Back
अकोला में अचानक बारिश: मौसम बदला, गर्मी से राहत, किसानों की फसलें खतरे में
JJJAYESH JAGAD
Mar 30, 2026 14:10:48
Akola, Maharashtra
राज्यभरात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली असून अकोल्यातही आज सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन आकाश ढगाळ झाले होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.Gेल्या काही दिवसांपासून अकोला शहरासह जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत होता. तापमान तब्बल ४२ अंशांपर्यंत पोहोचले होते. मात्र आज अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे आणि नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळाला आहे.
मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून अनेक ठिकाणी उभ्या पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली असून अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसू नये, यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 30, 2026 15:34:110
Report
MAMILIND ANDE
FollowMar 30, 2026 15:31:320
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 15:31:170
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 30, 2026 14:49:201065
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 30, 2026 14:46:30917
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 30, 2026 14:30:571034
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 30, 2026 14:17:211071
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 30, 2026 14:11:341005
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 30, 2026 14:11:201080
Report
ABATISH BHOIR
FollowMar 30, 2026 14:11:051054
Report
SNSWATI NAIK
FollowMar 30, 2026 13:21:591022
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 30, 2026 13:05:001072
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 12:47:48945
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 12:47:331072
Report