Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

अमेरिका-इस्रायल-ईरान तनाव से कल्याण के APMC बाजार में आवक बढ़ी, कीमतें गिरी

ABATISH BHOIR
Mar 11, 2026 06:19:33
Kalyan, Maharashtra
अमेरिका–इराण संघर्षाच्या तणावाचे पडसाद आता थेट शेतकऱ्यांवर उमटताना दिसत आहेत. अमेरिका इराण संघर्षामुळे शेतमालाची निर्यात मार्गांवर परिणाम झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतमाल फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांना बसत आहे. कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भाज्या, फळे आणि इतर शेतमालाची आवक झाल्याने दर कोसळले असून शेतकरी आणि व्यापारीदोघेही चिंतेत आहेत. इस्रायल आणि इराण मध्ये युद्ध सुरू असलेल्या परिणाम आता कृषी क्षेत्रावरही दिसू लागला आहे. या तणावामुळे आंतरराष्ट्रीय निर्यातीत अडथळे निर्माण झाले असल्याने शेतकऱ्यांचा माल देशांतर्गत बाजारात येऊ लागला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भाज्या, फळे, फुले, कांदे आणि बटाट्यांची मोठ्या प्रमाणात आवक दिसत आहे. परंतु आवक वाढल्याने दर कोसळले असून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. कांदा 20 रुपयांना विकला जात होता; तो आता 12 ते 15 रुपयांपर्यंत घसरला. कलिंगड 40 रुपयांना विकले जाणारे आता 20 रुपयांपर्यंत घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बाजारात मालाचा साठा वाढल्याने ग्राहक कमी पडत आहेत. त्यामुळे काही व्यापाऱ्यांचा माल विकला न गेल्याने दुसऱ्या दिवशी तो सडण्याची वेळ येत आहे. ग्राहकाने पाठ फिरवली आहे. पालेभाज्या, फळे, मोठा साठा बाजार समितीतच पडून राहत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही नुकसान सहन करावे लागत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Mar 11, 2026 07:49:14
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 11, 2026 07:45:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:आखाती देशातल्या युद्धाचा परीणाम थेट सांगलीच्या रिक्षा व्यावसायवर देखील झाला आहे. एलपीजी गॅस इंधनाचा तुटवडा नसला तरी वाढलेल्या गॅस दरामुळे एलपीजी वाहनधारक हैराण झाले आहेत, याशिवाय गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती देखील वाहनधारकांच्या मध्ये निर्माण झाल्याने एलपीजी गॅस पंपांवर आता वाहनांच्या विशेषता रिक्षाचा मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळतंय. 55 रुपया किलो मिळणारा गॅस आता आखाती देशातल्या युद्धाच्या स्थितीमुळे 80 रुपये इतका झाला आहे. तब्बल 25 रुपयांनी गॅसच्या दरात वाढ झाल्याने रिक्षा चालकांसमोर मोठे संकट उभे राहिला आहे त्याशिवाय गॅसचा तुटवडा होण्याची भीती देखील रिक्षाचालकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे रिक्षाचालक आता गॅस पंपांवर अर्धा -अर्धा तास थांबून गॅस भरत आहेत.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 11, 2026 07:06:54
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 11, 2026 07:03:22
Varasoli, Maharashtra:रायगढ़ जिला परिषद में सत्ता समीकरण का पेच हल गया? जिला परिषद में महायुति सत्ता? अध्यक्ष पद भाजपा के पास तो उपाध्यक्ष पद शिवसेना को मिल सकता है। राष्ट्रवादी और शिवसेना के संघर्ष के बाद वरिष्ठों ने मार्ग निकाला। तालुका स्तर पर पंचायत समितियों में भी महायुति के माध्यम से पद वितरण होगा। अंकर: रायगढ़ जिल्हा परिषद में सत्ता समीकरण का गत दिनों से चला आ रहा पेच सुलझने की可信 जानकारी है। रायगढ़ जिला परिषद में महायुति सत्ते में आने के संकेत दिख रहे हैं, ऐसी जानकारी सूत्रों ने दी है। पिछले कई दिनों से राष्ट्रवादी और शिवसेना महायुती के घटक दलों के बीच रायगढ़ जिला परिषद की सत्ता को लेकर संघर्ष बना हुआ था। दोनों पक्षों के बीच शब्दों के विवाद के बावजूद शीर्ष निर्णय होने की संभावना पर दोनों दलों के नेता आश्वस्त थे। कल अध्यक्ष पद के चुनाव होते हुए रायगढ़ में राष्ट्रवादी और शिवसेना के विवाद पर हल निकलने की सूचना आगे आई है। अभी तक किसी ने इसकी पुष्टि नहीं की है। लेकिन रायगढ़ जिला परिषद के अध्यक्ष पद भाजपा के पास और जितनी अधिक सीटें जीतने वाली शिवसेना को उपाध्यक्ष पद मिल सकता है। इसके साथ ही जिल्‍हे की पंचायत समितियों में भी सत्ते के पदों के वितरण की जानकारी है।
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 11, 2026 06:21:31
Solapur, Maharashtra:सोलापुरात घरगुती गॅस घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा सोलापुरातील रामवाडी परिसरातील गॅस गोडाऊनवर गॅस घेण्यासाठी लोकांची भली मोठी रांग इराण-इस्त्राईल युद्धच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवाड्याची भीती लोकांच्या मनात आहे पुढे गॅस मिळेल की नाही या भीतीने ग्राहकांची मोठी गर्दी आम्ही चार दिवसापूर्वी बुकिंग केले होते त्यानंतर आज आमचा नंबर आलाय. काही लोकांना ऑनलाईन बुकिंग नसल्याने घरी पाठवले जात आहे आम्ही दोन तासापासून रांगेत थांबलोय अजून नंबर आला नाही. ऑनलाईन बुकिंग केले तरी तें होत नाही त्यामुळे आम्ही गॅस टाकी घेऊन इथे आलोय. गॅस टाक्या उपलब्ध आहेत त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन आम्ही त्यांना करतोय. मात्र नागरिक गॅस टाक्या घेऊन थेट ऑफिसमध्ये येत आहेत.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 11, 2026 05:34:40
Varasoli, Maharashtra:रायगड जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी आज निवडणूक होत आहे. दुपारी 2 वाजता ही प्रक्रिया पार पडेल. यावेळी पंचायत समित्यांवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. उरण वगळता अन्य पंचायत समित्यांवर महायुतीमधील घटक पक्षांचे वर्चस्व आहे. उरण मध्ये महाविकास आघाडीचा सभापती होऊ शकतो. राखीव प्रवर्गातील सदस्य निवडून न आल्याने म्हसळा आणि श्रीवर्धनचे सभापती पद रिक्त राहणार असून नव्याने निवडून येणाऱ्या उपसभापतींकडे कार्यभार असणार आहे. म्हसळा पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती आणि श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 11, 2026 05:34:30
Nanded, Maharashtra:अवैध देशी दारू विरोधात गावकरी आक्रमक झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथे अनेक वर्षापासून अवैध देशी दारू विक्री सुरू आहे. या अवैध देशी दारू मुळे गावातील अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. लहान वयात मुलांना या देशी दारूचे व्यसन लागत आहे. गावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने गावकरी त्रस्त झाले होते. अखेर गावकऱ्यांनी एकत्र येत पोलिसांसमोरच अवैध देशी दारू विकणाऱ्यांवर धाड टाकली. पोलिसांना अवैध देशी दारू विकत असल्याचे गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. गावकऱ्यांनी तीनवेळा लेखी तक्रार करूनही पोलीसांनी काहीच कारवाई न केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. गावातील अवैध देशी दारू तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थानी केली.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 11, 2026 05:30:54
0
comment0
Report
Advertisement
Back to top