Back
Chandrapur Tiger-Human Conflict: Urgent Implementation Demanded
AAASHISH AMBADE
Mar 07, 2026 06:01:38
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूरमधील वाघ–मानव संघर्षावरील तांत्रिक समितीचा अहवाल तातडीने लागू करा, बंडू धोतरे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रहाचा तिसरा दिवस
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात वाढत चाललेल्या वाघ–मानव संघर्षावर कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तांत्रिक समितीच्या अहवालाची अंमलबजावणी तातडीने करावी, या प्रमुख मागणीसाठी पर्यावरण कार्यकर्ते आणि इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पाच वर्षांपूर्वी सरकारकडे सादर झालेला हा सविस्तर अहवाल अद्याप अमलात न आणल्याचा आरोप धोतरे यांनी वन विभागवर केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांमुळे होणारे मृत्यू, जनावरांचे बळी आणि शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ११ सदस्यीय तांत्रिक अभ्यास समिती स्थापन केली होती. ७ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या १५व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या समितीचे उद्दिष्ट वाघ–मानव संघर्षाची कारणे अभ्यासून त्यावर दीर्घकालीन उपाय सुचवणे असे होते. यानंतर ७ ऑक्टोबर २०२० रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ‘चंद्रपूर जिल्हा वाघ–मानव संघर्ष तांत्रिक अभ्यास गट’ औपचारिकरित्या स्थापन करण्यात आला. या समितीचे अध्यक्ष त्यावेळचे चंद्रपूर वर्तुळाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण होते. समितीने सखोल अभ्यास आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधल्यानंतर आपला अहवाल सादर केला. या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्यातील शिफारशी स्वीकारून त्यांची अंमलबजावणी करण्याची शिफारसही करण्यात आली.मात्र, समितीचा अहवाल स्वीकारूनही त्यातील उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, अशी तक्रार धोतरे आणि इतर पर्यावरणप्रेमी संस्थांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असतानाच मानवांवरील हल्ल्यांच्या घटनाही वाढत असल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे या विषयाकडे सरकारने तातडीने लक्ष देण्याची मागणी पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि विविध संस्थांकडून होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-मानव संघर्ष मधील मृत्यू संख्या
२०२१ - ४४
२०२२ - ५३
२०२३ - २५
२०२४ - २९
२०२५ - ४७
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 07, 2026 08:48:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 07, 2026 08:47:590
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 07, 2026 08:34:210
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 07, 2026 08:34:050
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 07, 2026 08:30:510
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 07, 2026 08:01:240
Report
KJKunal Jamdade
FollowMar 07, 2026 07:48:270
Report
AKAMAR KANE
FollowMar 07, 2026 07:46:100
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 07, 2026 07:35:230
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 07:33:280
Report
KJKunal Jamdade
FollowMar 07, 2026 07:17:510
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 07, 2026 07:16:560
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 07, 2026 07:05:460
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 07, 2026 06:47:380
Report
KJKunal Jamdade
FollowMar 07, 2026 06:46:350
Report