Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम में थकीत बिलों पर महावितरण ने बिजली काटना शुरू किया

GMGANESH MOHALE
Mar 11, 2026 03:47:53
Washim, Maharashtra
वाशीम: मार्च एंड जवळ आल्याने थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणने मोहीम तीव्र केली आहे. वाशिम जिल्ह्यात थकीत बिल असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. काही ठिकाणी वीज कापल्यानंतर शेजाऱ्यांकडून वीज घेण्याचे प्रकार समोर येत आहेत. महावितरणने याबाबत इशारा देत दुसऱ्याच्या घरातून वीज घेणे किंवा देणे हे वीजचोरीच्या स्वरूपात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी थकीत वीज बिल भरून अधिकृत वीज जोडणीच वापरावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Mar 11, 2026 05:06:14
Shirdi, Maharashtra:पुण्यातून एका व्यापाऱ्याचे अपहरण करून पसार झालेल्या टोळीला संगमनेर पोलिसांनी पकडले आहे.. संगमनेर तालुक्यातील नाशिक - पुणे महामार्गवरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर सापळा रचून पोलिसांनी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे.. या अपहरण प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतली असून 11 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.. पुणे जिल्ह्यातील काळेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून आरोपी चारचाकी गाडीतून आळेफाट्याच्या दिशेने येत असल्याची माहिती संगमनेर पोलिसांना मिळाली होती.. संगमनेर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू करत हिवरगाव पावसा टोलनाक्यावर सापळा रचला.. संशयित गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये उत्तर प्रदेशातील पाच तरुण संशयास्पद अवस्थेत आढळले.. पोलिसांनी आरोपींकडून दोन गावठी कट्टे, सहा जिवंत काडतुसे, पाच मोबाईल, एक मनगटी घड्याळ आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 11 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.. संगमनेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका झाली असून या कारवाईमुळे गुन्हेगार टोळीचा मोठा कट उधळला गेला आहे.. डॉ. कुणाल सोनावणे, उपविभागीय पोलिस अधिकारी, संगमनेर
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 11, 2026 03:49:47
Dharashiv, Maharashtra:धाराशिव कळंब शहरात दोन गटांत तुफान दगडफेक; १० हून अधिक जखमी किरकोळ वादातून हाणामारी;शहरात तणावाचे वातावरण धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर तुफान दगडफेक आणि हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात राञी उशिरा हा प्रकार घडला असून या घटनेत दहा हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही वेळातच चिघळला आणि दोन्ही गटांतील तरुण आमने सामने येत एकमेकांवर दगडफेक करू लागले. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उचला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एका नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेरा कैद केला आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 03:49:06
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: ब्रेकिंग | दोन दिवसांत २८०० उद्योग, ९२० हॉटेल्स बंद पडणार केंद्र सरकारकडून कमर्शियल गैस पुरवठा बंद करण्याच्या निर्णयाचा परिणाम यात युद्धामुळे आखाती देशातून होणारा gas and crude oil पुरवठा बंद झाला. त्यामुळे केंद्र सरकारنے कमर्शियल गॅस पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन दिवसांत सुमारे २ हजार ८०० उद्योग आणि सुमारे ९२० हॉटेल्स बंद पडणार असल्याची माहिती सीएमआयएने मंगळवार पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये हॉटेल आणि उद्योग व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये आता सरकार काय भूमिका घेते आणि उद्योगांचे येणाऱ्या दिवसात काय निर्णय घेतल्या जातात ते पाहावे लागेल.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 11, 2026 03:48:56
Amravati, Maharashtra:अमरावतीत गॅस सिलेंडरचा तुटवडा; गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या रांगा, शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा अँकर :- आखाती देशातील युद्धाचा फटका आता भारतातील नागरिकांनाही बसताना दिसत आहे. अमरावती शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून शहरात गॅस एजन्सींना कमी प्रमाणात सिलेंडर पुरवठा होत असल्याने ग्राहकांना वेळेवर सिलेंडर घरी पोहोचत नसल्याने ग्राहक थेट आता गॅस एजन्सी समोरच सिलेंडर घेऊन मागणी करत आहे. सिलेंडर साठी ग्राहकाने मोठ्या प्रमाणात रांग लावल्याचे चित्र sध्या अमरावती शहरात आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने ग्राहकांची मात्र तारांबळ उडत आहे सोबतच गॅस एजन्सी धारकांनाही ग्राहकांच्या रोशाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सध्या शहरात मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाईट :- गॅस एजन्सी मॅनेजर
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 11, 2026 03:45:29
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 11, 2026 03:31:32
Shirdi, Maharashtra:व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे शिर्डीतील हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे.. पुढील दोन दिवस पुरेल इतकाच साठा हॉटेल व्यावसायिकांकडे शिल्लक आहे.. त्यातच गॅस कंपन्यांनी हात वर केल्याने, पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.. LPG गॅस अभावी हॉटेल व्यवसाय पूर्णतः कोलमडण्याची भिती असून, याचा फटका साईभक्तांना देखील बसणार आहे.. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे देवस्थान असून, साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक शिर्डीत येतात.. शिर्डीत जवळपास 400 छोटी मोठी हॉटेल रेस्टॉरंट आहेत.. एचपी, भारत, इंडियन, गो गॅस अशा विविध कंपन्यांच्या माध्यमातून महिन्याला साधारण 6 हजार व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण शिर्डीमध्ये होते.. मात्र अमेरिका - इराण युद्धामुळे शासनाने व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण बंद केल्याने त्याचा मोठा फटका शिर्डीतील हॉटेल व्यवसायाला बसला आहे.. पुढील दोन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा व्यावसायिकांकडे शिल्लक असून गॅस कंपन्यांनी हात वर केल्याने शिर्डीतल हॉटेल व्यवसाय कोलमडण्याची भिती आहे.. गॅस सिलेंडर अभावी हॉटेल रेस्टॉरंट बंद ठेवण्याची वेळ आल्यास त्याचा मोठा फटका हॉटेल चालकांसह साईभक्तांना बसणार आहे.. त्यातच रामनवमी उत्सव तोंडावर येऊन ठेपल्याने शिर्डीतील व्यायसायिकांची चिंता आणखी वाढली आहे..शिर्डीतील व्यावसायिकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी....
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 11, 2026 03:31:06
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात यंदा उन्हाळी पिकांच्या पेरणीला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. कृषी विभागाने ८,७१२ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पेरणीचे नियोजन केले असले तरी मार्च महिन्याचा अर्धा कालावधी उलटूनही केवळ १,३७४ हेक्टरवरच पेरणी झाली असून हे प्रमाण १५.७७ टक्के इतकेच आहे. सध्या जिल्ह्यात मुख्यतः भुईमूग, उन्हाळी मूग आणि ज्वारी या पिकांचीच पेरणी झाली आहे. मात्र बॅरेज, तलाव आणि विहिरींमधील पाणीसाठा कमी झाल्याने तसेच काही ठिकाणी कूपनलिका कोरड्या पडल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जोखीम टाळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पेरणी टाळल्याचे दिसून येत आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 11, 2026 03:30:48
Nasik, Maharashtra:राहुल गांधीविरोधात दाखलनाशकातील खटला निकाली अँकर काँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रेच्या वेळी खासदार राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या गैरवक्त्यव्याप्रकरणी नाशकात निर्भया फाउंडेशनच्या तक्रारीनुसार न्यायालयात दाखल झालेला खटला अखेर चार वर्षांनी संपुष्टात आलाy.. या खटल्यात मंगळवारी याचिकाकर्त्यांकडून वैयक्तिक कारणास्तव न्यायालयात हजर राहणे शक्य होत नसल्याने व हा खटला दाखल झाल्यापासून गांधी यांनी सावरकरांविषयी अपशब्द न वापरल्याने याचिका मागे घेण्याची भूमिका घेतलीये.... २०२२ मध्ये हिंगोली येथे जाहीर सभेत गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. या निषेधार्थ निर्भया फाउंडेशनच्या वतीने अॅड. देवेंद्र भुतडा यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यात तथ्य दिसून आल्याने फौजदارية गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने गांधी यांना हजर राहण्याचे समन्स बजावले होते. व्हीसीद्वारे न्यायालयात त्यांचा जबाबही नोंदवला होता. दरम्यान, या प्रकरणात गांधी यांच्या वतीने काँग्रेस व अॅड. जयंत जायभावे यांनी फौजदारी पुनरावलोकन अर्ज दाखल केला. सत्र न्यायालयाने तो अंशतः मंजूर करत प्रक्रिया काढण्याचा आदेश रद्द केला. तसेच अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयास मूळ फौजदरी अर्जामध्ये प्रक्रिया करण्याच्या प्रश्नाचा नव्याने विचार करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, तक्रारदाराने स्वतःहून सदर तक्रार मागे घेतली. त्यानुसार मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती नरवाडिया यांनी खटला निकाली काढलाय..
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 11, 2026 03:30:21
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 03:30:13
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: अजिंठा लेणी परिसरात मधमाशांचा हल्ला; शंभराहून अधिक पर्यटक जखमी जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात पुन्हा एकदा आग्या मोहोळाच्या मधमाशांनी अचानक पर्यटकांवर हल्ला चढवला. या घटनेत देशी-विदेशी पर्यटकांसह सुमारे १०० ते १२० जणांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले. माहितीनुसार, पर्यटक बस पार्किंग परिसरात असताना मधमाशांनी अचानक पर्यटकांवर हल्ला केला. यात श्रीलंका येथील ८० पर्यटकांचा गट, थायलंड येथील १० पर्यटकांचा गट, तसेच जबलपूर येथील १० पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, बसमधील पर्यटकांना खाली उतरू न देता चालकाने प्रसंगावधान राखत बस सुरक्षित स्थळी वळवल्याने मोठा अनर्थ टळला. जबलपूर येथील ७ वर्षीय चिमुरडीच्या चेहऱ्यावर मधमाशांनी चावा घेतल्याने तिचा चेहरा सुजला असून तिची आईदेखील जखमी झाली आहे. जखमी पर्यटकांना उपचारासाठी अजिंठा ग्रामीण रुग्णालय तसेच परिसरातील खासगी दवाखान्यात हलवण्यात आले असून घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 11, 2026 03:16:24
0
comment0
Report
Advertisement
Back to top