Back
शिंदे गुट में 4 नगरसेवक शामिल, शिवसेना को बड़ा झटका, गटनेता बदले की तैयारी
JJJAYESH JAGAD
Mar 24, 2026 03:06:07
Akola, Maharashtra
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून 6 पैकी 4 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर आज गटनेता बदलण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सर्व नगरसेवकांनी या बैठकीला उपस्थित राहावे अशी नोटीस शिंदे गटाच्या नगरसेवकांकडून बजावण्यात आली आहे. मात्र उबाठा गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जात असून गटनेता विजय इंगळे यांनी अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे.
या पत्रात करण्यात आलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
i) नगरसेविका सुरेखा काळे, मनोज पाटील आणि सागर भारूका यांनी मूळ राजकीय पक्षातून इतर राजकीय पक्षात बेकायदेशीर विलीनीकरण केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे.
ii) त्याचप्रमाणे सोनाली सरोदे यांनी देखील मूळ राजकीय पक्षातून इतर राजकीय पक्ष किंवा गटात बेकायदेशीर विलीनीकरण केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे.
iii) या संपूर्ण प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन योग्य तो दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या नगरसेवकांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो आणि गटनेता बदलाचा निर्णय होतो का, याकडे आता राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 24, 2026 04:21:520
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 03:33:181047
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 03:33:031083
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 24, 2026 03:30:30909
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 24, 2026 03:17:17976
Report
AKAMAR KANE
FollowMar 24, 2026 03:15:231010
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 24, 2026 03:06:481047
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 24, 2026 03:06:19Varasoli, Maharashtra:तिजोरीच्या चावीसाठी महायुतीत रस्सीखेच ...... विषय समिती सभापती पदाची निवड बिनविरोध ..... अर्थ व बांधकाम समिती कुणाकडे ....... याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार .......
1096
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 03:05:471066
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 24, 2026 03:05:311086
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 24, 2026 03:05:211056
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 24, 2026 03:03:531076
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 02:46:021069
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 02:32:131000
Report