Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

नाशिक कुंभ 2027 के लिए सरकार ने 25,055 करोड़ रुपये मंजूर किए

VKVISHAL KAROLE
Nov 10, 2025 02:32:36
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा २०२७मध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिकला २५,०५५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. कुंभमेळ्यादरम्यान नाशिकहून घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविक येतील असे गृहीत धरून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यालाही ९,६३३.५१ कोटी देण्याचे नियोजन केले जात आहे. वेरूळ, पैठण, आपेगाव, वडवाळीच्या पायाभूत सुविधांवर निधी खर्च होणार आहे. एकूण ४८ विभागांत हा खर्च केला जाईल. विशेष म्हणजे नाशिकच्या तुलनेत संभाजीनगरला मिळालेला निधी ३९ टक्के आहे. मनपा, पैठण, खुलताबाद नगरपालिकेला सर्वाधिक ४,७३३.२८ कोटी निधी प्रस्तावित आहे. त्यात पैठणला तर ९९६ कोटी देण्याचा विचार आहे. यातून 'विकास' केला जाणार आहे...
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRANAV POLEKAR
Nov 10, 2025 04:19:05
Ratnagiri, Maharashtra:युतीच्या घोषणे आधीच खेड मध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारा ठरल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता. नव्याने भाजपमध्ये गेलेल्या वैभव खेडेकर यांच्याकडून त्यांची पत्नी वैभवी खेडेकर यांचा नगराध्यक्ष म्हणून उल्लेख असलेले फोटो वायरल. तर शिंदेच्या शिवसेनेकडून माधवी बुटाला खेडचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार......... महायुतीमधील दोन महत्वाच्या पक्षांकडून वेगवेगळे उमेदवार समोर आल्यामुळे राजकीय गोटात चर्चांना उधाण. स्वतंत्र उमेदवारांची नावे समोर आल्यामुळे खेडमध्ये महायुतीमध्ये फूट पडण्याची शक्यता. वैभव खेडेकर यांनी पत्नी वैभवी खेडेकर यांचा नगराध्यक्ष म्हणून उल्लेख करत व्हॉटस् अँप स्टेट्स केले अपडेट.....तर तिकडे शिंदेच्या शिवसेनेच्या माधवी बुटाला यांचे बॅनर देखील झाले वायरल.खेड मध्ये योगेश कदम विरूुद्ध भाजपा संघर्ष वाढण्याची चिन्हे
4
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 10, 2025 04:15:59
3
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 10, 2025 04:15:45
Nashik, Maharashtra:नाशिक * जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाची तारीख निश्चित * मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार (दि. १३) रोजी सकाळी ११.३० वाजता होणार उद्घाटन * मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात अर्धा डझन मंत्र्यांची उपस्थिती अपेक्षित * जिल्हा परिषद प्रशासनाकडून उद्घाटन सोहळ्याच्या तयारीला वेग * कुंभमेळ्याच्या कामांचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार * त्र्यंबकेश्वर आचारसंहितेमुळे वगळले, नाशिक शहरातील कामेच राहिली शिल्लक * जिल्हा परिषदेची इमारत महापालिका क्षेत्रात असून आचारसंहितेचा अडसर नाही * सोहळ्यासाठी मंत्री, लोकप्रतिनिधी, माजी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निमंत्रण पाठविण्याची तयारी
2
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 10, 2025 03:46:39
Latur, Maharashtra:लातूर विभागानं यंदा कमाईत राज्यात सर्वांना मागे टाकलंय... दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवासीसंख्येत मोठी वाढ झाली आणि त्याचा थेट फायदा लातूर विभागाला झाला. परिणाम तब्बल १८ कोटी रुपयांची ‘दिवाळी’ लातूर विभागात साजरी झाली आहे. राज्य परिवहन महामंडळात दिवाळीच्या काळात प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल होते. यंदाही परिस्थिती तशीच राहिली. मात्र, या गर्दीचं प्रभावी व्यवस्थापन करून, बससेवा उपलब्ध ठेवून आणि लांब पल्ल्याच्या मार्गांना प्राधान्य देत लातूर विभागानं राज्यात पहिला क्रमांक पटकावला. या उत्पन्नात लातूर आणि उदगीर आगाराचा मोठा वाटा असल्याचं स्पष्ट होतंय. अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारांनीही चांगला परफॉर्मन्स नोंदला आहे.
6
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 10, 2025 03:34:57
10
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 10, 2025 03:31:35
Nashik, Maharashtra:महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली असून तिची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. कॉपी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून त्या दृष्टीने यंदा कडक परिस्थिती असेल, असे संकेतही देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात सुमारे २५० केंद्रांवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी करताना आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. यंदा प्रथमच शाळेबाहेर ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे. दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी यंदाही सरमिसळ पद्धत असणार आहे. गतवर्षी ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार घडले, त्यांची मान्यता रद्द केली जाणार आहे. त्यावेळी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे वेळेत शक्य नव्हते. त्यामुळे पर्यवेक्षकांचे मोबाइल कॅमेरे सुरू करून त्या निगराणीखाली परीक्षा पार पडली होती. जिल्ह्यात दुर्गम भागातील काही परीक्षा केंद्र संवेदनशील आहेत. ज्या केंद्रांवर सातत्याने कॉपी केसेस होत असतात त्या केंद्रांना अतिसंवेदनशील केंद्रांच्या यादीत ठेवण्यात आले आहे. अशा केंद्रांबाहेर आता ड्रोनची नजर ठेवण्यात येणार आहे...
6
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 10, 2025 03:21:23
Nashik, Maharashtra:जिल्ह्यात २६२ पदांसाठी भरती जिल्ह्यात २६२ पदांसाठी भरती नाशिक ग्रामीण पोलिस दलात २१० पोलिस शिपाई, ५२ वाहनचालक अशा एकूण २६२ रिक्त पदांची, तर कारागृह दलात स्वतंत्ररीत्या ११८ शिपायांची भरती करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, ३० तारखेपर्यंत त्याची मुदत असणार आहे...राज्याच्या गृह खात्याकडून महाराष्ट्र पोलिस दलामध्ये १५ हजार पदांपेक्षा जास्त रिक्त जागांवर भरतीची घोषणा करण्यात आली. यानंतर भरती प्रक्रियेला सर्वच जिल्ह्यांमध्ये वेग आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलासह कारागृह दलाकडून विविध संवर्गातील रिक्त पदांकरिता अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे... गुणांची शारीरिक मैदानी चाचणी, तर १०० गुणांच्या लेखी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. मैदानी चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार एकास दहा या प्रमाणानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत...
8
comment0
Report
Advertisement
Back to top