Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411018

अलंदी में ज्ञानेश्वर महाराज की संजीवन समाधि के दौरान भक्तों की भारी भीड़ और व्यवस्थाएं

KPKAILAS PURI
Nov 15, 2025 07:31:03
Pimpri-Chinchwad, Maharashtra
अलंदी में संत ज्ञानेश्वर महाराज की संजीवन समाधि समारोह के अवसर पर भक्तों की भारी भीड़ उमड़ पड़ी है। कार्तिकी एकादशी के मौके पर अलंदी में लगभग पांच लाख भक्त वहाँ पहुँचे हैं और आगामी 17 तारीख को होने वाले संत ज्ञानेश्वर महाराज की संजीवन समाधि समारोह के लिए सात लाख भक्तों के आने की आशा है। इतनी बड़ी संख्या में आने वाले भक्तों को परेशान न हो, इसके लिए मंदिर प्रशासन ने आवश्यक व्यवस्थाएं की हैं। इस अवसर पर स्काई वॉक से दर्शन की रैंकिंग दी जा रही है, और भक्तों के लिए चाय और नाश्ते की व्यवस्था भी की गई है। अलंदी में चल रहे समारोह की तैयारी कैसी है, इस बारे में विश्वस्त राजेंद्र उमप से हमारे प्रतिनिधि कैलास पुरी ने बात की है।
181
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Nov 15, 2025 09:20:51
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात अजित पवारांची साथ दोन माजी आमदारांनी सोडल्यानंतर, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी थेट दिवंगत माजी मंत्र्याच्या पत्नी आणि सुनेला राष्ट्रवादीत घेतले आहे. यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही मोहिते पाटील मिळाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार्श्वभूमीवर महायुती मध्ये पक्ष फोडाफोडीचे राजकारण जोरदार सुरू आहे. भाजपाने नुकतेच माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, माजी आमदार पुत्र रणजीत शिंदे यांना भाजपात प्रवेश दिला. यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत राहिलेल्या माजी मंत्री दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी पद्मजादेवी मोहिते पाटील आणि सुन उर्वशीदेवी मोहिते पाटील यांना पक्षात घेतले आहे. अकलूज नगर परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची तयारी या माध्यमातून केली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक साठीच्या 26 जागा मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत. आता उमेश पाटलांच्या या खेळी अकलूज मध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सह भाजपला शह देण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी होईल हे निवडणुका नंतर समोर येईल
0
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 15, 2025 09:09:22
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे On बिहार निवडणूक राहुल गांधी आपल्या देशासाठी पर्यटक आहेत. जनतेशी नाळ नसणारे देशाची बदमानी करणारे जे पार्ट टाइम राजकारणी आहेत. त्यांना भारतीय म्हणायचे का हा प्रश्न आहे? अशा लोकांना बिहारच्या जनतेने नाकारले आहे. लोकशाहीची थट्टा करण्याची राहुल गांधींची सवय आहे. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारून एन डी ए ला संधी दिलीय त्यांच्या लायकी प्रमाणे जागा मिळाल्या 6 जास्त आहेत 0 मिळाला असता तर योग्य आकडा त्याच्या समोर लागला असता. ऑन बिहार निवडणूक लालू प्रसाद यांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था ढासळी होती. पण नितीश कुमार आणि मोदी सरकारने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. विविध योजना आणल्या त्याच प्रतिबिंब निकाल दिसलय. ऑन मनसे / काँग्रेस काँग्रेस आणि मनसे आपसात दर्जा ठरविण्याची भाषा करत असतील तर लांबून हसनच बरोबर आहे. काँग्रेस ला हिंमत असेल तर त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी. सुक्या धमक्या देतात. मुंबई वर हिरव्याचं राज्य आणायचा कार्यक्रम सुरु आहे. काँग्रेस ची भाषा ही जिहाद्यांची भाषा आहे. ऑन शरद पवार मी बोलण योग्य नाही. ऑन ओंकार हत्ती न्यायालयाचे आदेश मिळाले मिळाले आहेत. वनताराच्या माध्यमातून ओंकार हत्तीला सुरक्षित वनतारामध्ये पाठवलं जाईल आणि लोकांना होणारा त्रास संपुष्टात येईल.
95
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 15, 2025 09:09:07
Chendhare, Alibag, Maharashtra:महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल अलिबागमध्ये शेकाप काँग्रेस आघाडीचे शक्तीप्रदर्शन शेतकरी भवन पासून निघाली मिरवणूक जयंत पाटील , राजाभाऊ ठाकूर यांचा सहभाग अलिबाग नगर पालिका निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शेकापचे मुख्यालय असलेल्या शेतकरी भवन इथून नगर पालिकेपर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यात शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर यांच्यासह शेकाप आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. अलिबाग मध्ये शेकाप नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या १८ तर काँग्रेस २ जागा लढवत आहे. त्यांची लढत महायुतीशी होणार आहे.
76
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 15, 2025 08:49:48
Baramati, Maharashtra:बारामती शरद पवार पॉईंटर.. *ऑन_बिहार निवडणूक मुख्यमंत्री कोण ?* तिथे घवघवीत यश आहे.बीजेपी आणि नितीशकुमार ते बसून निकाल घेतील या निवडणुकीमध्ये त्या जे प्रेझेंटेशन केलं ते नीतिशच्या नावाने होतं. त्यामुळे वेगळा निकाल होईल असं वाटत नाही. मला अधिकृत माहिती नाही *ऑन_ बिहार निवडणूक निकाल* दोन तीन गोष्टी आहेत. मतदानानंतर मी काही लोकांशी बोललो होतो. काही लोकांकडून मला फीडबॅक असे मिळाला की या निवडणुकीचा मतदान महिलांनी हातात घेतलं होतं. *मला एक अशी शंका होती,ज्याअर्थी महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिला याचा अर्थ सर्व महिलांच्या खात्यात १० हजार रुपये पडले त्याचा परिणाम असावा* पण त्यावेळीला मतदान झालं होत आता निकाल आले आहेत. *महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या अगोदर पैसे वाटले* *सरकारच्या वतीने वाटले. महाराष्ट्रात लाडके बहीण* तसंच आता बिहारमध्ये झालं आहे. *प्रश्न असा आहे की इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या अगोदर अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्की शंका आहे.* याचा विचार इलेक्शन कमिशनने केला पाहिजे. *ऑन_स्थानिक स्वराज्य संस्था चंदगड मध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती पुणे जिल्ह्यात काय* मला कुठल्या जिल्ह्यात काय आहे माहित नाही माझ्या पक्ष पुरतं एवढंच सांगतो चर्चा आमच्यात झाली, या स्थानिक निवडणुका जिल्हा परिषदेचे आहेत यानंतर पंचायत समितीचे येथील या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण तिथे असणं. याच्या अगोदरच्या निवडणुका आम्ही पार्टी म्हणून लढवल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने आम्ही चार जिल्ह्यात पक्षाचे जे सहकार्य स्थानिक स्थिती बघून त्यांनी निर्णय घ्यावा. *ऑन_मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचा स्वबळाचा नारा* घेतील.... घेणार का नाही मला माहित नाही. यात काय आश्चर्य नाही. *मुंबई महानगरपालिका आत्ता जाहीर झालेले नाही* *ऑन_मुंबईत शिवसेनेचा महापौर झाला आहे परंतु आता भाजपमधून महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जातंय* याच्यात नवीन काय. *ऑन_निवडणूक आयोग भूमिका* प्रत्येकी दहा हजार रुपये वाटणे निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वाटप झालं. त्यानुसार ॲक्शन घेता येत नाही. पण हे योग्य आहे का. हा पैसा कुठला.सरकारी खजिण्यातला. सरकारी खजिना मतदान करा यासाठी वापरणार का ? *याचा अर्थ सरळसरळ निवडणुका गैरमार्गाने लढवायची भूमिका आहे* *ऑन_आगामी निवडणुकीत या गोष्टीला पायबंध कसा घालणार* आम्हाला बसून चर्चा करावी लागेल. अधिवेशन सुरू होईल तेव्हा आम्ही दिल्लीत सर्वजण आहोत एकत्र बसून आम्हाला याचा विचार करावा लागेल *ऑन_केळीचे दर घसरले* लोकांचं लक्ष साहजिकच निवडणुकीकडे असणार. मी या देशातील केळी एक्सपोर्ट करणार आहेत त्यांच्याशी संपर्क साधला जाईल. कायमस्वरूपी काय व्यवस्था करता येईल का. मागे तीन-चार वर्षांपूर्वी असा प्रश्न आला होता. त्यावेळी एका मोठ्या एक्सपोर्टला मी तिथे पाठवलं, तिच्यामार्फत केळी निर्यात केली. आता अनेक लोकांना सहभागी करणे आवश्यक आहे. *ऑन_ऊस दर कोंडी कोल्हापूर आंदोलन* ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर अडवणे म्हणजे नुकसान कोणाच आहे ? हा रस्ता नाही. किंमत वाढवून देण्यासंदर्भातील जी मागणी आहे, तुम्ही किंमत उसाची वाढवता पण साखरेची वाढवत नाही. मग ती द्यायची कुठून? त्यासाठी लोकांच्यात अस्वस्थता आहे. हा प्रश्न लवकर सोडावा हा आग्रह केंद्र सरकारकडे आम्हा लोकांचा आहे *ऑन_मोदी भाषण निवडणूक आयोग आभार* मी भाषण ऐकलं. *जर हे पैसे वाटत आहेत वगैरे या सगळ्याकडे निवडणूक आयोगाने बग्याची भूमिका घेतली याचा त्यांना होणारच* *ऑन_शिवसेना चिन्ह निकाल तारीख वाढवली जात आहे* एक तर त्यांच्यावर अन्याय आहे. त्यांची कायदेशीर ही मागणी आहे जितका उशीर होईल त्या पक्षाला त्याची झळ बसते. तीसऱ्यांदा हे पुढे ढकलले.याचा अर्थ... आपण भाष्य करू शकत नाही पण दिसतंय ते ठीक दिसत नाही. *ऑन_पिपाणी गोठवले* फायदा होईल. मागे सर्व्हे केला होता पिपाणी आणि तुतारी यामुळे आमच्या अनेक जागा पडल्या मी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचे आभार मानतो त्यांनी आमची जी ताकत आहे त्याचा स्वीकार केला आणि त्याच्या दुरुस्ती केली. *ऑन_अतिवृष्टी मदत नाही, सरकारकडून कृष्णा माती आणि मोफत दिली जाईल* आज माझ्याकडे सोलापूर भागातील शेतकरी आले होते. माती कुठे आहे ? माती कुठून आणायची? दुसऱ्याच्या शेतातून कसे देणार कोण ? मी सोलापूरला जाणार आहे त्यावेळी चर्चा करणार आहे *ऑन_ 30 जून कर्जमाफी* बघू सरकार काय करतेय *ऑन_स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा न्याय व्यवस्थेवर काय वाटतं?* आम्हा सर्वांचे जबाबदारी आहे इन्स्टिट्यूटेशन ची प्रतिष्ठा जपली पाहिजे. अशी भूमिका गेली अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी घेतली. पहिल्यांदा इन्स्टिट्यूटेशनचे काही निर्णय चौकटीच्या बाहेर होताहेत अस लोकांना वाटायला लागल आहे. इन्स्टिट्यूटेशन संबंधीची शंका लोकांच्या मनातल्या निघत आहे. तरी याचे इन्स्टिट्यूटेशन ची प्रतिष्ठा त्यांनी जपली पाहिजे, आम्ही लोकांनी त्याच्यात राजकारण आणता कामा नये. तिची स्वायत्तता टिकवली पाहिजे
22
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 15, 2025 08:48:57
Pune, Maharashtra:लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज आज दाखल होणार लोणावळ्यात मोठं शक्ती प्रदर्शन करत भरण्यात येणार उमेदवारी अर्ज लोणावळ्यात महायुतीत निर्माण झालेल्या तिढ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक लढाई पूर्णपणे स्वबळावर लढणार असून नगराध्यक्ष पदासाठी १ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी १७ उमेदवारांची घोषणा आमदार सुनील शेळके यांनी केली असून २ ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे लोणावळ्यात खरी लढत आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी रंगण्याची चिन्हे आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज भरन्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी तयारी झाली असून, आमदार सुनील शेळके आणि सर्व उमेदवार व पदाधिकारी यांनी राममंदिरात श्रीरामाचे दर्शन घेऊन श्रीरामाकडे साकडं घातलं. लोणावळ्यात राष्ट्रवादी ची एकहाती सत्ता येऊ दे अस साकडं यावेळी श्रीरामाच्या चरणी घालण्यात आला.
42
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 15, 2025 08:48:41
Baramati, Maharashtra:बारामतीकरांना मला नगरपालिकेत सेवा करण्याची संधी द्या प्रत्येक कुटुंबाला दहा हजार मागेल त्याला वन बीएचके देईन_ काळूराम चौधरी... बारामतीच्या वेशीवरील मारुतीरायाने आशीर्वाद मला दिलाय ..माझा विजय निश्चित असून बारामतीकरांनी आपली सेवा करण्याची संधी द्यावी बारामती नगरपरिषदेच्या बजेट मधून वर्षाला दहा हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला देईल आणि मागील त्याला वन बीएचके देईल कारण लाडक्या बहिणींना दीड दोन हजार रुपये आमच्याच पैशातून तुम्ही देत असाल तर एका कुटुंबाला दहा हजार रुपये देईन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या योजना दिल्या आहेत त्या तुम्ही इथे मलिदा म्हणून पवारांचे जे मलिदा ग्यांग आहेत ते खात आहात तो सर्व निधी मी बारामतीकरांना देईन. अमेरिकेच्या धरतीवर बारामतीकरांना शिक्षण देईल असे बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव काळुराम चौधरी यांनी व्यक्त केलेय ...बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.. यावेळी ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके देखील उपस्थित होते.. बारामतीत नगर परिषदेच्या घरपट्टी पाणीपट्टी जगात कुठे नाही एवढी आकारले जाते त्या मनात सुविधा दिल्या जात नाहीत. पवारांच्या नजिकच्या नगरसेवक आणि नेते मंडळींच्या मोकळ्या जागेत देखील रस्ते झालेले आहेत दलित वस्तीत मात्र कोणत्याही सुविधा नाहीत असा देखील आरोप त्यांनी केलाय
97
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 15, 2025 08:36:44
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर: वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा पक्षात सद्यस्थितीत उभी फूट पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि 1 नगर पंचायत साठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवू असं महाविकास आघाडी च्या नेत्यांनी जाहीर केलं असलं तरी वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी काल उबाठा चे उपजिल्हा प्रमुख नागोराव ठेंगडे यांनी उबाठा पक्षाची उमेदवारी दाखल केली आहे तर आज उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा सुरेश मापारी यांनी आज वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उबाठा कडून उमेदवारी अर्ज भरला आहे. वाशिम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी वरून सद्यस्थितीत महाविकास आघाडी मधील उबाठा पक्षात उभी फूट पडल्याचं दिसत असून पक्ष नेमकं कुणाला अधिकृत उमेदवारी देतो ते अर्ज मागे घेण्याच्या दिवशी समजेल मात्र ज्यांना उबाठा कडून अधिकृत उमेदवारी मिळणार नाही ते बंडखोरी करून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
59
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 15, 2025 08:34:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंदा वाघीण सांगलीच्या चांदोली येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाली आहे. व्याघ्र संवर्धन उपक्रमांतर्गत चंदा वाघीणीला “सॉफ्ट रिलीज” पद्धतीने सोडण्यात आले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये या चंदा वाघिणीचं नाव बदलून आता तारा ठेवण्यात आले आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व पेंच व्याघ्र प्रकल्प येथील तीन नर व पाच मादी अशा एकूण आठ वाघांचे सांगलीच्या चांदोली येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प येथे स्थानांतरण करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर चंदा वाघीणही सुखरूपपणे सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात आता पोहोचली असून वन विभागाच्या माध्यमातून तिच्यावर नजर ठेवली जाणार आहे।
115
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 15, 2025 08:33:12
Nagpur, Maharashtra:नागपूर देवेंद्र फडणवीस बाईट ( लाडकी बहीण.. शरद पवार-बिहार) --- *जो जीता वही सिकंदर* हरल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे, मोकळ्यामनाने आपल्या चुका कबूल करता आल्या पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे... आत्मपरीक्षण करणे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही... -- वेगवेगळ्या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती.. त्यांची सरकार होती त्यांनाही होती.... मग त्यांनी केल्या का नाहीत आम्ही योजना केल्या... त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी मतदान केले.. ( राहुल गांधी निष्पक्ष चुनाव नही था ) --- वो जब तक आत्मपरीक्षण नही करेंगे... तब तक वो मट्टी मे ही जायेंगे... (on अजित पवार दिल्ली शहा -पार्थ विषय) - ---मला काही असं वाटत नाही... राज्यातील काही मुद्द्यांवर त्यांनी भेट घेतली आहे असे मला वाटते - --------------------- विरोधी पक्ष एकत्र लढतोय की स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईतील जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचा महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे... कोण काय लढत हा त्यांचा प्रश्न आहे... मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल
195
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 15, 2025 08:00:49
Satara, Maharashtra:सातारा : जरंडेश्वर साखर कारखान्याने ऊस दर जाहीर न करताच गाळप सुरू ठेवल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आज आक्रमक झाली. शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे पदाधिकारी जरंडेश्वर साखर कारखान्यांमध्ये घुसले आणि ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विनंती केली मात्र स्वाभिमानीचे पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक होईल हे सांगण्यातआलं. मात्र बैठकीमध्ये योग्य निर्णय झाला नाही तर आंदोलन करावे अशी भूमिका मांडली आंदोलकानी मांडली. दरम्यान सोमवारच्या बैठकीमध्ये योग्य दर दिला नाही तर स्वतः राजू शेट्टी या आंदोलनामध्ये उतरून शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देतील असं सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितलंय
116
comment0
Report
Advertisement
Back to top