Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

श्रीरामपूर में कांग्रेस जिल्हा अध्यक्ष अपहरण-मारहाण: मुख्य आरोपी चंद्रशेखर गिरफ्तार

KJKunal Jamdade
Nov 26, 2025 10:20:23
Shirdi, Maharashtra
काँग्रेस जिल्हाध्यक्ष अपहरण व मारहाण प्रकरण... सचिन गुजर यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.. अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल.. मुख्य आरोपी चंद्रशेखर ( चंदू ) आगे सह दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने पोलिसांनी केली जप्त.. व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता तपासून पुढील कारवाई केली जाईल.. बाईट - नितीन देशमुख, पोलिस निरीक्षक, श्रीरामपूर शहर...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Nov 26, 2025 10:34:34
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगड जिल्‍हयात शिवसेना – राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमधील संघर्ष सुरूच रायगड जिल्‍ह्यात शिवसेना – राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमधील संघर्ष सुरूच राष्‍ट्रवादी कॉंग्रेस सोडून शिवसेनेत गेलेल्यां महसळयातील नगराध्‍यक्षांसह नगरसेवकांची स्वागत रॅली मंत्री भरत गोगावले, जिल्‍हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत रॅली शिवसेनेत गेलेल्‍या नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध महसळा बाजारपेठेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेधाचे फलक, रॅलीला दाखवले काळे झेंडे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी शिवसेना-राष्ट्रवादीतील संघर्षामुळे तणावाचे वातावरण महसळा बाजारपेठेत मोठा पोलिस बंदोबस्त काही दिवसांपूर्वी महसळा नगरपंचायतीत घडले होते सत्‍तांतर नगराध्‍यक्ष आणि राष्ट्रवादीचे 7, कॉंग्रेस आणि ठाकरेगटाच्‍या एके नगरसेवकाने केला होता शिवसेना शिंदे गटात प्रवेश
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 26, 2025 10:34:12
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - सांगलीमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे मिरज या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचा प्रशासनाकडून संविधान दिन व वंदे मातरम गीतला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला.या निमित्ताने खासदार विशाल पाटील,आमदार सुरेश खाडे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम पार पडला,यावेळी देशभक्तीवरील कार्यक्रम सादर करण्यात आली.या निमित्ताने उपस्थितांनी संविधान शपथ देखील घेतली.मिरज शहरातल्या पोलीस स्टेशनसमोर हा कार्यक्रम संपन्न झाला,यामध्ये मिरज शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते。
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 26, 2025 10:21:59
96
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 26, 2025 10:20:50
111
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 26, 2025 10:09:22
Nanded, Maharashtra:एव्हढा पैसे कश्याला पाहिजेत, भाकरी खाता की पैसे खाता ऐसी खोचक टीका मंत्री संजय शिरसाठ यांनी माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर केली. चव्हाण यांनी मात्र यावर बोलणे टाळले. नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारणी मंडळी एकमेकांवर वैयक्तिक टीका करताना दिसताहेत. नगरपालिका निवडणूکی मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे आता नेतेमंडळीच्या टिकेला धार येताना दिसत आहे. एकमेकांच्या कुटुंबावर टीका होताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचा मतदार संघ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील भोकर मध्ये काल सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची जाहीर सभा झाली. शिरसाठ यांनी अशोक चव्हाण यांच्या वडिल दिवंगत शंकराराव चव्हाण यांच्यावर टीका केली. शंकरराव चव्हाण नांदेडला लंडन बनवणार असे म्हणायचे पण मला तसे काही दिसले नाही असे शिरसाठ म्हणाले. तर अशोक चव्हाण यांना एवढ्या एजंसी कश्याला पाहिजेत. एव्हढा पैसा कश्याला पाहिजे भाकरी खाता की नोटा अश्या शब्दात शिरसाठ यांनी टीका केली. संजय शिरसाठ यांच्याकडे जे आहे ते सगळ्यांना माहित आहे. मैं प्रामाणिकपने काम करतो हरामाचा पैसा खात नाही असेही शिरसाठ म्हणाले. शिरसाठ यांनी अशोक चव्हाण यांच्या वडिलांसह त्यांच्यावरही टीका केली असताना चव्हाण यांनी मात्र बोलणे टाळले. नंतर बोलतो म्हणून चव्हाण निघून गेले. अशोक चव्हाण यांनी बोलणे टाळले असले तरी यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबदास दानवे आणि भाजपाने शिरसाठ यांना प्रतिउत्तर दिले. रुममध्ये हातात सिगारेट आणि नोटांनी भरलेली बॅग भरून असलेल्या व्हिडीओ सर्वानी पाहिलाय त्यांना असे बोलण्याचा नैतिक अधिकार आहेका असा सवाल अंबादास दानवे आणि भाजपचे नांदेड जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी उपस्थित केला. अंबादास दानवे (दानवे यांचा byte संभाजीनगर च्या आजच्या पीसी मध्ये आहे) नगरपालिका निवडणुकीचे वातावरण आता तापताना दिसू लागले आहे. त्यात नेतेमंडळी व्ययक्तिक टीका करून भर घालताहेत. आता मतदानाला काही दिवस शिल्लक आहेत तेव्हा आणखी कोणता नेता काय बोलतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
71
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 26, 2025 09:33:25
169
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 26, 2025 09:01:02
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महानगरपालिका और बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज भारतीय संविधान गौरव दिन, तसेच अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून संविधान मिरवणूक सुरू करण्यात आली ही मिरवणूक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालय पर्यंत काढण्यात आली, यावेळेस सामूहिक उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला के डी एम सी आयुक्त अभिनव गोयल, सह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच आंबेडकरी जनता देखील उपस्थित होते, यावेळेस आयुक्त अभिनव गोयल यांनी बाबासाहेब आंबेडकर उद्यान विस्तारीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी जागा वाढवून देण्याची मागणी पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले.
142
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 26, 2025 08:58:14
Akola, Maharashtra:अकोल्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीपासून नगरपरिषदेमध्ये झालेल्या बदलाने स्थानिक नागरिकांचे आयुष्य बदलले की नाही माहित नाही पण श्रेय कोणाचे यावर मात्र राज्याच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये जोरदार राजकीय कुस्ती रंगलेली पाहायला मिळाली.. काल हिवरखेड येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम शब्दांत दावा केला ,“हिवरखेड ग्रामपंचायत ही नगरपालिका करण्यातलं सर्वात मोठं पाऊल गेल्या 10 वर्षांत आम्हीच उचललं” म्हणजे नगरपरिषदेचा दर्जा मिळवून देण्याचे श्रेय आम्हालाच ,असा संदेशच त्यांनी दिला होता.मात्र आज अकोटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कमी न पडता थेट पलटवार केला.“हिवरखेड नगरपालिका होण्यासाठी आमदार Amol मिटकरी यांच्यामार्फत आम्हीच पुढाकार घेतला". आता दोन्ही नेत्यांचे दावे ऐकून हिवरखेडकरांचा एकच प्रश्न आहे ते म्हणजे नगरपालिका झाली खरी पण श्रेय कुणाला द्यायचं?”महायुतीतच या मुद्द्यावर श्रेयवादाची लढाई तापली असून स्थानिक जनता मात्र गोंधळलेली. कोणी म्हणतं “हिवरखेडला नगरपालिका मिळाली ही चांगली गोष्ट… पण या दोन्हांच्या भांडणामुळे आमचं मनोरंजन पक्कं होतंय”अखेर, फडणवीस की पवार ? नगरपरिषदेचं ‘श्रेय सिंहासन’ कोणाला मिळणार? यावर राजकीय रंगमंचावर सध्या रोमांचक रंगतदार मैफल रंगली आहे.
121
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 26, 2025 08:48:03
Nashik, Maharashtra:भगूर सावरकरांचे जन्मस्थान भगूर नगरपरिषद निवडणूक बनली हॉट.. शिंदे गटाविरोधात सर्वपक्ष एकवटले.. अँकर सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगूरमध्ये सध्या नगरपरिषदेच्या निमित्ताने राष्ट्रवादी आणि शिंदे सेना झुंजत आहे. विशेष म्हणजे भाजपने इथे नगराध्यक्षपदासाठी पुरोगामी राष्ट्रवादीला पुढे केले आहे. महायुतीतील घटक पक्षांना महाविकास आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात थेट पाठिंबा दिल्याने भगूर लक्षवेधी निवडणूक ठरते आहे. गेल्या तीन दशकोंांपासून नाशिकच्या भगूर नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता खांद्यावर मिरवणारे विजय करंजकर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कट्टर चेहरा. आता विधानसभेपासून शिंदे सेनेत गेल्याने या निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या उमेदवार अनिता विजय करंजकर निवडणुकीत उतरल्यात. ही अबाधित सत्ता टिकविण्याविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप, मनसे आणि महाविकास आघाडी असे सर्वच पक्ष एकवटलेयात. त्यामुळे शिंदे सेनेन ही निवडणूक प्रतिष्ठेची करत आपल्या मंत्र्यांना मैदानात उतरविले आहे. भाजपाने सावरकरांच्या या नगरीत थेट अजित पवार गटाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे यांना पाठींबा दिलाय. त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदार सरोज आहिरे आणि शिंदे शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेचा विषय बनली आहे, विधानसभा निवडणुकीतही हे दोन्ही नेते आमने सामने आले होते, वैयक्तिक पातळीवर एकमेकांकडून टिकाटिप्पणी सुरू होती. सध्या या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार रॅली काढत भगूरमध्ये शक्ती प्रदर्शन केले जात असून आठवडे बाजार सारखी गर्दीची ठिकाणेही sध्या प्रचाराचं मैदान बनले आहे. राज्यात भगूर हे सावरकर प्रेमी आणि हिंदू संघटना यांचे पूज्य स्थान आहे. आता या नगरीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
106
comment0
Report
Advertisement
Back to top