Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

भीम ब्रिगेड विरोध प्रदर्शन: मंत्री शिरसाट के खिलाफ आंदोलन, प्रतिकात्मक पुतला जलाया गया

ADANIRUDHA DAWALE
Mar 20, 2026 09:00:33
Amravati, Maharashtra
मंत्री संजय शिरसाट और विरोधात भीम ब्रिगेड संघठनाक्रम; अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय समोर जाळला शिरसाठ यांचा प्रतिकात्मक पुतळा अँकर :- शहरात आज भीम ब्रिगेड संघटनेने आक्रमक भूमिका घेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्री शिरसाट यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला. अधिवेशनादरम्यान ॲट्रॉसिटी कायद्याबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे अनुसूचित जाती समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिस बंदोबस्तात हे आंदोलन पार पडले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Mar 20, 2026 10:38:48
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, पशु संवर्धन विभाग , उमेद आणि जिल्हा महिला बचत गटांच्या वतीने हिराई वस्तू-विक्री प्रदर्शनीचा प्रारंभ, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे केले आवाहन चंद्रपूरात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, पशु संवर्धन विभाग आणि जिल्हा महिला बचत गटांच्या वतीने हिराई वस्तू-विक्री प्रदर्शनाचा प्रारंभ शहरातील चांदा क्लब मैदानावर करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्री उईके यांनी उद्घाटनानंतर प्रदर्शनीचा फेरफटका मारत वस्तू खरेदी करत विक्रेत्यांचा उत्साह वाढविला. जिल्ह्यातील पशुधन पालकांनी आणलेल्या पशुधनाची माहिती त्यांनी करून घेतली. पालकमंत्र्यांनी या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांचे रंगारंग नृत्य कार्यक्रम, पैसा रे पैसा २ अंकी नाटक, स्वरानंदवन आर्केस्ट्रा, उमेद कर्मचारी/कॅडर यांचे नाटीका नृत्य आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
890
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 20, 2026 10:37:59
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महापालिका के सामान्य सभाप्रवेश/सभा में गोंधळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के अभिनंदन प्रस्ताव पर गोंधळ हुआ. विरोधीपक्ष के नेता विजय चौगुले ने नवी मुंबई में प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल को गुरु तेग बहादुर साहिब के नाम से नामित करने की घोषणा की थी जिसके बारे में अभिनंदन प्रस्ताव लाया गया था. परन्तु सत्ताधारी भाजप ने कहा कि मुख्यमंत्री ने भूखंड का उल्लेख नहीं किया था, इसलिए भूखंड के उल्लेख को हटाकर अभिनंदन प्रस्ताव लाने की सलाह दी गई. शिवसेना शिंदे गट के नेताओं ने मुख्यमंत्री के अभिनंदन प्रस्ताव को प्रस्तुत कर भाजपा को फंसाने की कोशिश की. आखिर बहुमत के आधार पर मुख्यमंत्री के अभिनंदन प्रस्ताव को सूचनेसहित मंजूरी दी गई.
846
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 20, 2026 10:02:37
Kalyan, Maharashtra:केडीएमसीचा ३ हजार १८६ कोटी रुपयांचा अर्थ संकल्प सादर केडीएमसीच्या बजेटमध्ये नागरिकांना दिलासा कोणतीही दरवाढ नाही. ANC - कल्याण डोंबिवली महापालिकेचा २०२६-२७ सालाकरीता ३ हजार १८६ कोटी ६० लाख रुपयांचा अर्थ संकल्प महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी शुक्रवारी पार पडलेल्या महासभेत सादर केला. यामध्ये जमा आणि खर्चाच्या बाजूसह मागच्या वर्षीच्या सुधारीत अर्थ संकल्पानुसार आरंभिची शिल्लक ५७२ कोटी ७६ लाख रुपये दाखविण्यात आली आहे. कोणतीही करवाढ दरवाढ नसलेल्या यंदाच्या अर्थ संकल्पात नागरीकांसाठी पूरविण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधांसह विकास प्रकल्पाकरीता ३ हजार १८६ काेटी ४९ लाखाचा खर्च अपेक्षित आहे. बाईट- अभिनव गोयल, आयुक्त, केडीएमसी
948
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 20, 2026 09:50:13
Akola, Maharashtra:सध्या चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहेय, चिमणी वाचविण्यासाठी अनेक संस्था व सामाजिक संघटना पुढे येत आहेत, परंतु अकोल्यातील निवृत्त तलाठी सुनील कल्ले हे गेल्या 21 वर्षांपासून चिमणी वाचविण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांनी घरातच अनेक धान्याची घरटी लावली आहे.सद्यस्थितीत त्यांच्या घरात चिमण्यांसह विविध पक्षी पहायला मिळतात.. पाहूया आज जागतिक चिंमणी दिवस निमित्त हे विशेष वृत्तांत.. अकोल्यात निवृत्त तलाठी असलेले सुनील कल्ले यांनी चिमणी वाचविण्याचा ध्यास घेतला आहे. यासाठी ते 21 वर्षांपासून प्रयत्नरत आहेत. चिमण्यांची संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी आपल्या घराच्या आवारातील छताला विविध धान्याची घरटी उभारली आहेत, पक्ष्यांच्या या चाऱ्या पाण्याची बारमाही व्यवस्था ते करतात, आता त्यांच्या घरात चिमण्यां आणि विविध पक्षी वास्तव्य करीत आहेत, अनेक अनोळखी पक्षी वा व्यास्तव्यास असल्याचे कल्ले सांगतात..काळाच्या ओघात व सिमेंटच्या जंगलात चिऊताईचा चिवचिवाट कमी झाला आहेय, चिऊताईचा संदर्भ लहानपणी ऐकलेल्या गोष्टीत असला तरी चिमणी वाचविण्यासाठी त्या ताकदीचे प्रयत्न सध्या तरी होत नसल्याचे चित्र आहे. परंतू अकोल्यातील सुनील कल्ले हे त्यासाठी अपवाद ठरले आहे.शहरी भागात चिमण्यांना चाऱ्यासाठी भटकंती करावी लागते, मात्र कल्ले यांनी केलेल्या चाऱ्याच्या सोयीमुळे त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात चिवचिवाट ऐकायला मिळते, कल्ले यांचा भगीरथ प्रयत्न आणि भूतदया ही निश्चितच वाखाणण्याजोगे आहे.जुन्या काळात शेतातील अन्नधान्य चिमणी आणि पक्षांना खायला मिळायचं पण आता हरवेस्टरचा वापर सुरू झाल्याने, शेतात धान्य पडत नाही परिणामी पक्षांना अन्न शोधण्यासाठी भटकावं लागत..ही परिस्तिथी पाहून आपण पक्षी संरक्षणासाठी काही तरी केले पाहिजे ही कल्पना त्यांच्या मनात आली, त्या दृष्टीने घराच्या खुल्या जागेत हिरव्या वेली व झाडांनी नटवले, पक्षांसाठी अनेक धान्याची घरटी तयार केलीय..आता या धान्याच्या घरट्यांत शेकडो चिमण्या इतर पक्षांची ये-जा असते, अनेक अनोळखी व दुर्मिळ पक्षीही येथे येत असतात. सुनील कल्ले, निवृत्त तलाठी, अकोला सुनील कल्ले हे अनेक वर्षांपासून पशु पक्षांची सेवा करत आहेत, मात्र त्यांच्या या सेवेत त्यांच्या पत्नीचाही मोलाचा वाटा आहेय. सुनील कल्ले प्रमाणे सुनीत कल्ले ह्याही प्राणी आणि पशु पक्षाची उत्तम देखभाल करतात. पहाटेपासूनच पशु पक्षांना खाद्य-पाणी देने हे त्यांचे नित्यनियम झाले झाले आहे. त्यामुळेच अनेक पक्षाची गर्दी कल्ले यांच्या घरी दिसतेय. तर यावर्षी हवामान खात्याने प्रखर उन्हाची शक्यता सांगितल्याने कल्ले परिवाराने आता पक्षांसाठी ग्रीन नेटची सुविधा सुद्धा केली आहेय. जीवजंतू पशु-पक्षी यांचा निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी मोठा वाटा असतो, म्हणून पशु-पक्षीना वाचवणे अत्यंत गरजेचे आहेय..सुनील कल्ले आणि त्यांच्या परिवार प्रमाणे सर्वांनीच असे कार्य करणे गरजेचे झाले आहेय.
1087
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 20, 2026 09:48:33
1012
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 20, 2026 08:51:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : उद्धव ठाकरे च्या शिवसेनेचे संभाजी नगरात शिंदे सेनेच्या साथीने सत्ता स्थापनेचा मनसुबे होते मात्र भाजपने हे मनसुबे उधळून लावले त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा आता कलह सुरू झाला आहे आमचे सदस्य अंबादास दानवे यांनी विकायला काढले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे च्याच एका सदस्यांना केला आणि त्यावर खुलासा करण्याच्या दारुण प्रयत्नात उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या सदस्यांकडून सगळीच पोलखोल झाली, पाहूयात काय झालंय नक्की प्रकार ( संजय निकम याच्या बाईट्ने सुरुवात करा ) अंबादास दानवे वर आरोप करणारे हे आहेत संजय निकम उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य, दानवेंनी आमच्या नवनिर्वाचित सर्व सदस्यांचा सौदा केला होता. त्यानंतर दानवेंनी आम्हाला डांबून ठेवलं, वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन गेली अनेक दिवस आम्हाला फिरवलं. कुणाशीही संपर्क होऊ नये म्हणून आमचे मोबाईल देखील काढून घेतले होते असा सनसनाटी आरोप केला त्यामुळं आधी असे काहीच नाही म्हणणारी उद्धव ठाकरे यांची सेने अडचणीत आली, अंबादास दानवे त्यांच्या तावडीतून आम्ही सुटका केली आणि हा सगळा प्रकार उद्धव ठाकरे यांना सांगितला असल्याचा आरोपही ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी केला आहे. Vo 2.. यामुळं अडचणीत आलेल्या ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या आरोपांवर मौन बाळगले आणि इतर सदस्यांना पूढे केले मात्र इतर सदस्यांनी यावर खुलासा करताना होय आम्ही सत्तेसाठी हालचाली करत होतो अशी जाहीर कबूलीच दिली, याबाबत उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे याना माहिती ही दिली होती मात्र आम्हाला सत्तेत जायचे होते त्यामुळं आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी मान्य केले, मात्र आमचे 2 सदस्य भाजपने फोडले आणि अडचण झाल्याचीही कबुली त्यांनी दिली , आणि उद्धव यांच्या सेनेचा सगळं प्लॅन च उघड झाला... Vo 3... खरंतर ही पत्रकार परिषद दानवे यांच्यावर खोटे आरोप केले हे सांगण्यासाठी या सदस्यांनी घेतली मात्र या सगळ्यात नक्की काय ठरले होते याची कबुलीच त्यांनी दिली त्यामुळं भाजपने जे आरोप दोन्ही शिवसेनेवर केले होते त्यालाही पुष्टी मिळाली , सारवासारव करण्याचा नादात पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेने सगळंच उघड केले आणि पून्हा तोंडावर पडले अशाच चर्चा या निमित्ताने सुरू झाल्या आहेत... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
1023
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 20, 2026 08:36:03
Vasai-Virar, Maharashtra:वसईत गवराई पाडा येथे जमीन וादातून महिलांवर जीवघेणा हल्ला महिलांवर फावडे आणि लाकडी दांडक्यानी जीवघेणा हल्ला महिलांवर निर्दयी हल्ल्यामुळे परिसरात तणाव वसई पूर्वेच्या गवराई पाडा जीवन नगर परिसरात जमीनीच्या वादातून एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर होऊन काही महिलांवर अक्षरशः फावडे आणि लाकडी दांडक्यानी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे विडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जमीन मालकी हक्काच्या वादातून दोन्ही बाजूंमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. वाद वाढत जाऊन परिस्थिती बिघडली आणि काही महिलांना लक्ष्य करत त्यांच्यावर घातक हल्ला करण्यात आला. या घटनेत काही महिला जखमी झाल्याचे समजते असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
1096
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 20, 2026 08:16:14
Solapur, Maharashtra:सोलापूरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा द्राक्ष पिकांवर मोठा परिणाम अवकाळी पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी येथील शेतकरी अंकुश सिरसट यांची तब्बल तीन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. या घटनेत जवळपास 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. यंदा द्राक्षाला चांगला बाजारभाव मिळत असताना शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांची जोपासना केली होती; परंतु सणासुदीच्या दिवशी आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांच्या आशा उद्ध्वस्त झाल्या आहेत. रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळीसह वांगी, रानमसले, कळमण, बीबी दारफळ, वडाळा, बाणेगाव आणि मार्डी परिसरांनाही पाडला आहे. अंकुश सिरसट यांच्या बेदाणा रॅकचेही मोठे नुकसान झाले असून, त्यावर ठेवलेला माल 50 ते 60 लाख रुपयांचा खराब झाला आहे. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे.
1045
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 20, 2026 08:15:57
Dhule, Maharashtra:धुळे तालुक्यात आधीच शेतकरी अवकाळी पाऊसाने उध्वस्त होत असतांना आता धुळे तालुक्यातील साजोरी या गावी रात्री हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यामध्ये सात बकऱ्या ठार झाल्या असून, शेतकरी दीड लाख रुपयांचा नुकसान झाले आहे. शेतकरी दीपक मोतीराम ठाकरे यांच्या शेतात गोठ्यामध्ये बांधलेल्या बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला. त्यात सात बकऱ्या ठार झाल्या असून शेतकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरला आहे. सकाळी शेतात गेल्यानंतर हा प्रकार दीपक ठाकरे यांच्या लक्षात आला. गेल्या काही दिवसापासून सांजोरी गावाकडे बिबट्याच दर्शन गावकऱ्यांना झालं होतं. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात या बकऱ्या ठार झाल्या असून पंचनामा करून आम्हाला मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गावकाऱ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरला आहे.
1092
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 20, 2026 08:15:34
Washim, Maharashtra:वाशीम: अंतर्गत धुमका ते बोराळा या वाशीमला जोडणाऱ्या सुमारे सहा ते सात किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अपघाताच्या घटना घडत आहेत. या जीवघेण्या खड्यामुळं वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून वाशीमला जाणाऱ्या स्थानिक नागरिक, प्रवासी आणिशाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या पाच वर्षांपासून जड वाहतुकीमुळे रस्त्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांकडून तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली जासत आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांशी बातचीत केली आमचे वाशिम प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी …
1089
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Mar 20, 2026 08:04:15
Dhule, Maharashtra:धुळे तालुक्यात वादळी वाऱ्याने काढणीला आलेले पीक जमीनदोस्त झाली आहेत. तालुक्यातील जापी, शिरढाने, कुंडाणे शिवारात बहुसंख्य क्षेत्रात मक्याचे पीक भुईसपाट झाले आहे. जिल्ह्यात बहुसंख्य भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यात सर्वाधिक नुकसान साक्री तालुक्याचे झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हिरावला. साक्री तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट पेरेजपूर, कावठे आणि अष्टानेसह बहुसंख्य क्षेत्रात काढणीला आलेले पीक जमीनदोस्त. तर धुळे तालुक्यात देखील मक्का पिकासह गव्हाचे नुकसान झाले आहे. बहुसंख्य मक्याचे पीक जमीनदोस्त झाले आहे. जापी शिवारात मक्याचे पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
1050
comment0
Report
Advertisement
Back to top