Back
अजित पवार की मौत पर नए खुलासे से राजनीतिक तूफान, मिटकरी का दावा
JJJAYESH JAGAD
Feb 04, 2026 03:45:54
Akola, Maharashtra
Anchor :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणात नवनवीन उलगडे समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी याआधीच काही शंका उपस्थित केल्या होत्या. आता अकोल्यात त्यांनी आणखी एक खळबळजनक खुलासा केला आहे.
Vo 1 : अमोल मिटकरी यांनी सांगितलं की, घटनेच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता ते घटनास्थळी गेले असता, तेथील सरपंचांनी धक्कादायक माहिती दिली. विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं.त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाला आणि पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असं सरपंचांनी सांगितल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.अजित पवार यांच्या मृत्यूचं गूढ महाराष्ट्रासमोर राहू नये, त्याचा संपूर्ण उलगडा व्हावा यासाठी आपण जिवंत असेपर्यंत लढा देणार असल्याचा ठाम संकल्प अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार यांचा घातपात झाला असेल, तर त्याचा बदला घेणं ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले.यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱ्यांवरही जोरदार निशाणा साधला. अजित पवारांबद्दल कोणी अपशब्द वापरले असतील, तर त्याला ताकदीने उत्तर देण्यात आम्ही समाधानी असून परिणामांची चिंता केली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.मिटकरी यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती उघड करताना सांगितलं की, सध्या दाखवला जात असलेला सीसीटीव्ही फुटेज हा घटनेच्या दिवशीचा नसून तब्बल तीन महिन्यांपूर्वीचा आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं, कोण उपस्थित होतं, अजित पवार कोणते कपडे घालून गेले होते ? हे सगळं सत्य काळाच्या पडद्याआड जाऊ नये, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं.अकोला महापालिकेतील अपयशाबाबतही अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं. युतीत निवडणूक लढवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा कमी आल्याचं स्पष्टीकरण आपण अजित पवारांना दिलं होतं, असं त्यांनी सांगितलं.सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. पक्षाच्या हितासाठी निर्णय घेणं महत्त्वाचं असून, येत्या काही दिवसांत सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होतील, असा दावा त्यांनी केला.दरम्यान, मिटकरी यांनी आणखी एक नवीन इच्छा व्यक्त केली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेला ‘अजित दादा लाडकी बहीण योजना’ असं नाव द्याव अथवा एखाद्या कृषी योजनेला अजित पवारांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Byte : अमोल मिटकरी, आमदार राष्ट्रवादी, काँग्रेस.
Final Vo : एकूणच अजित पवार यांच्या मृत्यूबाबतचा संशय अधिक गडद होत असून, अमोल मिटकरी यांच्या या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowFeb 04, 2026 05:08:170
Report
AKAMAR KANE
FollowFeb 04, 2026 05:00:300
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 04, 2026 04:50:050
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 04, 2026 04:49:250
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 04, 2026 04:46:280
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 04, 2026 04:19:150
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 04, 2026 04:18:430
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 04:15:550
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 04, 2026 04:06:490
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 04, 2026 04:06:000
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 04, 2026 04:05:370
Report
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 04:05:240
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 04, 2026 04:04:510
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 04, 2026 03:46:420
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 04, 2026 03:46:150
Report