Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

संभाजीनगर की पिटलाइन अड़चनें: यात्रियों को मुंबई जाने के लिए गाड़ियाँ कम

VKVISHAL KAROLE
Mar 24, 2026 02:32:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
पर्यटन राजधानी असलेल्या संभाजीनगराची रेल्वेनं पिटलाइन मागील २ वर्षांपासून तांत्रिक कारणास्तव अडकली आहे. परिणामी, शहरातून नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्यात अडचणी येत आहेत. एकीकडे रेल्वे प्रशासन आधुनिकीकरणाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी हक्काची गाडी मिळेनाशी झाली आहे. राजकीय नेते फक्त आश्वासनांचे वारेमाप डोंगर उभे केले, मात्र रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांच्या सोयी पदरात पाडून घेण्यात लोकप्रतिनिधींना अपयश आल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी मंजूर झालेली पिटलाइन आधी जालन्याला पळवण्यात आली. त्यानंतर शहरासाठी १६ डब्यांची छोटी पिटलाइन मंजूर झाली. जालन्याचे काम पूर्ण झाले, मात्र येथील काम केवळ अंतिम जोडण्यांअभावी रखडले आहे. दरम्यान, जालना-मुंबई जनशताब्दीचा विस्तार हिंगोलीपर्यंत, तर वंदे भारतचा विस्तार नांदेडपर्यंत करण्यात आला. यामुळे या गाड्यांच्या वेळेत बदल होऊन त्या चाकरमान्यांसाठी गैरसोयीच्या ठरत आहेत...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Mar 24, 2026 03:33:18
Shirdi, Maharashtra:शिर्डीमध्ये तीन दिवसीय रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आलंय.. 25 ते 27 मार्च दरम्यान हा उत्सव साजरा केला जाणार असून, साई संस्थानने उत्सवाची जय्यत तयारी केली आहे.. उत्सवाच्या मुख्य दिवशी अर्थात 26 मार्च रोजी साई समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे.. या तीन दिवसीय उत्सव काळात साई संस्थानकडून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय.. साई दरबारी साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवांपैकी रामनवमी हा महत्वाचा उत्सव मानला जातो.. साईबाबा हयात असल्यापासून त्यांच्या पुढाकाराने 1911 सालापासून शिर्डीमध्ये हा उत्सव साजरा करण्याची परंपरा असून साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ आजही ही परंपरा जपत आहेत.. उत्सव काळात देशभरातून मोठ्या संख्येने पायी पालखी शिर्डीत होतात.. रामनवमी उत्सवानिमित्त होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेत भाविकांचे दर्शन सुकर व्हावे यासाठी साई संस्थानच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.. यासह कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून शिर्डीत अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे..
1015
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 24, 2026 03:30:30
871
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 24, 2026 03:17:17
899
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 24, 2026 03:15:23
Nagpur, Maharashtra:नागपूर राज्यात १२ वर्षांत २९८ वाघांचा मृत्यू, मात्र त्यापैकी ११० मृत्यू मानवी कारणांमुळे झाल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिकेद्वारे करण्यात आलाय. याबाबत राज्य आणि केंद्र सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश. राज्यात वार्षिक वाघ मृत्यू दर ४.९१ टक्के, देशातील सर्वाधिक असल्याचा दावा. विजेच्या धक्क्याने ३३ वाघांचा मृत्यू, संरक्षण उपाययोजना अपुऱ्या. वीजवाहिन्या सुरक्षित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशही दुर्लक्षित. वाघ मृत्यू प्रकरणांच्या तपासात मोठ्या प्रमाणात विलंब. २०२५मध्ये ९२.९% प्रकरणे प्रलंबित, एकूण १४३ प्रकरणे अद्याप न सुटलेली. NTCA च्या आकडेवारीत विसंगतीचाही आरोप.
1002
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 24, 2026 03:06:48
1026
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 24, 2026 03:06:07
Akola, Maharashtra:उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून 6 पैकी 4 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर आज गटनेता बदलण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सर्व नगरसेवकांनी या बैठकीला उपस्थित राहावे अशी नोटीस शिंदे गटाच्या नगरसेवकांकडून बजावण्यात आली आहे. मात्र उबाठा गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जात असून गटनेता विजय इंगळे यांनी अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रात करण्यात आलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत – i) नगरसेविका सुरेखा काळे, मनोज पाटील आणि सागर भारूका यांनी मूळ राजकीय पक्षातून इतर राजकीय पक्षात बेकायदेशीर विलीनीकरण केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे. ii) त्याचप्रमाणे सोनाली सरोदे यांनी देखील मूळ राजकीय पक्षातून इतर राजकीय पक्ष किंवा गटात बेकायदेशीर विलीनीकरण केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे. iii) या संपूर्ण प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन योग्य तो दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या नगरसेवकांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो आणि गटनेता बदलाचा निर्णय होतो का, याकडे आता राजकीय वर्तुळासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
974
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 24, 2026 03:05:47
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उन्हाच्या झळा वाढत चालल्या आहेत , उन्हाचा सर्वानाच त्रास होतोय आहेत, अशात छत्रपती संभाजी नगरच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी ही सुटले नाही, त्यामुळं वाघोबाला लागणाऱ्या उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी आणि वाघोबाला थंडा थंडा चील चील ठेवण्यासाठी त्याच्यावर रोज सकाळ दुपार संध्याकाळ आता पाणी मारण्यात येते आहे,  इतकच नाही तर वाघोबा साठी कुलर सुद्धा  लावण्यात आलेले आहेत.. पिंजऱ्याच्या आजूबाजूला पाण्याचे छोटे डबके सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत ..वाघ आणि सिंहाला उन्हाळ्यात जास्त त्रास होतो त्यासाठीची ही दक्षता छत्रपती संभाजी नगरच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात घेतली जात आहे
1053
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 24, 2026 03:05:31
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - टाकळी येथील भीमा नदीवरील जुन्या पुलाच्या ठिकाणी बॅरेज बांधण्याची खा. प्रणिती शिंदे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी - दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील भीमा नदीवरील जुन्या पुलाच्या ठिकाणी बॅरेज बांधण्याची खा. प्रणिती शिंदे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी.. - खा. प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन केली मागणी.. - भीमा नदीवरील बॅरेजमुळे केवळ पाण्याची साठवणूक वाढणार नाही तर परिसरातील 10 हून अधिक गावांतील भूजल पातळीतही वाढ होईल. - जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. संबंधित बॅरेजचा सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने तयार करून केंद्र सरकारकडे पाठवण्याचे निर्देश दिले - दक्षिण सोलापूरमधील ​नांदणी, टाकळी, कुरघोट, मंद्रूप, औज मंद्रूप, लवंगी या गावांसह सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार
1086
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 24, 2026 03:03:53
Bhandara, Maharashtra:पालांदूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा चिमुकलीवर जीव घेणा हल्ला .....अन्य सात व्यक्तींना ही कुत्र्याने घेतला गंभीर चावा! प्राथमिक उपचार घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल. भंडारा जिल्ह्यात पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे .आठवड्याभरपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांना गंभीर जखमी करत हल्ला केला होता. मात्र आत्ता पालांदूर येथील चिमुकलीवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात चिमुकली स्थानिकांमुळे बचावली आहे. तिच्यावर प्राथमिक उपचार करत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. या पिसाळलेल्या कुत्र्यांनी सोबतच अन्य सात व्यक्तींनाही गंभीर जखमी केलेली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
1055
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 24, 2026 02:31:37
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये संगीतगुरु हिरासुका लिंगो राज्यस्तरीय आदिवासी परधान समाज समिती च्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला. ज्यात अकरा राज्यातील परधान समाजबांधव सहभागी झाले. राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, छत्तीसगढ जनजाती आयोगाचे अध्यक्ष रुपसिंग मडावी यांचे सह परधान राष्ट्रीय प्रचारक यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी किंगरी, खंजीर, त्रिशूल आदी पारंपारिक साहित्याचा वापर करून धर्म पूजा देखील करण्यात आली. परधान समाजाच्या उत्थानासाठी देशभरातील सांघिक शक्ती एकवटवून, आपली संस्कृती, चालीरीती जोपासून आपल्या समस्यांचे निराकरण करण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला.
996
comment0
Report
Advertisement
Back to top