Back
पिंपरी-चिंचवड़ भाजपा में महापौर पद के प्रत्याशी चयन को लेकर गहन नाराज़गी
KPKAILAS PURI
Feb 02, 2026 14:18:06
Pimpri-Chinchwad, Maharashtra
भाजपचे सलग दोन वेळा बिन विरोध निवडून आलेले नगरसेवक रवि लांडे यांनी आज पिंपरी चिंचवड महापालिका महापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर उप महापौर पदासाठी शर्मिला बाबर यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपने महापौर पदासाठी सुरवातीला रवि लांडे आणि उप महापौर पदासाठी शीतल उर्फ विजय शिंदे यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र शीतल शिंदे यांनी उप महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी नाराजी दाखवल्या नंतर ऐनवेळी भाजपने शर्मिला बाबर यांना उप महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी लावलं आहे. रवि लांडे हे महापौर पदासाठी आणि शर्मिला बाबर यांनी उप महापौर पदासाठी अर्ज दाखल करत असताना पिंपरी चिंचवड भाजप मध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली आहे. महापौर आणि उप महापौर पदासाठी अर्ज दाखल करत असताना पिंपरी चिंचवड शहर भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघन उर्फ बापू काटे हे देखील उपस्थित नव्हते तर शीतल शिंदे यांच्या सह बरेच भाजप नगरसेवक हे गैर हजर असल्याचं पाहायला मिळालं आहे. शत्रुघन काटे हे देखील पिंपरी चिंचवड महापालिका मध्ये महापौर पदासाठी इच्छुक असल्याची जोरदार चर्चा पिंपरी चिंचवड शहरात सुरू होती. मात्र आमचा पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष असून लवकरच बाकी इच्छुक पदाधिकाऱ्याबद्दल योग्य निर्णय घेण्यात येईल अशी माहिती माध्यमांशी बोलताना पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप गट नेते प्रशांत शितोळे यांनी दिली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 02, 2026 15:30:300
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 02, 2026 15:04:360
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 02, 2026 15:04:240
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 02, 2026 15:04:020
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 02, 2026 14:11:210
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 02, 2026 14:10:560
Report
UPUmesh Parab
FollowFeb 02, 2026 14:10:160
Report
UPUmesh Parab
FollowFeb 02, 2026 13:50:240
Report
UPUmesh Parab
FollowFeb 02, 2026 13:50:050
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 02, 2026 13:33:300
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 02, 2026 13:00:450
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 02, 2026 12:49:280
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 02, 2026 12:46:520
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 02, 2026 12:30:410
Report