Back
अकोला महापालिका: स्वीकृत नगरसेवक चयन पर पार्टियों में अंदरूनी कलह तेज
JJJAYESH JAGAD
Mar 07, 2026 04:17:20
Akola, Maharashtra
अकोला महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीपूर्वी राजकीय वातावरण तापू लागलं आहे. स्वीकृत नगरसेवक पदावरून शिवसेना ठाकरे गटानंतर आता काँग्रेस पक्षातही अंतर्गत नाराजी समोर येत आहे.
९ मार्च रोजी अकोला महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार असून त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. २०२६ च्या महापालिका निवडणुकीत ८० प्रभागांसाठी मतदान झाले होते. नियमानुसार एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्के म्हणजेच साधारणपणे ८ स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
निवडणुकीदरम्यान अनेक पक्षांनी उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्ष निवडीनुसार वेळी अनेकांना डावलण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
शिवसेना ठाकरे गटानंतर आता काँग्रेस पक्षातही यावरून अंतर्गत कलह समोर आला आहे. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि शहर उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कपिलराव देव यांना यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ऐनवेळी काँग्रेसकडून उमेदवारी दुसऱ्याला देण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे.
दरम्यान, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून अकोला महानगरपालिकेतील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे दिसत असून पुढील काही दिवसांत आणखी घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 07, 2026 08:01:240
Report
KJKunal Jamdade
FollowMar 07, 2026 07:48:270
Report
AKAMAR KANE
FollowMar 07, 2026 07:46:100
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 07, 2026 07:35:230
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 07:33:280
Report
KJKunal Jamdade
FollowMar 07, 2026 07:17:510
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 07, 2026 07:16:560
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 07, 2026 07:05:460
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 07, 2026 06:47:380
Report
KJKunal Jamdade
FollowMar 07, 2026 06:46:350
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 07, 2026 06:19:110
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 07, 2026 06:05:300
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 06:01:530
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 07, 2026 06:01:380
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 07, 2026 05:47:370
Report