Back
Akola government hostels face gas cylinder shortage threatening meals for students
JJJAYESH JAGAD
Mar 13, 2026 09:55:04
Akola, Maharashtra
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. या परिस्थितीचा फटका आता राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहांनाही बसू लागला आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे काही वसतिगृहांमध्ये स्वयंपाक व्यवस्था विस्कळीत होण्याचीभीती निर्माण झाली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यात सध्या ४४९ शासकीय वसतिगृहे आणि ९२ शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत. अशा एकूण ५४१ संस्थांमध्ये सुमारे ५४ हजार मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत निवास, भोजन आणि शैक्षणिक सुविधा पुरवल्या जातात. मात्र सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे काही ठिकाणी स्वयंपाक व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. अकोल्यातील काही शासकीय वसतिगृहांमध्येही ही समस्या निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अकोल्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला समाज कल्याण आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयाकडून तातडीने गॅस पुरवठा करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. मात्र बुधवारी पत्र देऊनही दोन दिवस उलटून गेले तरी त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
विद्यार्थींच्या भोजन व्यवस्थेत कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी वसतिगृहांना तातडीने गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आता होत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 10:49:3858
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 10:47:2529
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 10:23:0779
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 13, 2026 10:20:05108
Report
KJKunal Jamdade
FollowMar 13, 2026 10:19:1843
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 10:18:30184
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 10:07:41109
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 10:01:56117
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 09:54:46183
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 09:54:08158
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 09:35:56127
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 13, 2026 09:33:41159
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 09:16:46196
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 13, 2026 09:06:00145
Report