Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

पुणे में व्यापारी अपहरण मामले में संगमनेर पुलिस ने पांचों आरोपियों को गिरफ्तार किया

KJKunal Jamdade
Mar 11, 2026 05:06:14
Shirdi, Maharashtra
पुण्यातून एका व्यापाऱ्याचे अपहरण करून पसार झालेल्या टोळीला संगमनेर पोलिसांनी पकडले आहे.. संगमनेर तालुक्यातील नाशिक - पुणे महामार्गवरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर सापळा रचून पोलिसांनी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे.. या अपहरण प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतली असून 11 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.. पुणे जिल्ह्यातील काळेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून आरोपी चारचाकी गाडीतून आळेफाट्याच्या दिशेने येत असल्याची माहिती संगमनेर पोलिसांना मिळाली होती.. संगमनेर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू करत हिवरगाव पावसा टोलनाक्यावर सापळा रचला.. संशयित गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये उत्तर प्रदेशातील पाच तरुण संशयास्पद अवस्थेत आढळले.. पोलिसांनी आरोपींकडून दोन गावठी कट्टे, सहा जिवंत काडतुसे, पाच मोबाईल, एक मनगटी घड्याळ आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 11 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.. संगमनेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका झाली असून या कारवाईमुळे गुन्हेगार टोळीचा मोठा कट उधळला गेला आहे.. डॉ. कुणाल सोनावणे, उपविभागीय पोलिस अधिकारी, संगमनेर
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Mar 11, 2026 06:21:31
Solapur, Maharashtra:सोलापुरात घरगुती गॅस घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा सोलापुरातील रामवाडी परिसरातील गॅस गोडाऊनवर गॅस घेण्यासाठी लोकांची भली मोठी रांग इराण-इस्त्राईल युद्धच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवाड्याची भीती लोकांच्या मनात आहे पुढे गॅस मिळेल की नाही या भीतीने ग्राहकांची मोठी गर्दी आम्ही चार दिवसापूर्वी बुकिंग केले होते त्यानंतर आज आमचा नंबर आलाय. काही लोकांना ऑनलाईन बुकिंग नसल्याने घरी पाठवले जात आहे आम्ही दोन तासापासून रांगेत थांबलोय अजून नंबर आला नाही. ऑनलाईन बुकिंग केले तरी तें होत नाही त्यामुळे आम्ही गॅस टाकी घेऊन इथे आलोय. गॅस टाक्या उपलब्ध आहेत त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन आम्ही त्यांना करतोय. मात्र नागरिक गॅस टाक्या घेऊन थेट ऑफिसमध्ये येत आहेत.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 11, 2026 06:19:33
Kalyan, Maharashtra:अमेरिका–इराण संघर्षाच्या तणावाचे पडसाद आता थेट शेतकऱ्यांवर उमटताना दिसत आहेत. अमेरिका इराण संघर्षामुळे शेतमालाची निर्यात मार्गांवर परिणाम झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतमाल फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांना बसत आहे. कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भाज्या, फळे आणि इतर शेतमालाची आवक झाल्याने दर कोसळले असून शेतकरी आणि व्यापारीदोघेही चिंतेत आहेत. इस्रायल आणि इराण मध्ये युद्ध सुरू असलेल्या परिणाम आता कृषी क्षेत्रावरही दिसू लागला आहे. या तणावामुळे आंतरराष्ट्रीय निर्यातीत अडथळे निर्माण झाले असल्याने शेतकऱ्यांचा माल देशांतर्गत बाजारात येऊ लागला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भाज्या, फळे, फुले, कांदे आणि बटाट्यांची मोठ्या प्रमाणात आवक दिसत आहे. परंतु आवक वाढल्याने दर कोसळले असून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. कांदा 20 रुपयांना विकला जात होता; तो आता 12 ते 15 रुपयांपर्यंत घसरला. कलिंगड 40 रुपयांना विकले जाणारे आता 20 रुपयांपर्यंत घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बाजारात मालाचा साठा वाढल्याने ग्राहक कमी पडत आहेत. त्यामुळे काही व्यापाऱ्यांचा माल विकला न गेल्याने दुसऱ्या दिवशी तो सडण्याची वेळ येत आहे. ग्राहकाने पाठ फिरवली आहे. पालेभाज्या, फळे, मोठा साठा बाजार समितीतच पडून राहत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही नुकसान सहन करावे लागत.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 11, 2026 05:34:40
Varasoli, Maharashtra:रायगड जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी आज निवडणूक होत आहे. दुपारी 2 वाजता ही प्रक्रिया पार पडेल. यावेळी पंचायत समित्यांवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. उरण वगळता अन्य पंचायत समित्यांवर महायुतीमधील घटक पक्षांचे वर्चस्व आहे. उरण मध्ये महाविकास आघाडीचा सभापती होऊ शकतो. राखीव प्रवर्गातील सदस्य निवडून न आल्याने म्हसळा आणि श्रीवर्धनचे सभापती पद रिक्त राहणार असून नव्याने निवडून येणाऱ्या उपसभापतींकडे कार्यभार असणार आहे. म्हसळा पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती आणि श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 11, 2026 05:34:30
Nanded, Maharashtra:अवैध देशी दारू विरोधात गावकरी आक्रमक झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथे अनेक वर्षापासून अवैध देशी दारू विक्री सुरू आहे. या अवैध देशी दारू मुळे गावातील अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. लहान वयात मुलांना या देशी दारूचे व्यसन लागत आहे. गावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने गावकरी त्रस्त झाले होते. अखेर गावकऱ्यांनी एकत्र येत पोलिसांसमोरच अवैध देशी दारू विकणाऱ्यांवर धाड टाकली. पोलिसांना अवैध देशी दारू विकत असल्याचे गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. गावकऱ्यांनी तीनवेळा लेखी तक्रार करूनही पोलीसांनी काहीच कारवाई न केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. गावातील अवैध देशी दारू तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थानी केली.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 11, 2026 05:30:54
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 11, 2026 03:49:47
Dharashiv, Maharashtra:धाराशिव कळंब शहरात दोन गटांत तुफान दगडफेक; १० हून अधिक जखमी किरकोळ वादातून हाणामारी;शहरात तणावाचे वातावरण धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर तुफान दगडफेक आणि हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात राञी उशिरा हा प्रकार घडला असून या घटनेत दहा हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही वेळातच चिघळला आणि दोन्ही गटांतील तरुण आमने सामने येत एकमेकांवर दगडफेक करू लागले. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उचला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एका नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेरा कैद केला आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 03:49:06
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: ब्रेकिंग | दोन दिवसांत २८०० उद्योग, ९२० हॉटेल्स बंद पडणार केंद्र सरकारकडून कमर्शियल गैस पुरवठा बंद करण्याच्या निर्णयाचा परिणाम यात युद्धामुळे आखाती देशातून होणारा gas and crude oil पुरवठा बंद झाला. त्यामुळे केंद्र सरकारنے कमर्शियल गॅस पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन दिवसांत सुमारे २ हजार ८०० उद्योग आणि सुमारे ९२० हॉटेल्स बंद पडणार असल्याची माहिती सीएमआयएने मंगळवार पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये हॉटेल आणि उद्योग व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये आता सरकार काय भूमिका घेते आणि उद्योगांचे येणाऱ्या दिवसात काय निर्णय घेतल्या जातात ते पाहावे लागेल.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 11, 2026 03:48:56
Amravati, Maharashtra:अमरावतीत गॅस सिलेंडरचा तुटवडा; गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या रांगा, शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा अँकर :- आखाती देशातील युद्धाचा फटका आता भारतातील नागरिकांनाही बसताना दिसत आहे. अमरावती शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून शहरात गॅस एजन्सींना कमी प्रमाणात सिलेंडर पुरवठा होत असल्याने ग्राहकांना वेळेवर सिलेंडर घरी पोहोचत नसल्याने ग्राहक थेट आता गॅस एजन्सी समोरच सिलेंडर घेऊन मागणी करत आहे. सिलेंडर साठी ग्राहकाने मोठ्या प्रमाणात रांग लावल्याचे चित्र sध्या अमरावती शहरात आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने ग्राहकांची मात्र तारांबळ उडत आहे सोबतच गॅस एजन्सी धारकांनाही ग्राहकांच्या रोशाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सध्या शहरात मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाईट :- गॅस एजन्सी मॅनेजर
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 11, 2026 03:47:53
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 11, 2026 03:45:29
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 11, 2026 03:31:32
Shirdi, Maharashtra:व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे शिर्डीतील हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे.. पुढील दोन दिवस पुरेल इतकाच साठा हॉटेल व्यावसायिकांकडे शिल्लक आहे.. त्यातच गॅस कंपन्यांनी हात वर केल्याने, पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.. LPG गॅस अभावी हॉटेल व्यवसाय पूर्णतः कोलमडण्याची भिती असून, याचा फटका साईभक्तांना देखील बसणार आहे.. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे देवस्थान असून, साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक शिर्डीत येतात.. शिर्डीत जवळपास 400 छोटी मोठी हॉटेल रेस्टॉरंट आहेत.. एचपी, भारत, इंडियन, गो गॅस अशा विविध कंपन्यांच्या माध्यमातून महिन्याला साधारण 6 हजार व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण शिर्डीमध्ये होते.. मात्र अमेरिका - इराण युद्धामुळे शासनाने व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण बंद केल्याने त्याचा मोठा फटका शिर्डीतील हॉटेल व्यवसायाला बसला आहे.. पुढील दोन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा व्यावसायिकांकडे शिल्लक असून गॅस कंपन्यांनी हात वर केल्याने शिर्डीतल हॉटेल व्यवसाय कोलमडण्याची भिती आहे.. गॅस सिलेंडर अभावी हॉटेल रेस्टॉरंट बंद ठेवण्याची वेळ आल्यास त्याचा मोठा फटका हॉटेल चालकांसह साईभक्तांना बसणार आहे.. त्यातच रामनवमी उत्सव तोंडावर येऊन ठेपल्याने शिर्डीतील व्यायसायिकांची चिंता आणखी वाढली आहे..शिर्डीतील व्यावसायिकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी....
0
comment0
Report
Advertisement
Back to top