Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

युद्ध के कारण महाराष्ट्र मंडियों में प्याज के दाम 750-1000 प्रति क्विंटल

SKSudarshan Khillare
Mar 04, 2026 07:21:15
Yeola, Maharashtra
आखाती देशातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठांवर झाला असून कांद्याची निर्यात ठप्प असल्याने नाशिकच्या येवला, लासलगाव, चांदवड, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर हे कोसळले आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांची अपेक्षा असताना कांदा केवळ 750 ते 1000 रुपये प्रतीक्विंटल दराने विकला जात आहे त्यात होळीच्या सुट्ट्यांमुळे मार्केट तीन दिवस बंद होते त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे या संदर्भात कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Mar 04, 2026 09:02:35
Kalyan, Maharashtra:KDMC मुख्यालयाबाहेर डॉक्टर-नर्सेसचे कामबंद आंदोलन. चार महिन्याचा पगार दिलाने काम बंद आंदोलन. आमचा घर कसे चालणार, आमचे घराचे हप्ते कसे फेडणार.. कल्याण डोंबिवलीकरांसाठी धक्कादायक बातमी… कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाबाहेर डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू करत कामबंदचा इशारा दिला आहे. तब्बल चार महिन्यांचा पगार थकीत असल्याचा आरोप करत प्रशासन आणि लोकप्रतिनिधीजवर संताप व्यक्त करण्यात आला. जवळपास २५० ते ३०० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले असून आरोग्य सेवेवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली शहरातील आरोग्य व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली है. राष्ट्रीय आरोग्य अभियान अन्तर्गत कार्यरत कंत्राटी डॉक्टर, नर्सेस, सिस्टर्स और अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केडीएमसी मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन छेडले आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मागील चार महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालेले नाही. वारंवार महानगरपालिकेला पत्रव्यवहार करूनही कोणताही ठोस निर्णय घेता आला नाही. आंदोलनाच्या वेळी एका कर्मचाऱ्यांना चक्कर देखील आल्याने संताप व्यक्त केला गेला. “अनेक वर्षांपासून आम्ही नागरिकांची सेवा करत आहोत. मात्र चार महिन्यांपासून पगार नाही. बँकेचे हप्ते, घरखर्च, औषधे – हे सगळं कसं भागवायचं?” महापौरांनी “माहिती नाही” असे उत्तर दिल्याने नाराजी पसरली. “गरज असते तेव्हा आरोग्य shibirांसाठी आम्हाला रात्रंदिवस रस्त्यावर उभं केलं जातं, पण आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातं,” आंदोलनकर्त्यांनी कहा. केडीएमसीच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना मुंबईकडे पाठवले जात असल्याची परिस्थिती आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांनीही कामबंद आंदोलन सुरू केलं असून आरोग्य सेवा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 04, 2026 08:48:07
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 04, 2026 08:47:18
Akola, Maharashtra:अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय येथे कार्यरत असताना शासनाची रक्कम भरण्यास विलंब झाल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालय लोहो, जि. यवतमाळ येथील सहाय्यक अधीक्षक प्रमोद देंगे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. शासनाच्या कामासाठी खर्च झालेल्या रकमेसंदर्भात सविस्तर स्पष्टीकरण व आवश्यक कागदपत्रे सादर करूनही आपल्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा दावा देंगे यांनी केला आहे. १५ सप्टेंबर २०२५ पासून वेतन व निर्वाहभत्ता न मिळाल्याने आपली आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ४ लाख ५१ हजार आणि ४२ हजार रुपये अशी एकूण रक्कम अद्याप परत मिळाली नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. चौकशी अहवाल न देणे, संगनमताने कारवाई करणे व पदाचा गैरवापर झाल्याचे आरोप करत त्यांनी निलंबन तात्काळ रद्द करून थकीत वेतन देण्याची मागणी केली आहे.दरम्यान, आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आज अकोल्यातील आरोग्य उपसंचालक कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत आंदोलन थांबवले. या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 04, 2026 08:32:35
Amravati, Maharashtra:संघर्ष करणार मेरे लिये नई बात नही... मै किसी भी मोड से सुरुवात कर सकती हुं; राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने नवनीत राणांचं व्हाट्सअप स्टेटस चर्चेला अँकर :- भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपने महाराष्ट्रातून चार जागी आपली उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे मात्र या यादीत माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव नसल्याने नवनीत राणा यांचे व्हाट्सअप स्टेटस चर्चेचा विषय ठरले आहे. संघर्ष करणार मेरे लिये नई बात नही... मै किसी भी मोड से सुरुवात कर सकती हुं असे म्हणत नवनीत राणा यांनी व्हाट्सअप स्टेटस ला एक व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामुळे नवनीत राणांच्या या व्हाट्सअप स्टेटस ची सध्या जोरदार चर्चा असल्याचा पाहायला मिळत आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 04, 2026 08:31:58
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 04, 2026 08:18:38
Ahilyanagar, Maharashtra:सुजय विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे या निवडीनंतर पहिल्यांदाच नगर शहरात आलेल्या सुजय विखे यांनी पक्ष संघटन मजबूत करणार असल्याचे म्हटला आहे भाजप हा सर्वदूर विस्तारलेला पक्ष आहे यात नव्याने वाढ करण्याची फारशी आवश्यकता नाही पक्ष वाढीपेक्षा पक्षातील कार्यकर्त्यांना समाधानी ठेवणं आणि न्याय देण यावर भर देणार असल्याचं विखे म्हणाले आहेत बाइट:- सुजय विखे पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे ऑन पोटनिवडणूक अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर आता लवकरच पोटनिवडणूक लागणार आहे. यासाठी शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा मात्र या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे तशा भावना त्यांनी माझ्यापाशी मांडल्या असून त्या मी वरिष्ठांना कळवल्याचं सुजय विखे यांनी म्हटलं आहे. सोबतच बारामती आणि राहुरी विधानसभेची पòtनिवडणूक एकाच वेळी लागणार असून दोन्ही ठिकाणी अकाली निधनाने मृत्यू झाला आहे. या निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीत सामंजस्याने तोडगा काढून या निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भावना सुजय विखे यांनी व्यक्त केली आहे. बाइट:- सुजय विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 04, 2026 08:00:32
Kolhapur, Maharashtra:Anc: येत्या 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन आहे. तत्पूर्वी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम पूर्ण करावे अशी मागणी कोल्हापुरातील रंगकर्मीनी कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांच्याकडे केली आहे. महापौर रुपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांनी आज केशवराव भोसले नाट्यगृहात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.. त्याचबरोबर 27 तारखेपर्यंत केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू अस आश्वासन दिले आहे. या संदर्भात कोल्हापूरातील रंगकर्मी आणि कोल्हापूरचे उपमहापौर अक्षय जरग यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. Play Choppal 1) प्रसाद जमदग्नी , कलाकार 2) किरणसिंह चव्हाण, नाट्य दिग्दर्शक 3) आनंद काळे, अभिनेते 4) अक्षय जरग, उपमहापौर कोल्हापूर महानगरपालिका
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 04, 2026 07:51:37
Manchar, Maharashtra:Anc: गेली काही दिवसापासून कांद्याचे बाजार भाव गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय, सध्या कांद्याला ८ ते १० रुपये किलो पर्यंतचा बाजारभाव मिळतोय मात्र हाच कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्याला प्रति किलोमागे 12 ते 13 रुपये पर्यंतचा खर्च येतोय त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा पिकातून तोटा सहन करावा लागत असलेल्या कारणाने शासनाने यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय तर शासनाच्या आयात निर्यात चुकीच्या धोरणामुळे कांद्याचे बाजार भाव वारंवार पडझड होत असल्याचं व्यापारी सांगत याचाच मंचर बाजार समितीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 04, 2026 07:48:29
Dharashiv, Maharashtra:मराठवाड्यातील शेतकरी बेकायदा अफू शेतीकडे वळत असल्याचं चित्र समोर येत आहे. फेब्रुवारी महिन्यात धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यांत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अफू शेतीवर कारवाया केल्या आहेत. काही ठिकाणी कांद्याच्या पिकामध्ये लपवून अफूची लागवड झाली असल्याचे उघड झाले. या कारवायांमुळे मराठवाड्यात बेकायदा अफू शेतीचे जाळे वाढतेय का? मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये शेतीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे काही शेतकरी बेकायदा अफू शेतीकडे वळत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. फेब्रुवारी महिन्यात धाराशिव जिल्ह्यात नऊ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल 800 ते 900 किलो अफू जप्त झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पोलिसांनी अफू शेतीवर कारवाई करत 3 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. बीड जिल्ह्यात पिंपळनेर येथे कांद्याच्या पिकामध्ये अफूची लागवड उघडकीस आली, 42 किलो अफूची बोंडे जप्त, किंमत 10 लाख 50 हजार रुपये. शेतकरी विशाल इतापे अटक. हिंगोली जिल्ह्यात दोन मोठ्या कारवायांमध्ये 10 क्विंटल अफू मूर्तीजापुर सांगवी शिवारात जप्त; शिरळी गावात 2.5 क्विंटल अफू जप्त. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकारी म्हणतात की कृषी पिकांना योग्य दर न मिळाल्याने शेतकरी अफू शेतीकडे वळत असल्याची शक्यता. NDPS कायद्यांतर्गत कठोर शिक्षा होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. मराठवाड्यात वाढणाऱ्या या कारवायांमुळे घटना अंधारात नाही—खरं शेतकरी अफू शेतीकडे वळत आहेत का, याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 04, 2026 07:31:46
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 04, 2026 07:18:20
Baramati, Maharashtra:इंदापूर-बारामती पालखी महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात ग्रामस्थांचा रास्ता रोको... इंदापूर-बारामती महामार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे आतापर्यंत २५ हून अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तरीदेखील पालखी महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर गोखळी गावातील तरंगवाडी व सरस्वती नगर येथील ग्रामस्थांनी एकत्र येत पालखी महामार्ग रोखून आंदोलन केले. महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे, सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात आणि पुढील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच इंदापूरचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रश्नात लक्ष घालून काम लवकर पूर्ण करावे.. अशी मागणीही करण्यात आली आहे....
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 04, 2026 07:02:26
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिलेतील लोहारडोंगरी खाण परवानगीचा प्रश्न पेटणार, बंडू धोतरे यांचा 5 मार्चपासून अन्नत्याग सत्याग्रह, ‘लोहारडोंगरी’ खाण प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी रद्द करण्याची मागणी, मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या प्रलंबित सोळा मागण्याही रेटणार. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अत्यंत महत्त्वाच्या भ्रमणमार्गात प्रस्तावित असलेल्या लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी; जिल्ह्यातील मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारण्यासाठी प्रलंबित १६ मागण्या व उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे 5 मार्चपासून अन्नत्याग सत्याग्रह करणार आहेत. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) वनविभाग मार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे. चांद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागातील लोहारडोंगरी कक्ष क्रमांक ४३९ मधील हा प्रस्तावित प्रकल्प ताडोबाच्या पूर्वेकडील महत्त्वाच्या कॉरिडॉरमध्ये आहे. या खाणीमुळे आधीच तीव्र असलेला ‘मानव-वन्यप्राणी संघर्ष’ खाणकाम आणि वाहतुकीमुळे जंगलाचे विखंडन होऊन अधिक तीव्र होणार आहे. ताडोबा च्या पूर्व आणि उत्तर दिशेकडील जंगलाना जोडणारे वन्यप्राणी भ्रमणमार्ग विखंडित होण्याचा धोका आहे. ३५.९५ हेक्टर जंगलाच्या मधोमध असलेल्या समृद्ध वन क्षेत्रातील १८,०२३ मोठ्या वृक्षांची कत्तल केली जाणार असून या क्षेत्रातील वाघ, बिबट्या, अस्वल यांसह ६० प्रकारच्या वन्यजीव अधिवासावर गदा येणार आहे. परिसरातील जल, वायू प्रदूषण वाढीसोबत, येथील मुख्य अर्थव्यवस्था असलेली शेती उद्योग प्रभावित होणार असल्याने खाणीला टोकाचा विरोध केला जात आहे. मागील दीड दशकभरापासून इको-प्रो संस्थेने केलेली आंदोलने आणि पाठपुराव्यानुसार जिल्ह्यातील मानव -वन्यप्राणी संघर्ष निवारणाच्या 16 प्रलंबित मागण्यांही रेटून धरल्या जाणार आहेत.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top