Back
बिहार में एनडीए की जीत के बाद महाराष्ट्र में महाविकास आघाडी पर कड़ी चुनौती
MNMAYUR NIKAM
Nov 15, 2025 06:01:19
Buldhana, Maharashtra
बुलढाणा..
आमदार संजय गायकवाड बाईट्स...
ऑन बिहार निकाल..
अपेक्षेपेक्षा जास्त यश एनडीएला बिहारच्या निवडणुकीत आलेल आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा असाच धुव्वा या ठिकाणी उडणार आहे. विधानसभेप्रमाणेच महायुती आगामी काळात यश प्राप्त करेल.
ऑन लाडकी बहिण फॅक्टर.
लाडक्या बहिणीचा फॅक्टर निकालात दिसूनच आला लाडक्या बहिणींना दहा हजार रुपये दिले त्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसतच आहे. महाराष्ट्रातही तो आपण अनुभवला. काँग्रेसने आरोप केला की आमिष दाखवलं... मग यांनी 65 वर्ष सत्ता भोगली तर यांनी जनतेला कमी आमिषे दिली का..? पण त्यांना 65 वर्षात काहीही करता आलं नाही.
ऑन हर्षवर्धन सपकाळ .
दुबार मतदार नोंदणीचा फायदा हा काँग्रेसलाच मिळत आला आहे. हरल्यानंतर सर्व रडीचे डाव असतात.. तुम्ही हवेत उडणारे लोक आहात जमिनीवर लोकांचे काम करत नाही. भाजपा शिवसेना हे सगळे जमिनीवर काम करत आहेत. गेल्या पंधरा-वीस वर्षात बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जी गुंडागर्दी खतम केली. जो न्याय त्या ठिकाणी जनतेला दिला. त्यामुळे बिहारमध्ये जनतेला सुरक्षित आयुष्य जगता आलं. त्या माणसाने बिहार लाईनवर आणलं. काँग्रेसची सत्ता बिहारमध्ये असताना बिहारची हाल काय होते..? "बिहार मे बच्चा पैदा होता तो मा के पेट से तलवार लेके पैदा होता है.." अशी भाषा त्या काळी चित्रपटात होती. हे सगळं संपवल. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जेवढा क्राईम कंट्रोल केला एवढा भारतात कुणी केला नाही.
ऑन राहुल गांधी..
राहुल गांधी जवळ आता जादूत कुठे आहे चालायला.. फ्लोफ केस आहे ती...!
ऑन भाजपा निती...
युद्धात सर्वस्व पणाला लावत असतात.. सर्वांना सोबत घेऊन विरोधकांसोबत लढाई लढले जाते आणि विजय प्राप्त होतो... त्यामुळे छोटे मोठे पक्ष संपवणे हा उद्देश दिसत नाही.
ऑन संजय राऊत ट्विट...
मतचोरी चा...? मला मत चोरी कशी होते हेच कळत नाही... दुबार नाव असणे मृत व्यक्ती त्यावर मतदान होणे हे मी समजू शकतो. पण हे काही एकच पक्ष करत नाही. असं करणारे सगळ्याच पक्षाचे लोक असतात. डबल मतदान करणारे हे सगळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोक आहेत हे मी अनेकदा सांगितलं. जे लोक सोडून गेले त्यांच्या नावावर मतदान सगळेच पक्ष करतात. राहुल गांधी किंवा संजय राऊत कोणता निकष लावून मत चोरी झाली असं म्हणतात हेच कळत नाही. अरे हा सरळ सरळ जनतेचा कल आहे. तुम्ही आधी ईव्हीएम वर आरोप केले जिंकले तर ईव्हीएम चांगलं नाही तर खराब. आता हे जिंकले तर पुन्हा मतं चोरी आली.... अरे सरळ सांगा ना तुमचे औकात राहिली नाही ते.... जनता तुम्हाला लाथाळून राहिली... हे मान्य करा.
ऑन स्थानिक निवडणुका...
आता बुलढाण्यात महायुती होईल असं काही वाटत नाही.. कारण काल बुलढाण्यातील उमेदवाराला भाजपने मान्यता दिली आहे. उबाठा आणि काँग्रेसचाही ठरलं आहे मात्र त्यांचा उमेदवार जाहीर झाला नाही. आम्ही उमेदवाराच्या शोधात आहोत मात्र आम्हाला चांगला उमेदवार सापडला नाही. जिल्ह्यात अद्याप युतीची चर्चा नाही. आम्ही प्रस्ताव दिला आहे मात्र अद्याप चर्चा कुणाकडूनच नाही.
232
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowNov 15, 2025 08:33:120
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 15, 2025 08:00:4996
Report
KPKAILAS PURI
FollowNov 15, 2025 07:31:03181
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 15, 2025 07:30:4975
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 15, 2025 07:30:39168
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 15, 2025 06:48:0999
Report
KPKAILAS PURI
FollowNov 15, 2025 06:31:0675
Report
SNSWATI NAIK
FollowNov 15, 2025 06:16:18134
Report
SNSWATI NAIK
FollowNov 15, 2025 05:46:1371
Report
KPKAILAS PURI
FollowNov 15, 2025 05:19:02128
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 15, 2025 05:08:05176
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 15, 2025 04:46:51168
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 15, 2025 04:46:0779
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 15, 2025 04:37:02Beed, Maharashtra:बीड:दिवंगत विनायक मेटेंची शिवसंग्राम संघटना देखील नगरपालिकेच्या रिंगणात; मेटेंच्या निधनानंतर नगरपालिकेची पहिली निवडणूक
108
Report