Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

headline

KJKunal Jamdade
Mar 04, 2026 06:20:23
Shirdi, Maharashtra
साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष सुरेश हावरे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साई चरणी 6 सुवर्ण ‘ॐ’ अक्षर अर्पण केलेत.. 309 ग्रॅम वजनाच्या या सुवर्ण दानाची किंमत 46 लाख 9 हजार इतकी आहे.. आकर्षक नक्षीकाम असलेली ही ‘ॐ’ अक्षरे साईबाबांच्या मूर्तीमागील भिंतीवर बसवण्यात आली आहेत.. साईबाबा संस्थानच्या वतीने सुरेश हावरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आलाय..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
DPdnyaneshwar patange
Mar 04, 2026 07:48:29
Dharashiv, Maharashtra:मराठवाड्यातील शेतकरी बेकायदा अफू शेतीकडे वळत असल्याचं चित्र समोर येत आहे. फेब्रुवारी महिन्यात धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यांत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अफू शेतीवर कारवाया केल्या आहेत. काही ठिकाणी कांद्याच्या पिकामध्ये लपवून अफूची लागवड झाली असल्याचे उघड झाले. या कारवायांमुळे मराठवाड्यात बेकायदा अफू शेतीचे जाळे वाढतेय का? मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये शेतीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे काही शेतकरी बेकायदा अफू शेतीकडे वळत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. फेब्रुवारी महिन्यात धाराशिव जिल्ह्यात नऊ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल 800 ते 900 किलो अफू जप्त झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पोलिसांनी अफू शेतीवर कारवाई करत 3 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. बीड जिल्ह्यात पिंपळनेर येथे कांद्याच्या पिकामध्ये अफूची लागवड उघडकीस आली, 42 किलो अफूची बोंडे जप्त, किंमत 10 लाख 50 हजार रुपये. शेतकरी विशाल इतापे अटक. हिंगोली जिल्ह्यात दोन मोठ्या कारवायांमध्ये 10 क्विंटल अफू मूर्तीजापुर सांगवी शिवारात जप्त; शिरळी गावात 2.5 क्विंटल अफू जप्त. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकारी म्हणतात की कृषी पिकांना योग्य दर न मिळाल्याने शेतकरी अफू शेतीकडे वळत असल्याची शक्यता. NDPS कायद्यांतर्गत कठोर शिक्षा होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. मराठवाड्यात वाढणाऱ्या या कारवायांमुळे घटना अंधारात नाही—खरं शेतकरी अफू शेतीकडे वळत आहेत का, याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 04, 2026 07:31:46
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 04, 2026 07:21:15
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 04, 2026 07:18:20
Baramati, Maharashtra:इंदापूर-बारामती पालखी महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात ग्रामस्थांचा रास्ता रोको... इंदापूर-बारामती महामार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे आतापर्यंत २५ हून अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तरीदेखील पालखी महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर गोखळी गावातील तरंगवाडी व सरस्वती नगर येथील ग्रामस्थांनी एकत्र येत पालखी महामार्ग रोखून आंदोलन केले. महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे, सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात आणि पुढील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच इंदापूरचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रश्नात लक्ष घालून काम लवकर पूर्ण करावे.. अशी मागणीही करण्यात आली आहे....
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 04, 2026 07:02:26
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिलेतील लोहारडोंगरी खाण परवानगीचा प्रश्न पेटणार, बंडू धोतरे यांचा 5 मार्चपासून अन्नत्याग सत्याग्रह, ‘लोहारडोंगरी’ खाण प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी रद्द करण्याची मागणी, मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या प्रलंबित सोळा मागण्याही रेटणार. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अत्यंत महत्त्वाच्या भ्रमणमार्गात प्रस्तावित असलेल्या लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी; जिल्ह्यातील मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारण्यासाठी प्रलंबित १६ मागण्या व उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे 5 मार्चपासून अन्नत्याग सत्याग्रह करणार आहेत. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) वनविभाग मार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे. चांद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागातील लोहारडोंगरी कक्ष क्रमांक ४३९ मधील हा प्रस्तावित प्रकल्प ताडोबाच्या पूर्वेकडील महत्त्वाच्या कॉरिडॉरमध्ये आहे. या खाणीमुळे आधीच तीव्र असलेला ‘मानव-वन्यप्राणी संघर्ष’ खाणकाम आणि वाहतुकीमुळे जंगलाचे विखंडन होऊन अधिक तीव्र होणार आहे. ताडोबा च्या पूर्व आणि उत्तर दिशेकडील जंगलाना जोडणारे वन्यप्राणी भ्रमणमार्ग विखंडित होण्याचा धोका आहे. ३५.९५ हेक्टर जंगलाच्या मधोमध असलेल्या समृद्ध वन क्षेत्रातील १८,०२३ मोठ्या वृक्षांची कत्तल केली जाणार असून या क्षेत्रातील वाघ, बिबट्या, अस्वल यांसह ६० प्रकारच्या वन्यजीव अधिवासावर गदा येणार आहे. परिसरातील जल, वायू प्रदूषण वाढीसोबत, येथील मुख्य अर्थव्यवस्था असलेली शेती उद्योग प्रभावित होणार असल्याने खाणीला टोकाचा विरोध केला जात आहे. मागील दीड दशकभरापासून इको-प्रो संस्थेने केलेली आंदोलने आणि पाठपुराव्यानुसार जिल्ह्यातील मानव -वन्यप्राणी संघर्ष निवारणाच्या 16 प्रलंबित मागण्यांही रेटून धरल्या जाणार आहेत.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 04, 2026 06:46:42
Nagpur, Maharashtra: राज्यसभेसाठी भाजपकडून मायाताई इवनाते यांचे नाव निश्चित मानले जातेय..... मायाताईना आदिवासी महिला या नात्याने नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाते यांचे नाव पुढे असल्याची माहिती. अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगाच्या माजी सदस्या (नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड ट्राईब्स) राहिल्या असून अलीकडेच नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत पुन्हा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या आहेत.त्यांना कालच मुंबईला बोलावून घेतले आहे. आदिवासी समाजातूनystateसभेसाठी महिला उमेदوار देण्याचे महाराष्ट्रातील भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्याने त्यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे मानले जाते.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 04, 2026 06:30:33
Malegaon, Maharashtra:मालेगावातून हजारपेक्षा अधिक मुस्लिम भाविक उमराह सौदीमध्ये... इराण - इस्राईल युद्धामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.. सर्व भाविक सुखरू; लवकरच मायदेशी परततील.. नाशिकच्या मालेगावातून उमराह यात्रेसाठी गेलेल्या सुमारे 1 हजारपेक्षा जास्त मुस्लिम भाविक सौदीला गेले आहेत.त्यात इराण - इस्राईल युद्धामुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता बढ़ली आहे.मालेगावच्या विविध ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून ही भाविक उमराह यात्रेसाठी गेले आहेत.वास्तविक उमराह यात्रा रमजान महिन्यात असते.तिचा कालावधी अद्याप पूर्ण झाला नाही हे सर्व भाविक सुखरूप आहेत.अल्लाहच्या इबादतमध्ये मग्न आहे. आम्ही त्यांच्या सतत संपर्कात आहोत.20 टक्के भाविकांची यात्रा संपली मात्र तेही सुखरूप आहेत.त्यांची खाण्याची व राहण्याची व्यवस्था होत आहे.प्रशासनाकडून उमराह यात्रेसाठी गेलेल्या भाविकांची माहिती घेतली जास्त आहे.त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.चिंता करण्याचे कुठलेही कारण नसल्याचे ट्रॅव्हल कंपनीकडून सांगण्यात येते आहे.लवकरच युद्ध संपेल आणि हे सर्व भाविक भारतात परतील अशी दुवाही केली जात आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 04, 2026 06:19:51
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीकरांसाठी मोठा दिलासा! ठाणे प्रवास आता केवळ २० रुपयांत. kjडीएमटी ने केली डोंबिवली ठाणे बस सेवा सुरु..डोंबिवलीकरांना मिळणार मोठा दिलासा. काही लोकांना गुदगुल्या होतील विरोधकांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा टोळा डोंबिवलीतून रेल्वे ने दरोरोज लाखो प्रवास करतात रोजची गर्दी आणि या गर्दीमुळे महिन्यातून एक दोन प्रवासी लोकल मधून पडून मृत्यू होतं आहे अखरे केडीएमटी ने डोंबिवली मोठागाव – स्वामीनारायण सिटी ते ठाणे अशी नवीन बस सेवा आज पासून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या उपस्थिती मध्ये सुरू करण्यात आली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या च्या मार्ग क्रमांक ८२ अंतर्गत ही सेवा सुरू झाली असून फक्त २० रुपयांत आणि दर तासाला फेरी अशी ही किफायतशीर सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या बसचे उद्घाटन आणि भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या वाढदिवसाचा योग एकाच दिवशी असून काही लोकांना गुदगुल्या होतील अशी टीका रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांवर टीका केल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. साऊंड बाईट.. रवींद्र चव्हाण बाईट.. दिपेश म्हात्रे नगरसेवक बाईट..डोंबिवलीकर प्रवासी
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 04, 2026 06:03:00
Nagpur, Maharashtra:On SBL Blast Enquiry * नागपूर जवळ एसबीएल कंपनीत स्फोट झाला. त्यात १९ कामगारांचा मृत्यू झाला. अनेक महिला गंभीर जखमी. बारुद कंपन्यांमध्ये वारंवार अशा घटना घडतात. * या प्रकरणात एसबीएल कंपनीचे मालक फरार आहे. पोलीसांनी लवकरात लवकर त्यांना अटक करावी. * ११ जणांनी अटक केलीय. मालकाला अटक करावी On Rajyasabha Election *राज्यसभेबाबत शरद पवार साहेब काही बोलले नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल.. सहा तारखेला वेळ आहे. महाविकास आघाडीचे नेते ठरवतील On paper leak * पेपरफुटी प्रकरणा शिक्षक आणि संस्थेचे लोक सहभागी. चौकशी व्हावी. दोषींवर कारवाई व्हावी On Grapes / Onion * कांदा आणि द्राक्ष आखाती देशात जातात. युद्ध सुरू असल्याने हा माल पडून आहे. केंद्र सरकार याकडे लक्ष देऊन आहे. योग्य तो पाठपुरावा करतील...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 04, 2026 05:47:53
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरातील शाहू मिल हस्तांतरणाबाबत उद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीला कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमोल महाडिक उपस्थित असणार आहेत. शाहू मिलच्या जागेवर पुन्हा सूतगिरणीचे काम सुरू करा अशी मागणी कोल्हापूरातील सर्वपक्षीय समितीने केली आहे. शाहू महाराजांनी संस्थानकालात नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी स्वतःच्या खर्चातून शाहू मिल सुरू केली. या मिलच्या माध्यमातून 1100 लोकांना रोजगार मिळत होता. पण कालंंतराने हे मिल बंद पडली. त्यानंतर या जागेवर शाहू महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. पण तेही न झाल्याने शाहू मिलच्या जागेवर पुन्हा पुन्हा सूतगिरणीचे काम सुरू करा अशी मागणी कोल्हापूरकर करत आहेत. या संदर्भात मंत्रालयात काय निर्णय होतो याकडे सर्व कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Mar 04, 2026 05:45:43
Mumbai, Maharashtra:Sanjay Raut ही जागा महाविकास आघाडीची एकत्र आहे आणि ती जागा एकत्र असेल तर निवडणून येईल .. शिवासेना मोठा पक्ष आहे आता एकत्र राहणं गरजेचं आहे .. उद्या महत्त्वाचा दिवस आहे .. काल जयंत पाटीला आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे आज संध्याकाळ पार्यंत निर्णय होईल .. चर्चा झाली आहे .. दिल्लीचा कोंग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची चर्चा होणार आहे .. एकचं उमेदवार उभा राहिल आणि ती एकत्र चर्चा करूण राहिल … एकादा देशाच्या राष्ट्रप्रमुखांनची हात्या होते .. पण ते शिस्टातार पाळ गेले आहे का …तुम्ही अनेक फोन केले .. मात्र ज्या देशावर एवढा मोठा हाल्ला झाला तिथे तुम्ही काय बोलात का .. पाकिस्तानमध्ये ही अनेक गोष्टी घडल्या तेव्हा condolence देतात मग आता काय नाही … प्रकाश आंबेडकर यांचे अंतराष्ट्रीय स्थरावर कनेक्शन असतील … पृथ्वीराज चव्हाण यांनी या गोष्टी लोकांनसमोर आणल्या .. Epstein file मधलं लक्ष उढलं पाहिजे आणि काही राष्ट्रीय अध्यक्षांनी एकत्र येऊन हा गाठ धाडसी आहे का .. भारताल्या राजकारणी लोकांची ही नावं आहेत .. इजराइल अमेरिका इराण यांनी ही युद्ध मांडळ आहे का ? कोंग्रस् प्रमुख पक्ष आहे .. या युद्धा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केले पाहिजे .. कोणी काय करावं हे त्यांचा प्रश्न आहे .. नेहरूच पराष्ट्रा दौरण हे संपलं आहे का .. पण तुम्हीच शोख का नाही व्यक्त केला आहे .. हे युद्ध जास्त चालेल .. अमेरिकेला अफगाणистан वरूण पळाव लागेल .. आता त्यांना कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे आणि आत्ता त्यांची चुक झाली आहे हे ही त्यांना वाटत आहे .. हा युध्द जास्त चालणार आहे … स्पेन आणि ब्रिटन यांनी ही नाही सांगितलं आहे … आदित्य ठाकरे कुठे चुकले का ? ते बोले … बरोबर आहेत .. तणाव वाढला आहे .. अस काही नाही आहे राज ठाकरे यांची भेट घेऊ .. एवढं तुम्ही ताणू नका .. आम्ही एकत्र आहोत ..
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top