Back
चंद्रपुर के लोहारडोंगरी खदान पर वन्यजीव सुरक्षा समेत 16 मांगों पर आंदोलन तेज़
AAASHISH AMBADE
Mar 04, 2026 07:02:26
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिलेतील लोहारडोंगरी खाण परवानगीचा प्रश्न पेटणार, बंडू धोतरे यांचा 5 मार्चपासून अन्नत्याग सत्याग्रह, ‘लोहारडोंगरी’ खाण प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी रद्द करण्याची मागणी, मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या प्रलंबित सोळा मागण्याही रेटणार. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अत्यंत महत्त्वाच्या भ्रमणमार्गात प्रस्तावित असलेल्या लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी; जिल्ह्यातील मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारण्यासाठी प्रलंबित १६ मागण्या व उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे 5 मार्चपासून अन्नत्याग सत्याग्रह करणार आहेत. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) वनविभाग मार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे. चांद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागातील लोहारडोंगरी कक्ष क्रमांक ४३९ मधील हा प्रस्तावित प्रकल्प ताडोबाच्या पूर्वेकडील महत्त्वाच्या कॉरिडॉरमध्ये आहे. या खाणीमुळे आधीच तीव्र असलेला ‘मानव-वन्यप्राणी संघर्ष’ खाणकाम आणि वाहतुकीमुळे जंगलाचे विखंडन होऊन अधिक तीव्र होणार आहे. ताडोबा च्या पूर्व आणि उत्तर दिशेकडील जंगलाना जोडणारे वन्यप्राणी भ्रमणमार्ग विखंडित होण्याचा धोका आहे. ३५.९५ हेक्टर जंगलाच्या मधोमध असलेल्या समृद्ध वन क्षेत्रातील १८,०२३ मोठ्या वृक्षांची कत्तल केली जाणार असून या क्षेत्रातील वाघ, बिबट्या, अस्वल यांसह ६० प्रकारच्या वन्यजीव अधिवासावर गदा येणार आहे. परिसरातील जल, वायू प्रदूषण वाढीसोबत, येथील मुख्य अर्थव्यवस्था असलेली शेती उद्योग प्रभावित होणार असल्याने खाणीला टोकाचा विरोध केला जात आहे. मागील दीड दशकभरापासून इको-प्रो संस्थेने केलेली आंदोलने आणि पाठपुराव्यानुसार जिल्ह्यातील मानव -वन्यप्राणी संघर्ष निवारणाच्या 16 प्रलंबित मागण्यांही रेटून धरल्या जाणार आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 09:46:390
Report
PNPratap Naik1
FollowMar 04, 2026 09:33:170
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 09:33:020
Report
ABATISH BHOIR
FollowMar 04, 2026 09:02:350
Report
AKAMAR KANE
FollowMar 04, 2026 08:48:070
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 04, 2026 08:47:180
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 04, 2026 08:32:350
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 04, 2026 08:31:580
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 04, 2026 08:18:380
Report
PNPratap Naik1
FollowMar 04, 2026 08:00:320
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 04, 2026 07:51:370
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 04, 2026 07:48:290
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 04, 2026 07:31:460
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 04, 2026 07:21:150
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 04, 2026 07:19:010
Report
