Back
अकोला महापालिका सभा में पत्रकारों की नाराज़गी, तकनीकी खामियों से कवरेज बाधित
JJJAYESH JAGAD
Mar 30, 2026 14:46:30
Akola, Maharashtra
अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान माध्यम प्रतिनिधींमध्येही तीव्र नाराजी पाहायला मिळाली. माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात आलेल्या हॉलमध्ये लावलेल्या टीव्ही स्क्रीनवर सभेचे थेट प्रक्षेपण वारंवार खंडित होत असल्याने पत्रकार संतप्त झाले. याविरोधात पत्रकार संघटनांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
महानगरपालिका प्रशासनाच्या तांत्रिक त्रुटीमुळे आज माध्यम प्रतिनिधींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पत्रकारांसाठी स्वतंत्र हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी सभेचे थेट प्रक्षेपण सतत बंद पडत होते. यामुळे सभेतील घडामोडींची अचूक माहिती मिळण्यात अडथळे निर्माण झाले.
यावेळी पत्रकारांनी महापौरांवरच संताप व्यक्त करत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शासकीय कॅमेरामन हे महानगरपालिका आयुक्तांच्या इशाऱ्यावरच चित्रीकरण करत असल्याचा आरोपही पत्रकारांकडून करण्यात आला. तसेच सभेचे पारदर्शक आणि सुरळीत प्रक्षेपण करण्याची मागणी पत्रकारांनी केली.
दरम्यान, पत्रकारांच्या ठिय्या आंदोलनाची माहिती मिळताच स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी आंदोलनस्थळी भेट देत पत्रकारांच्या समस्या समजावून घेतल्या आणि त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. या सर्व गोंधळामुळे आजची आमसभा चांगलीच वादळी ठरली असून महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा आणि निर्णय प्रक्रियेवरही याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र सभागृहात जागा कमी असल्याने पत्रकारांना सभेत बसू देता येत नाही हे कारण नेहमी समोर केला जात आहे. मात्र सभागृहात घडलेल्या घटना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांनाच अडवल जात आहे असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 30, 2026 15:34:11914
Report
MAMILIND ANDE
FollowMar 30, 2026 15:31:32964
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 15:31:17936
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 30, 2026 14:49:201065
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 30, 2026 14:30:571049
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 30, 2026 14:17:211071
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 30, 2026 14:11:341031
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 30, 2026 14:11:201080
Report
ABATISH BHOIR
FollowMar 30, 2026 14:11:051054
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 30, 2026 14:10:481095
Report
SNSWATI NAIK
FollowMar 30, 2026 13:21:591022
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 30, 2026 13:05:001072
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 12:47:48945
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 12:47:331072
Report