icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
444001
JJJAYESH JAGAD16 Dec 2025, 01:47 am

अकोला में बोंड अळी से कपास की फसल पर संकट, उत्पादन घट सकता है

Akola, Maharashtra:दिवाळीपर्यंत सुरू राहिलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे पीक अक्षरशः वाहून गेले. त्यानंतर ज्या कापसावर शेतकऱ्यांनी शेवटची आशा ठेवली होती, त्याच कापसावर आता बोंड अळीचे संकट घोंगावत आहे. अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावंडे परिसरासह इतर भागात बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वर्षभर कर्ज काढून, लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी कापसाचे पीक उभे केले. फवारण्या, सिंचन, खते आणि वाढता उत्पादनखर्च यांचा मोठा आर्थिक भार शेतकऱ्यांनी सहन केला. मात्र आता बोंड अळीमुळे संपूर्ण मेहनत वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कापसावर केलेला खर्च तरी निघेल की नाही, याचीही शाश्वती शेतकऱ्यांना राहिलेली नाही. सततची नैसर्गिक आपत्ती, रोगराई आणि वाढते खर्च यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पुरता कोलमडला आहे. त्यातच कापसाच्या उत्पादनात सुमारे ५० टक्के घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना का करण्यात येत नाहीत, असा सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत. शेतकऱ्यांना तात्काळ मदत, योग्य मार्गदर्शन आणि प्रभावी कीडनियंत्रण उपायांची मागणी जोर धरत आहे.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी में गणेशोत्सव के लिए बड़ी तैयारी, एक लाख 69 हजार मूर्तियाँ प्रतिष्ठापित

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवाची जय्यत तयारी.. रत्नागिरी जिल्ह्यात आज दीड लाख गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना.. कोकणचा सर्वात मोठा आणि जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्हा पूर्णपणे सज्ज झाला आहे.. कोकणातील वाड्या-वस्त्यांवर सध्या उत्सवाचे उत्साही आणि भारावून टाकणारे वातावरण पाहायला मिळत आहे.. यंदा जिल्ह्यात एकूण १ लाख ६९ हजार ६६४ गणेशमूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना होणार आहे.. यामध्ये तब्बल १ लाख ६९ हजार ५३८ घरगुती तर १२६ सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचा समावेश आहे.. घराघरांमध्ये आरास आणि सजावटीची लगबग अंतिम टप्प्यात पोहोचली असून,संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आपल्या विघ्नहर्त्याच्या आगमनासाठी सज्ज झाला आहे..
0
0
Report
Advertisement

कोंकण में गणेश उत्सव की धूम, संगमेश्वर के परचुरी गाँव महिलाएं डोके पर बाप्पा लाईं

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात गणेशोत्सवाचा जल्लोष; संगमेश्वरच्या परचुरी गावात महिलांनी डोक्यावर वाजतगाजत आणला बाप्पा!.. अँकर आज घराघरांत लाडक्या गणरायाचे आगमन झाले असून कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.. दरम्यान,संगमेश्वर तालुक्यातील परचुरी गावात एक अत्यंत अनोखी परंपरा पाहायला मिळतेय.. येथे गावातील महिलांनी ढोल-ताशांच्या गजरात थेट डोक्यावर गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन वाजतगाजत घरी आणले.. महिलांच्या या अनोख्या भक्तीची आणि परंपरेची संपूर्ण कोकणात जोरदार चर्चा सुरू आहे.. संगमेश्वरच्या परचूरी गावातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..
0
0
Report

गणेश के आगमन से शहर भर में भक्तों का उत्साह, 40 साल की परंपरा

Chendhare, Maharashtra:गणरायाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण घरोघरी भक्तिभावाने गणरायाची प्राणप्रतिष्ठा ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे जल्लोषात स्वागत मुंबई-गोवा महामार्ग लवकर पूर्ण होण्यासाठी बाप्पाला साकडे गोरेगावमधील खुटवळ परिवाराचीही गणेशोत्सवाची तब्बल ४० वर्षांची परंपरा आहे. यंदाही या परिवाराने मोठ्या भक्तिभावाने बाप्पाचं स्वागत करत विधिवत पूजा-अर्चा केली. यावेळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी खुटवळ परिवाराने गणरायाला साकडं घातलं.
0
0
Report

हसन मुश्रीफ बोले: पुणे पदवीधर सीट पर हमारी पकड़ मजबूत

Sangli, Maharashtra:अँकर - पुणे पदवीधर मतदार संघासाठी आम्ही अश्वमेध सोडला आहे,आणि पुणे पदवीधर मतदार संघाची जागा पदरात पाडून घेऊ,असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.तसेच पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी त्यांच्या मुलाची उमेदवारी थांबवून, प्रताप भैय्या माने यांना दिलेले शब्दाप्रमाणे पाठिंबा द्यावा,असे आवाहन देखील यांच्या या वेळminister मुश्रीफ यांनी केले आहे.पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी सांगलीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची आढावा बैठक पार पडली,यावेळी ते बोलत होते.तसेच पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये संघर्ष वाढणार आहे,हे नक्की..
0
0
Report
Advertisement

प्रताप भैय्या माने ने अरुण लाड पर पदवीधर मुद्दे पर हमला

Sangli, Maharashtra:पदवीधर मतदारसंघातून निवडून आले, मात्र पदवीधरांच्या प्रश्नावर विधान परिषद व विधानसभेत आमदार अरुण लाड यांनी कधीच आवाज उठवला नाही, असा आरोप पुढे पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार प्रताप भैय्या माने यांनी केला आहे. आमदार अरुण लाड यांच्या कामगिरी पदवीधरांना चांगलीच माहित आहे, त्यामुळे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत पदवीधर उत्तर देतेल, असे देखील भैया माने यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणी संदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पार पडलेल्या आढावा बैठकी प्रसंगी, ते बोलत होते。
0
0
Report

गोकुळ दूध संघ में हसन मुश्रीф ने अजीत पवार को बताया बड़ा भाई, चुनावी मोड़

Sangli, Maharashtra:सध्या गणपती उत्सव सुरु झाला आहे, त्यानंतर नवरात्र असे सणवार आहेत,यामध्ये कायदा- सुव्यवस्थेच्या समस्या पोलिसांच्या समोर असतात,त्यामुळे या गोष्टी म्हणून जरांगे पाटलांनी लक्षात घेऊन आंदोलन थोडे थांबून केलं असता, तर बरं झालं असतं, असं मत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर, मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा मोठा भाऊ आहे,असे विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे,तसेच गोकुळची निवडणूक युती म्हणून लढणार आहे,आणि जी युतीचं जिंकणार असे देखील मंत्री मुश्रीफ यांनी केला आहे,गोकुळ दूध संघाची निवडणूक लागली आहे,निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे,मतदार यादी फायनल झाली असून पंधरा तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात होईल,असे देखील मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केला आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते
0
0
Report

चंद्रपुर के सावली तालुका सोनापूर में गैस सिलिंडर धमाका, घर जलकर राख, दो घायल

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या सोनापूर येथे गॅस सिलिंडर स्फोट, घर जळून राख, दोन जण जखमी अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या सोनापूर गावातील रहिवासी बंडू सोमणकर यांच्या घरात घरगुती गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण गाव हादरले. स्फोट होताच घराने क्षणार्धात पेट घेतला आणि बघता बघता संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून राख झाले आहे.या दुर्घटनेत दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिस व महसूल प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली.गॅस गळती हे स्फोटाचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे。
0
0
Report
Advertisement

पुलिस ने रेसिडेन्सी होटल में बिना परमिशन डांस पार्टी पर छापा, आयोजकों को नोटिस

Kalyan, Maharashtra:चेहरा ब्लर करणे.. कल्याणमधील नामांकीत के. डी. रेसिडेन्सी हॉटेलवर पोलिसांचा छापा बेकायदा पार्टीप्रकरणी सात आयोजकांवर गुन्हा दाखल करून दिली नोटिस हॉटेलमध्ये आयोजित डान्स पार्टीमध्ये हाय प्रोफाईल कुटुंबीयातील तरुण-तरुणी Anchor-कल्याणमधील एक मोठ्या हॉटेलवर विना परवानगी सुरू असलेल्या पार्टीवर पोलीसांनी कारवाई केली आहे. के. डी. रेसिडेन्सी असे या हॉटेलचे नाव आहे. Vo- खडकपाडा पोलिसांनी इथे छाप टाकल्यानंतर ६० पेक्षा जास्त तरुण तरुणींना ताब्यात घेतले आहे. तर यातील काही पळून गेले.हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.मात्र इथे ड्रग्स आढळून आले नाहीत,मात्र या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.या प्रकरणी पार्टी आयोजित करणाऱ्या ७ आयोजकांवर गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस दिली आहे .या पार्टीसाठी दारू पार्टीची आवश्यक परवानगी हॉटेल व्यवस्थापनाकडे नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तसेच अशा प्रकारचा मोठा इव्हेंट आयोजित करण्यासाठीही आवश्यक परवानगी घेण्यात आली नव्हती. तरीदेखील हॉटेल व्यवस्थापनाकडून मोठ्या प्रमाणात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या पार्टीमध्ये काही हाय-प्रोफाईल कुटुंबातील तरुणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पार्टीतील उपस्थित तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली.
0
0
Report

मराठा आरक्षण के नेता ने मुंबई आने का आह्वान, नाशिक में समाज की खींचतान

Yeola, Maharashtra:मराठा आरक्षणाच्या नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक 15 सप्टेंबर रोजी सर्व मराठा बांधवांना मुंबईत येण्याचे आवाहन केल आहे मात्र नाशिक शहरातील काही मराठा बांधवांनी जरांगे पाटलांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत मुंबईत न जाण्याची भूमिका जाहीर केली या भूमिकेमुळे मराठा समाजात फूट पडली असल्याची चर्चा निर्माण झाल्याने नाशिकच्या ग्रामीण भागातील येवला,निफाड, चांदवड, नांदगाव या तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारात बैठक घेऊन लाखोंच्या संख्येने मुंबई जाण्याचा निर्धार केला आहे बैठकच्या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नाशिक जिल्हा मराठ्यांचा बालेकिल्ला या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता
0
0
Report

मालेगाव जंगल में शादी के नाम पर धोखा, युवती की मौत

Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) विशाल मोरे - पैशांसाठी लग्न लावून नवऱ्या मुलाला फसवलं. लग्न घरातून रात्री नवरीने पळ काढला आणि रस्त्यातच मृत्यूने तिला गाठलं. नाशिकच्या मालेगाव येथील घटनेने खळबळ उडवली आहे. गुजरातच्या डांग आणि वलसाड जिल्ह्यातून निलुबेन (वय 32) या विवाहित तरुणीचे लग्न झालेले असतानाही संशयित आरोपी शैलेशभाई लक्ष्मणभाई गावीत, प्रकाश आणि संजय सखाराम गांगुर्डे यांनी मिळून एक भयंकर कट रचला. निलुबेनचे पहिले लग्न लपवून तिचे एक बनावट नाव ठेवण्यात आले – निलुबेन संतोषभाई भोये. मुख्य सूत्रधार शैलेशभाई गावीत याने स्वतःचे नाव बदलून सुनील भोये असे सांगत तो निलुबेनचा भाऊ असण्याचा बनाव केला. या टोळीने मालेगावच्या लुल्ले शिवारातील चैत्राम देविदास अहिरे नावाच्या तरुणाला लग्न लावून देण्यासाठी तब्बल 1 लाख 50 हजार रुपयांची रोकड उकळली. 5 सप्टेंबर रोजी हे खोटे लग्न झाले आणि चैत्राम यांच्या पदरात फसवणूक पडली. लग्नाचा हा बनाव फार काळ टिकण्यार नाही; निलुबेनने त्या घरातून पळ काढला. ती जंगलाच्या रस्त्याने आपल्या आईकडे जाण्यासाठी निघाली होती; रात्रीची वेळ असल्यामुळे जंगलात तिचा पाय किंवा हात जिवंत विजेच्या तारेला लागला. तेजस्वी झटका आल्यावर तिचा जीव गेला. प्रारंभी हा एक अकस्मात मृत्यू वाटत होता, परंतु पोलिसांनी तपास considering करून मृत तरुणीची नातेवाईकांना शोधून बाहेर आणले. या प्रकरणात 4 आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 105 (सदोष मनुष्यवध), 318(4) (फसवणूक) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement

कल्याण की बाजारों में गणेश भक्तों की खरीदारी तेज, पूजा सामग्री की मांग बढ़ी

Kalyan, Maharashtra:कल्याणच्या बाजारपेठ मध्ये गणेश भक्तांची खरेदीसाठी गर्दी. पावसाच्या विश्रांतर नंतर बाजार पेठ मध्ये गणेश भक्तांची खरेदीसाठी गर्दी गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास उरले असताना कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजारपेठेमध्ये गणपतीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य तसेच डेकोरेशन घेण्यासाठी गणेश भक्तांची बाजारपेठेमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे सकाळपासूनच कल्याण डोंबिवली मध्ये पावसाची संततधार सुरू होती मात्र काही तासापासून पासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर बाजारपेठ मध्ये गणेश भक्तांची खरेदीसाठी झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
0
0
Report

कल्याण रेलवे स्टेशन पर ओवरहेड वायर टूटने से मध्य रेलवे की ट्रेनें बाधित

Kalyan, Maharashtra:तुटलेल्या ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू कल्याण स्थानकावर प्रवाशांची गर्दी कल्याण रेल्वे स्थानकात एक नंबर प्लॅटफॉर्म च्या पुढे ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. यामुळे अनेक लोकल रद्द झाल्या असून कसारा कडे जाणाऱ्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालाय .सध्या तुटलेल्या ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं आहे. मात्र स्थानकावर लोकल येत नसल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढत चाललीय. दरम्यान ही दुरुस्ती कधीपर्यंत पूर्ण होईल हे अजून रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top