Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404
तालासरी पुल पर भारी हादसा: बारातियों से भरा टेम्पो खड़े कंटेनर से टकराया, 20-22 घायल
HPHARSHAD PATIL
Mar 30, 2026 14:11:34
Palghar, Maharashtra
पालघर मुंबई अहमदाबाद महामार्गावर तलासरी येथील उड्डाणपुलावर भीषण अपघात. लग्नाच्या वराडांनी भरलेला टेम्पो ची उभ्या कंटेनरला धडक. धडके 20 ते 22 वऱ्हाडी गंभीर जखमी. जखमींवर तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. घटनास्थळी पोलीस दाखल. महामार्गावर नादुरुस्त वाहने हटविण्यात महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Mar 30, 2026 15:34:11
Akola, Maharashtra:आज सायंकाळी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने अकोला जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अकोला शहराजवळील बाबुळगाव परिसरात वीज झाडावर कोसळल्याची घटना घडली असून या विजेच्या तडाख्यामुळे सुमारे तीन ते चार झाडांना आग लागली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अचानक पडणारा अवकाळी पाऊस आणि विजेचा कडकडाट लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि झाडाखाली उभे राहणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 30, 2026 15:31:32
Wardha, Maharashtra:वर्ध्यात शेतकऱ्याचे काम रखडविल्याने आमदार संतप्त. आमदारांची शेतकऱ्यांच्या कामासाठी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना मोबाईलवर दिली तंबी. शिरुड परिसरातील शेतकऱ्याच्या शेती मोजणीसंदर्भातील काम सहा महिन्यांपासून रखडल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित शेतकऱ्याकडे सुमारे ६ एकर शेती असून, मोजणीसाठी परवानगी न मिळाल्यामुळे त्याला वारंवार शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शेतकरी त्रस्त झाला होता. या प्रकरणी अखेर शेतकऱ्याने स्थानिक आमदार राजेश बकाने यांच्याकडे धाव घेतली. तक्रारीची गंभीर दखल घेत आमदारांनी तत्काळ भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून जाब विचारला. शेतकऱ्यांचे काम का प्रलंबित ठेवले, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी देत शेतकऱ्यांचे काम तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या.. शेतकऱ्यांचे काम थांबविल्यास अधिकाऱ्यांची खुर्ची राहणार नसल्याचा इशारा आमदार राजेश बकाने यांनी दिला.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 30, 2026 15:31:17
Satara, Maharashtra:सातारा - सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला आहे.आधी मोठ मोठ्या गारा कोसळल्या त्यानंतर या अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे.यामुळे अनेक भागात शेतीचे नुकसान झाले आहे. खंडाळा तालुक्यातील मोर्वे गावातील शोलाडी शिवारात शेतकरी अमोल गोपाळ धायगुडे यांच्या मालकीच्या तब्बल आठ शेळ्यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे, तर एक मेंढी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस अशाच प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 30, 2026 14:49:20
Vasai-Virar, Maharashtra:वसईत बिबٹ्याच्या कातडीची तस्करी उघडकीस आली असून वनपरिक्षेत्र भाताणेच्या पथकाने धाडसी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. गुप्त माहितीनुसार खानिवडे टोलनाक्याजवळ ही सापळा रचून कारवाई करण्यात आली. वनाधिकारी विजय बारब्दे आणि वनपाल नितीन खुळपे यांनी स्वतः ग्राहक बनून तस्करांना जाळ्यात ओढले आणि कातडीसह त्यांना ताब्यात घेतले. अंधाऱ्या आणि जोखमीच्या ठिकाणी ही कारवाई पार पडली. या प्रकरणामुळे संरक्षित वन्यजीवांची तस्करी अद्याप सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही याच पथकाने मांडूळ साप तस्करी प्रकरणात कारवाई केली होती. दरम्यान, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार बिबट्यासारख्या शेड्युल-१ प्राण्यांच्या कातडीची तस्करी गंभीर गुन्हा असून दोषींना ३ ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
1065
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 30, 2026 14:46:30
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान माध्यम प्रतिनिधींमध्येही तीव्र नाराजी पाहायला मिळाली. माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात आलेल्या हॉलमध्ये लावलेल्या टीव्ही स्क्रीनवर सभेचे थेट प्रक्षेपण वारंवार खंडित होत असल्याने पत्रकार संतप्त झाले. याविरोधात पत्रकार संघटनांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. महानगरपालिका प्रशासनाच्या तांत्रिक त्रुटीमुळे आज माध्यम प्रतिनिधींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पत्रकारांसाठी स्वतंत्र हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी सभेचे थेट प्रक्षेपण सतत बंद पडत होते. यामुळे सभेतील घडामोडींची अचूक माहिती मिळण्यात अडथळे निर्माण झाले. यावेळी पत्रकारांनी महापौरांवरच संताप व्यक्त करत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शासकीय कॅमेरामन हे महानगरपालिका आयुक्तांच्या इशाऱ्यावरच चित्रीकरण करत असल्याचा आरोपही पत्रकारांकडून करण्यात आला. तसेच सभेचे पारदर्शक आणि सुरळीत प्रक्षेपण करण्याची मागणी पत्रकारांनी केली. दरम्यान, पत्रकारांच्या ठिय्या आंदोलनाची माहिती मिळताच स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी आंदोलनस्थळी भेट देत पत्रकारांच्या समस्या समजावून घेतल्या आणि त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. या सर्व गोंधळामुळे आजची आमसभा चांगलीच वादळी ठरली असून महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा आणि निर्णय प्रक्रियेवरही याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र सभागृहात जागा कमी असल्याने पत्रकारांना सभेत बसू देता येत नाही हे कारण नेहमी समोर केला जात आहे. मात्र सभागृहात घडलेल्या घटना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांनाच अडवल जात आहे असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
917
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 30, 2026 14:17:21
Shirur, Maharashtra:मंचर/पुणे Anc - आंबेगाव तालुक्याच्या चांडोली बुद्रुक गावातील 44 वर्षीय सुरेश पांडुरंग थोरात हे शेतकरी त्यांच्या शेतात पाणी भरत असताना जवळच असलेल्या विजेच्या खांबावरील विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने विजेचा Shock लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. मयत सुरेश थोरात यांच्या शेताशेजारी असणाऱ्या महावितरणच्या खांबाला काही दिवसापूर्वी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे सदर खांब वाकला होता. वाकलेला हा खांब दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी महावितरण कडे केली होती. मात्र महावितरण कडून कुठलीही उपाययोजना झाली नसल्याने सुरेश पांडुरंग थोरात यांच्या मृत्यूला महावितरणचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
1071
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 30, 2026 14:11:20
Junnar, Pune, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये अचानक हवामान बदलल्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह आलेलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे. विशेषतः जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध शिवनेरी हापूस आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भाजीपाला, कांदा, बटाटा आणि इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.
1080
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 30, 2026 14:11:05
Kalyan, Maharashtra:कर वसुलीसाठी केडीएमसी ची धडक कारवाई.. 14 कोटी थकबाकीमुळे वाधवा BOT प्रकल्प सील माधव बँक्वेट, नक्षत्र लॉन आणि ग्रीन लीफ हॉटेलला टाळे..लग्नसमारंभ ठप्प, आयोजक अडचणीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने थकबाकीदारांवर मोठी कारवाई करत केडीएमसी ने वाधवा बिल्डरला BOT प्रकल्पांमधील विविध व्यावसायिकासाठी देण्यात आलेल्या प्रॉपर्टी सील करण्यात आले आहे वाडेघर जलकेंद्र BOT प्रकल्पांतर्गत येणाऱ्या या प्रॉपर्टींचे मासिक भाडे अनेक वर्षांपासून थकले होते. याबाबत पालिकेकडून 2023 पासून नोटीस बजावण्यात अल्या होत्या मात्र, वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरली न गेल्याने अखेर पालिकेने कठोर पाऊल उचलत सुमारे 14 कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी ही कारवाई केली.या कारवाईत माधव बँक्वेट हॉल, नक्षत्र लॉन आणि ग्रीन लीफ हॉटेल यांना सील करण्यात आले.अचानक झालेल्या या कारवाईमुळे येथे सुरू असलेले व्यवसाय आणि कार्यक्रम पूर्णपणे ठप्प झाले आहेत
1054
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 30, 2026 14:10:48
Akola, Maharashtra:राज्यभरात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली असून अकोल्यातही आज सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन आकाश ढगाळ झाले होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.Gेल्या काही दिवसांपासून अकोला शहरासह जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत होता. तापमान तब्बल ४२ अंशांपर्यंत पोहोचले होते. मात्र आज अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे आणि नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळाला आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून अनेक ठिकाणी उभ्या पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली असून अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसू नये, यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
1095
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 30, 2026 13:21:59
1022
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 30, 2026 12:47:33
Satara, Maharashtra:सातारा:ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बाईट पॉईंटर सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या रजे विषयी ज्यांना जसे वाटते तसा अर्थ घ्यावा.. कोणाला वाटत असेल सक्तीची रजा तर त्याने त्याचा आनंद घ्यावा. कोणाला वाटत असेल ती रजा अर्जित आहे. तर त्याने तसे समजून घ्यावे. पोलीस अधीक्षक रजेवर गेले आहे हे सत्य आहे... मला आपणाकडूनच माहिती मिळाली पोलीस अधीक्षक रजेवर गेले आहेत ते खर आहे. पोलीस अधीक्षक प्रकरणाची चौकशी लागली ही माहिती सुद्धा मीडियाकडूनच समजत आहे. याची अतिरिक्त माहिती नाही. मात्र या निवडणूक प्रक्रियेत कायद्याचे उल्लंघन कोणी केल आहे याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणणे हे उचित नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आपण जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत याचं उल्लंघन झालं नाही पाहिजे जी चौकशी लागली आहे त्याची चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मी चांगले मित्र आहोत. आमचे व्यक्तिगत हेवेदावे काही नाही ते आणि मी एका मंत्रिमंडळात आम्ही काम करत आहोत.. राहिला निवडणुकीचा प्रश्न ते त्यांच्या पक्षाचे काम करतात मी माझ्या पक्षाचे काम करतो. आमची व्यक्तिगत लढाई नसून राजकीय लढाई आहे. माझं पहिल्यापासून सांगणं होतं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होईल जादूचा आकडा आमच्याकडे आला आणि आज 33 सदस्य आमच्या सोबत आहेत. अगदी अटक झालेल्या त्या लोकांची जरी मतं नोंद झाली असती तरी 30+2= 32 झाले असते आमचे 33 होतात.. यामुळे यावर वाद उपस्थित करणे योग्य नाही आमचे लोक 33 झाले म्हणून काही लोकांना बादा आणायची होती. हे मात्र नक्की. सभापती निवडीमध्ये मी बरोबर घेणारा मी कोण. मलाच फोन बरोबर घेत नाही. महायुती म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे हा आमची भूमिका आहे. नाही एकत्र आलो तरी भारतीय जनता पार्टीचे सभापती झाले पाहिजे ही माझी भावना आहे पोलीस अधीक्षकांच्या चौकशीचे असे कोणतेही निर्देश माझ्या माहितीनुसार दिले नसावेत. किंवा याबाबत मला कल्पना नाही. अशा चौकशीसाठी शासनाची शिफारस लागते मुख्यमंत्री निर्णय घेतात
1072
comment0
Report
Advertisement
Back to top