Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ के बाभुळगाव नगर पंचायत के मुख्य अधिकारी हटाने की मांग, व्यापारियों ने मोर्चा निकाला

SRSHRIKANT RAUT
Dec 26, 2025 11:15:18
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या बाभूळगाव नगर पंचायतच्या मुख्याधिकारी यांची हकालपट्टी करा, अशी मागणी करीत आज शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेऊन, तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मुख्याधिकारी डॉ.पी.एस. सोटे यांनी वाढीव कर आकारणी आक्षेपाबाबत सुनावणी ठेवून शहरातील मालमत्ता धारकांना नोटिसी बजावल्या होत्या. त्यानुसार संबंधित नोटीस धारक सभेसाठी पोहोचले परंतु मुख्याधिकाऱ्यांनी नगर सेवक अभय तातेड, धरमचंद छल्लाणी व इतर काही नागरिकाविरूध्द पोलीस तक्रार दाखल करून गुन्हे केले. मुख्याधिकारी यांनी केलेली तक्रार खोटी व दिशाभूल करणारी असून जाणिवपुर्वक करण्यात आली, असा आरोप करीत बाभुळगाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी बाभुळगाव शहर बंदची हाक दिली होती.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Dec 26, 2025 12:34:46
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : महापालिका निवडणुकीसाठी भाजप आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचा 'निष्ठावंत पॅटर्न' - भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार आम्ही करणार - भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे मोठे विधान - जर भाजपमधून आमच्या निष्ठावान तिकीट मिळाले नाही तर ते महायुतीतील इतर पक्षात जातील आणि आम्ही त्याचा प्रचार करणार - पंधरा दिवसांपूर्वी पक्षात आलेले लोक आमच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत - या निवडणुकीत उमेदवार किती खर्च करणार किंवा त्याची किती क्षमता आहे याबाबत मुलाखतीतून विचारणा होते याचं आश्चर्य वाटतं - भाजपमध्ये अशा पद्धतीने किती खर्च करणार हे विचारण्याची पद्धत नव्हती आणि नाही
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 26, 2025 12:16:57
Chandrapur, Maharashtra:Feed slug removed. टायटल:--चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीसाठी नागपुरात झालेली पक्षाची बैठक ठरली वादळी, थेट चढ्या आवाजात आरोप-प्रत्यारोप झाल्याची चर्चा, बैठकीत सहभागी महसूलमंत्री बावनकुळे आणि आणि पक्ष निरीक्षक चैनसुख संचेती यांनी मात्र सर्व काही आलबेल असल्याची दिली ग्वाही अँकर:--चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीसाठी नागपुरात झालेली पक्षाची बैठक वादळी ठरली. नेत्यांमध्ये थेट चढ्या आवाजात आरोप-प्रत्यारोप झाल्याची चर्चा आहे. बैठकीत सहभागी महसूलमंत्री बावनकुळे आणि आणि पक्ष निरीक्षक चैनसुख संचेती यांनी मात्र सर्व काही आलबेल असल्याची ग्वाही दिली. चंद्रपुरात स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी मुनगंटीवार आणि आपल्यातील वाद मीडियाने तयार केल्याचाही दावा व्ही. ओ. १) चंद्रपूर मनपाच्या निवडणुकी संदर्भात नागपुरात आयोजित बैठकीकडे मुनगंटीवार आणि जोरगेवार या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष होते. या बैठकीत सर्व नेते एकत्र जमताच चढ्या आवाजात एकमेकांना जाब विचारणे सुरू झाल्याची चर्चा आहे. हे चढे आवाज बैठकीच्या कक्षाबाहेर आल्याने भाजपने तातडीने पावले उचलत अनावश्यक लोकांना इमारतीतून बाहेर केले. गेल्या काही दिवसात आ. मुनगंटीवार आणि आ जोरगेवार यांच्यात सुरू असलेल्या प्रचंड वादाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या गटाला किती जागा मिळाव्यात या संदर्भात प्राथमिक स्वरूपाची चर्चा यात झाल्याचे समजते. मुख्यत्वे मुनगंटीवारांनी एकाच घरी एकाहून अधिक तिकिटे नको, पक्षात नुकतेच आलेल्यांना तातडीने तिकीट देऊ नयेत, नेत्यांच्या निष्क्रिय मुलांना तिकिटे देऊ नयेत अशा प्रकारचे निकष लावावेत यावर भर दिला. यашिवाय दोन स्वतंत्र सर्वेक्षणे करून याबाबत प्रदेश पातळीवर उमेदवारीचे निर्णय घेण्याचे ही निश्चित झाले.दरम्यान बैठक तीन तास चालली. रात्री उशिरा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत खमंग चर्चा झाल्याची माहिती हसतमुखाने दिली. बाईट १) चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री ( live u nagpur--- NGP BAWANKULE BJP) व्ही. ओ. २) बैठकीत सहभागी पक्षाचे निरीक्षक आ. चैनसुख संचेती यांनी चंद्रपूर मनपा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटासोबत एकत्रितपणे निवडणूक लढविण्याची घोषणा केली. जागावाटप आणि नियोजना करण्यासाठी समन्वय समिती घोषित झाल्याचेही सांगितले. बैठकीत तणातणी- वादावादी झाली नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. बाईट २) आ. चैनसुख संचेती,  भाजप पक्ष निरीक्षक, चंद्रपूर मनपा ( live u Nagpur--- Ngp chandrapur sancheti) व्ही. ओ. ३) इकडे चंद्रपुरात पोचलेल्या निवडणूक प्रमुख आ. किशोर जोरगेवार यांनी मुनगंटीवार यांचे सोबत असलेला आपला वाद मीडियाने तयार केला आहे असे सांगितले. आम्ही दोघेही जाहीरपणे एकमेकांवर टीका करत नाही असेही ते बोलून गेले. दरम्यान चढ्या आवाजात बोलणे चंद्रपूरकरांचा स्वभाव असल्यामुळे नागपुरातील बैठकीच्या प्रसंगावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. बाईट ३) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर व्ही. ओ. ४) चंद्रपुरात भाजपला महायुतीतील घटक पक्ष आणि विरोधी पक्षांसह अंतर्गत कुरघोडींवरही विजय मिळवायचा आहे हे स्पष्ट दिसले. या संपूर्ण बैठक प्रकरणावर काहीही बोलण्यास दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नकार दिला. कॅमेरा वर बोलणे टाळतानाच त्यांनी तीन दिवस थांबा असेही सूचक व्यक्तव्य केले. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 26, 2025 12:08:34
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होत असताना आता तिसऱ्या आघाडीने देखील यामध्ये उडी घेतली आहे. कार्यकर्ता पॅटर्न राबवत वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी एकत्र येत आज तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये घराणेशाहीला थारा न देता कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी 81 जागांवर उमेदवार देणार असल्याची घोषणा या तिसऱ्या आघाडीकडून करण्यात आली. 16 जानेवारी नंतर महाविकास आघाडीने नेमकं काय गमावलं हे त्यांना कळेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत आल्यास त्याचे आम्ही स्वागत करू असही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं .
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 26, 2025 12:07:21
Washim, Maharashtra:अँकर:वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील सनगाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या मामा सह दोन भाच्याचाही धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून मृतदेह शोध पथकाकडून बाहेर काढण्यात आलेत.तीनही मुलांच्या मृत्युनं गावावर शोककळा पसरली आहे, सनगाव येथील ३५ वर्षीय मामा सिद्धार्थ मोहन बनसोड आणी भाचे अंकुश राजेंद्र भालेराव वय 16 वर्ष, आणि कार्तिक राजेंद्र भालेराव 14 वर्ष, या तिघांचेही कपडे धरणाच्या काठावर आढळून आल्यानं हे धरणात बुडाल्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने ,स्थानिकांनी शोध घेतला असता काहीच मिळुन आले नाही शेवटी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध आणि बचाव पथकाला प्रचारण करण्यात आलं. त्यांनी अवघ्या तासाभरात या तिघांचे मृतदेह बाहेर काढले.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 26, 2025 12:00:16
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 26, 2025 11:59:52
Mumbai, Maharashtra:सन मराठी'वर 'तू अनोळखी तरी सोबती' या नव्या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. मालिकेत अभिनेता अंबर गणपुले व अभिनेत्री योगिता चव्हाण ही नवी जोडी पाहायला मिळतेय. नुकतीच या मालिकेची प्रेस कॉन्फरन्स पार पडली. मालिकेच्या प्रोमोवरून दोन अनोळखी व्यक्तींची एक नवीन, फ्रेश लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चाळ संस्कृती ही मुंबईची खरी ओळख आहे. एकाच भागात असलेल्या पण दोन वेगवेगळ्या चाळीत राहणाऱ्या अर्पिता व समीर या दोघांची ही कथा असून, नकळतपणे एकमेकांची काळजी घेणारे हे दोघं कसे एकत्र येतील? नियती या दोघांची मैत्री - प्रेम संबंध जुळवून कसं आणेल ? हे पाहणं रंजक असणार आहे. मलिका ५ जानेवारीपासून रात्री ९ वाजता सन मराठीवर पहायला मिळेल.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 26, 2025 11:57:01
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 26, 2025 11:05:21
Nashik, Maharashtra:खा.अनिल देसाई, secretary, उद्धव बाळासाहेब ठाकरे. पत्रकार परिषद मुद्दे. ऑन पक्ष गळती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कार्यकर्ता आणि पदाधिकारी साखळी एकत्र आहे. जे समाजासाठी काम करत आहे ते एकत्र आहे काम करत आहे. काहींना स्वार्थ किंवा दबावापोटी जावं लागतं. आपण मागच्या काळात देखील हे बघितले आहेत. महाराष्ट्राचे राजकारण कधीही न घडलेल आपण बघत आहोत. सोडून जाणारे एखादा व्यक्ती असतो किंवा त्यांच्या घरातले असतात, मात्र शिवसैनिक ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहे. त्याची प्रचिती तुम्हाला निवडणुकीमध्ये दिसेल. ऑन जागा वाटप आमची मित्र पक्षांची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. सत्येतील पक्षांनी काय केलं हे सर्व महाराष्ट्र ने पाहिलं. आमच्या पक्षात ज्यांना जेवढ्या जागा मिळतील ते आनंदाने त्या जागा लढवतील. आमची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे एवढेच. ऑन अजित पवार राष्ट्रवादी प्रस्ताव त्यांची प्रस्तावावरून तुम्हाला कळत आहे की समोर काय घडत आहे. त्यांची मारामारी कशी सुरु आहे ते तुम्हाला दिसत आहे. आमच्या सोबत आलेले सर्व पक्षांची चर्चा सुरू आहे, समाधानकारक जागावाटप होतील. ऑन संजय राऊत पुणे संजय राऊत यांनी दिलेल्या स्टेटमेंट हे अतिशय योग्य दिले आहे. दोघं राष्ट्रवादी एकत्र येतील यावर संजय राऊत साहेब बोलले आहे. नाशिक मध्ये हे कस शक्य. ऑन आदित्य ठाकरे दौरा आदित्य ठाकरे उद्या नाशिक मध्ये आहे हा त्यांचा आधीच ठरलेला कार्यक्रम होता निवडणूक वेगळा विषय ते उद्या तपोवन येथे भेट देणार आहे. तपोवन नंतर ते राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहे. ऑन शिवसैनिक संभ्रम शिवसेनिकांमध्ये कोणतीही संभ्रम अवस्था नाही शिवसैनिक जागेवर आहे जमिनीवर काम करत आहे. शिवसैनिकांची तयारी जोरदार सुरू आहे. ऑन आयात उमेदवार राजकीय स्ट्रॅटर्जी शिरसस्थ नेतृत्व ठरवते. उद्धव साहेब आहे राज साहेब आहेत ते निर्णय घेतील.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 26, 2025 10:23:40
Akola, Maharashtra:अकोल्यातील नागरिकांचे तसेच विविध समाजघटकांचे मत जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने एक अभिनव उपक्रम राबविला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने ‘नवसंकल्पनामा’ प्रकाशित करण्यात येणार असून, त्यासाठी थेट नागरिकांकडून सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या जात आहेत. या उपक्रमांतर्गत मोबाईल माध्यम, प्रत्यक्ष संपर्क तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध घटकांशी संवाद साधण्याचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आता शहरातील तब्बल २२५ ठिकाणी मतपेट्या लावून नागरिकांची मते व सूचना संकलित केली जाणार आहेत.केंद्र, राज्य व महानगरपालिका स्तरावरील विविध योजनांबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामध्ये मातृशक्ती, युवाशक्ती, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे विचार स्वतंत्रपणे नोंदविले जाणार आहेत.शहरातील विविध भागांमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या मतपेट्या वितरित करून त्या ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना, अपेक्षा आणि मत या मतपेटीत नोंदवाव्यात, असे आवाहन भाजपचे खासदार अनुप धोत्रे यांनी केले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 26, 2025 10:16:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राष्ट्रवादीच्या swatantrya लढण्याच्या मुद्द्यावर भाजपने त्यांना उत्तर दिले प्रतिसाद दिला नाही असं त्यांना वाटत असेल तर हे चुकीचं आहे त्यांना वेळोवेळी साद घातलेली आहे. असं एकाही प्रभागात झालं नाही की राष्ट्रवादीने त्यांच्या नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट मागितले आणि ते नाकारले, पहिल्या बैठकीत त्यांना आम्ही सामील करून घेतले होते. त्यांच्याकडे प्राबल्य असणारे प्रभाग असतील तर त्यांनी सांगायला हवे. त्यांना युतीत यायचं नसेल म्हणून त्यांनी घराणेशाही वक्तव्य केलं असेल, सर्व पक्षांसोबत युती करायचा निर्धार आमचा आहे. असे भाजप म्हणाले.. बाईट: आमदार संजय केणेकर, भाजप नेते
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 26, 2025 10:15:12
kolhapur, Maharashtra:नागपूर: नागपूरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आभा पांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आदेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल होत असल्याची माहिती आभा पांडे यांनी दिली. नागपूर महापालिका निवडणुकीत महायुतीत भाजपा व शिवसेना एकत्र लढत असताना राष्ट्रवादीच्या आभा पांडे यांनी प्रभाग 21 मधून अर्ज दाखल केला. नागपुरात भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध राष्ट्रवादीच्या आभा पांडे ही लढणार असल्याचा दावा. जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल. आमच्या प्रतिनिधी अमर काणे यांनी याविषयी संवाद साधला. बाइट -- आभा पांडे, उमेदवार नागपूर महानगरपालिका
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 26, 2025 10:01:25
0
comment0
Report
Advertisement
Back to top