वेक्षणे करून याबाबत प्रदेश पातळीवर उमेदवारीचे निर्णय घेण्याचे ही निश्चित झाले.दरम्यान बैठक तीन तास चालली. रात्री उशिरा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत खमंग चर्चा झाल्याची माहिती हसतमुखाने दिली. बाईट १) चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री ( live u nagpur--- NGP BAWANKULE BJP) व्ही. ओ. २) बैठकीत सहभागी पक्षाचे निरीक्षक आ. चैनसुख संचेती यांनी चंद्रपूर मनपा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटासोबत एकत्रितपणे निवडणूक लढविण्याची घोषणा केली. जागावाटप आणि नियोजना करण्यासाठी समन्वय समिती घोषित झाल्याचेही सांगितले. बैठकीत तणातणी- वादावादी झाली नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. बाईट २) आ. चैनसुख संचेती, भाजप पक्ष निरीक्षक, चंद्रपूर मनपा ( live u Nagpur--- Ngp chandrapur sancheti) व्ही. ओ. ३) इकडे चंद्रपुरात पोचलेल्या निवडणूक प्रमुख आ. किशोर जोरगेवार यांनी मुनगंटीवार यांचे सोबत असलेला आपला वाद मीडियाने तयार केला आहे असे सांगितले. आम्ही दोघेही जाहीरपणे एकमेकांवर टीका करत नाही असेही ते बोलून गेले. दरम्यान चढ्या आवाजात बोलणे चंद्रपूरकरांचा स्वभाव असल्यामुळे नागपुरातील बैठकीच्या प्रसंगावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. बाईट ३) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर व्ही. ओ. ४) चंद्रपुरात भाजपला महायुतीतील घटक पक्ष आणि विरोधी पक्षांसह अंतर्गत कुरघोडींवरही विजय मिळवायचा आहे हे स्पष्ट दिसले. या संपूर्ण बैठक प्रकरणावर काहीही बोलण्यास दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नकार दिला. कॅमेरा वर बोलणे टाळतानाच त्यांनी तीन दिवस थांबा असेही सूचक व्यक्तव्य केले. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 26, 2025 13:16:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 26, 2025 12:34:460
Report
PNPratap Naik1
FollowDec 26, 2025 12:08:340
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 26, 2025 12:07:210
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 26, 2025 12:00:160
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 26, 2025 11:59:520
Report
PNPratap Naik1
FollowDec 26, 2025 11:57:010
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 26, 2025 11:24:400
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 26, 2025 11:15:180
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 26, 2025 11:05:210
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 26, 2025 10:23:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 10:16:310
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 26, 2025 10:15:240
Report
AKAMAR KANE
FollowDec 26, 2025 10:15:120
Report